Join us  

वजन कमी करायचं असेल तर रात्री खा ३ पौष्टीक चटकदार सॅलेड, वजन होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2023 3:59 PM

Salads For Weight Loss - Types And Salad Recipes : वजन कमी करताना फक्त वाफावलेल्या भाज्या खाऊ नका, ३ प्रकारचे चमचमीत सॅलेडही खाऊन पाहा.

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःला फिट ठेवणं जणू अनेकांसाठी टास्क झाले आहे. विशेषत: गेल्या दोन वर्षांत लोक त्यांच्या आरोग्याबाबत खूप जागरूक झाले आहेत. फिटनेससाठी लोकं व्यायामासह डाएटला देखील प्राधान्य देत आहेत. वजन कमी करताना डाएट खूप महत्वाचे मानले जाते. कारण व्यायाम करून आपण उलट सुलट पदार्थ खात असाल तर, वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते.

जर आपल्याला देखील वेट लॉस करायचं असेल तर, आहारात आजच ४ सॅलॅडचा समावेश करा. पोषकतत्वांनी परिपूर्ण हे सॅलॅड आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, शिवाय आरोग्याला अनेक जीवनसत्त्वे मिळतात. चला तर मग ३ प्रकारचे सॅलॅड करण्याची कृती पाहू(Salads For Weight Loss - Types And Salad Recipes).

कोबी-टोमॅटो सॅलॅड

कोबी आणि टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी पुरेसे प्रमाणात आढळते. याव्यतिरिक्त, मॅग्नेशियम, लोह, सल्फर आणि कॅल्शियम देखील मुबलक प्रमाणात असते. जे वजन कमी करण्यासोबतच दृष्टी आणि रोगप्रतिकारशक्ती बुस्ट करण्यास मदत करते. हे सॅलॅड डिनरमध्ये खाल्ल्यास आपल्याला जेवण करण्याची गरज भासणार नाही.

कोबी-टोमॅटो सॅलॅड करण्याची पद्धत

कोबी-टोमॅटो सॅलॅड करण्यासाठी कोबी, टोमॅटो, काकडी बारीक चिरून घ्या. चिरलेलं साहित्य एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात ठेचलेलं आलं, लिंबाचा रस, एक चमचा ऑलिव्ह ऑईल, जिरे पूड, भाजलेला ओवा आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.

कॉर्न सॅलॅड

वजन कमी करण्यासाठी आपली पचनसंस्था निरोगी असणं गरजेचं आहे. यासाठी कॉर्न सॅलॅड खा. कॉर्नमाधे भरपूर प्रमाणात फायबर असते. जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.

कॉर्न सॅलॅड करण्याची कृती

कॉर्न सॅलॅड करण्यासाठी कढईत ऑलिव्ह ऑईल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेली ब्रोकोली, हिरवी शिमला मिरची, पिवळी शिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, गाजर आणि कॉर्न घालून मिक्स करा. त्यात चवीनुसार मीठ, आवडते मसाले आणि पाणी घालून भाज्या २ मिनिटांसाठी शिजवून घ्या. अशा प्रकारे कॉर्न सॅलॅड खाण्यासाठी रेडी.

झोप कमी झाली की वजन वाढतं हे खरं की खोटं? वजन वाढत असेल तर झोपा काढा..

स्प्राउट सॅलॅड

वजन कमी करण्यासाठी व उत्तम पचनासाठी स्प्राउट्स खूप महत्वाचे मानले जाते. आपण नाश्त्यामध्ये स्प्राउट सॅलॅड खाऊ शकता. स्प्राउट सॅलॅड खाल्ल्याने आपले वजन लवकर कमी होण्यास मदत होईल. यासह गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळेल.

हिरोईनसारखी किलर ३४-२४-३६ फिगर हवी? मग घरीच करा ५ सोपे व्यायाम, व्हा फिट आणि सुंदरही

स्प्राउट सॅलॅड करण्याची कृती

स्प्राउट सॅलॅड करण्यासाठी हिरवे मूग आणि काळे चणे ५ तासांसाठी पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, मुळा, कांदा बारीक चिरून घ्या. कढईत एक चमचा तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात हिरवी मिरची व हिंग घालून सर्व चिरलेल्या भाज्या घालून परतवून घ्या. मंद आचेवर सर्व साहित्य शिजवून घ्या. नंतर त्यात भिजलेले हिरवे मुग, काळे चणे व चवीनुसार मीठ घालून वाफेवर शिजवून घ्या. अशा प्रकारे स्प्राउट सॅलॅड खाण्यासाठी रेडी.

 

टॅग्स :अन्नवेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स