'ऊ अंटवा' या गाण्यातून जगभरात धुमाकूळ घालणारी अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आपल्या हटके अदांसाठी ओळखली जाते. तिने साऊथ इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं आहे. ती प्रत्येक भूमिकेत आपली वेगळी छबी सादर करते. ती सध्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. अभिनयासह ती आपल्या फिटनेसची देखील तितकीच काळजी घेते.
ती सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. तिचे वर्कआउटचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत राहतात. तिने नुकतंच एक इंटेन्स वर्कआउटचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ज्यात ती पुशअप्स मारत आहे. तिचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असून, ती जिममध्ये घाम गाळत असल्याचं पाहून तिचे फॅन्स प्रेरित झाले आहेत.
समंथा आपल्या दिवसाची सुरुवात वर्कआउटने करते. तिने या व्हिडिओमध्ये रॉडचा आधार घेऊन पुशअप्स केले आहेत. यावरून असे निदर्शनास येते की, ती आपल्या आरोग्याची किती काळजी घेते. पुशअप्स करत असताना तिने पिंक आणि मरून रंगाचा स्पोर्ट्स ब्रा, मॅचिंग जिम टाइट्स यासह ग्रे क्रॉप टॉप परिधान केला आहे. तिने पुशअप्स मारत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. तिच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
पुशअप्सचे फायदे
पुशअप्स शरीराच्या वरील भागासाठी खूप फायदेशीर आहेत. यामुळे छाती, खांदे आणि हात मजबूत होतात.
पुशअप्स केल्याने मसल्स मजबूत होतात. हा व्यायाम पोटाच्या स्नायूंसाठी देखील खूप फायदेशीर आहे.
पुशअप्स केल्याने हृदयाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळते.
पुशअप्स केल्याने हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. यासह लोअर बॅकपेन दुर होतो.
स्टॅमिना वाढवण्यासाठी हा एक उत्तम व्यायाम आहे.
पुशअप्स केल्याने रक्ताभिसरण चांगले होते. यासह स्नायू सक्रिय होण्यास मदत होते.
पुशअप्स केल्याने पोश्चर सुधारतो. याने बॉडी शेप आकारात येतो.