'पुष्पा: द राइज' (Pushpa: The Rise) 2021 हा सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला. याबाबतची माहिती मेकर्सनी ट्विट करून दिली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना यांच्या अभिनयानं लोकांचं मन जिंकलं आहे. त्याचबरोबर समंथा रूथ प्रभुचे उ अंतावा (Oo Antava) हे गाणं तुफान गाजलं. प्रत्येकजण हेच गाणं गुणगुणत आहे. या गाण्यातील संमंथाचं (Samantha ruth prabhu) ड्रेसिंग, हॉट लूक आणि डान्स प्रेक्षकांना खूप आवडला.
सध्या सोशल मीडियावर समंथाच्या फिटनेसची चर्चा होत आहे. इतर सेलिब्रिटींप्रमाणेच समंथा आपलं डाएट आणि वर्कआऊटची काळजी घेते. तिनं स्वत:ला मेटेंन ठेवण्यासाठी वर्कआऊट आणि डाएटची मदत कशी घेतली जाणून घेऊया. (Samantha ruth prabhus fitness secret diet plan workout plan regime oo antava)
समंथा रूथ प्रभूचं डाएट, वर्कआऊट आणि फिटनेस रूटीन
समंथा फिटनेस फ्रिक आहे. ती आपलं डाएट आणि वर्कआऊट फॉलो करणं कधीच विसरत नाही. व्यायामाचा कंटाळा न करता ती आपल्या रोजच्या रूटीनमध्ये व्यायामाला महत्व देते. समंथा रोज जवळपास १ ते दीड तास व्यायाम करते.समंथाला वेट ट्रेनिंग खूप आवडतं. तिला अनेकदा जिममध्ये वेट ट्रेनिंग करताना लोकांनी पाहिलं आहे. ती तिच्या प्रत्येक बॉडी पार्टसाठी व्यायाम करते. त्यासाठी ती ट्रेनरनं सांगितलेलं रूटीन फॉलो करते.
समंथाला योगा खूप आवडतो त्यामुळे ती जीमसोबतच योगाही करते. पॉवर योगा, एरिअल योगा करते. तर शरीर लवचीक ठेवण्यासाठी स्ट्रेचिंग करते. तिला अनेकदा बॅलेंसिंग योगा करतानाही पाहिलं आहे. ज्यामुळे स्टेबिलिटी वाढते. दिवसातून ४ ते ५ वेळा ती वेट ट्रेनिंग करते. यामुळे मसल्स टोन आणि शरीर शेपमध्ये राहण्यास मदत होते.
तिच्या वेट ट्रेनिंगमध्ये डेडलिफ्ट, स्क्वॉट, हिपथ्रस्ट, बेंच प्रेस, डंबल कर्ल, ट्राइसेप्स एक्सटेंशन या व्यायाम प्रकारांचा समावेश असतो. बॉडी वेट एक्सरसाइजसाठी ती पुशअप, पुलअप, स्क्वॉट, जंपिग जॅक या एक्सरसाइज करते. या व्यायामांसाठी कोणत्याही उपकरणांची आवश्यकता नसते. समंथाला सायलिंग करण्याचीही आवड आहे. ज्या दिवशी तिला मोकळा वेळ असेल तेव्हा ती सायकलिंग करणं पसंत करते.
कोणत्याही स्टारचं फिटनेस सिक्रेट त्यांचं डाएट असते. समंथा आपल्या डाएटची विशेष काळजी घेते. ती नेहमीच फायबर्स आणि प्रोटीन्सयुक्त आहार घेते. आहारात हिरव्या भाज्या, प्रोटीन्सचा समावेश करते. समंथा ऑर्गेनिक फळं आणि भाज्यांचे सेवन करते. म्हणूनच तिनं आपल्या घराजवळच फळ आणि भाज्यांची झाडं लावली आहेत. तिच्या आहारात डाळ, भात, चपाती, इडली, हिरव्या भाज्या, ड्राय फ्रुट्स यांचा समावेश असतो.