Lokmat Sakhi >Fitness > "मेनोपॉजसाठी शरीराची तयारी करायची तर....." समीरा रेड्डी सांगतेय मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असताना नेमकं काय करावं....

"मेनोपॉजसाठी शरीराची तयारी करायची तर....." समीरा रेड्डी सांगतेय मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असताना नेमकं काय करावं....

Sameera Reddy's Viral Post About Pre Menopause Stage: मासिक पाळी सुरू होताना जसा त्रास होतो, तसाच त्रास ती जातानाही होताेच... हा त्रास कमी व्हावा, म्हणून शरीराची कशा पद्धतीने तयारी करून घ्यावी, याविषयी सांगतेय अभिनेत्री समीरा रेड्डी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 11:12 AM2023-09-11T11:12:17+5:302023-09-11T11:13:26+5:30

Sameera Reddy's Viral Post About Pre Menopause Stage: मासिक पाळी सुरू होताना जसा त्रास होतो, तसाच त्रास ती जातानाही होताेच... हा त्रास कमी व्हावा, म्हणून शरीराची कशा पद्धतीने तयारी करून घ्यावी, याविषयी सांगतेय अभिनेत्री समीरा रेड्डी.

Sameera Reddy's viral post about pre menopause stage, yoga and exercise for smooth and healthy menopause | "मेनोपॉजसाठी शरीराची तयारी करायची तर....." समीरा रेड्डी सांगतेय मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असताना नेमकं काय करावं....

"मेनोपॉजसाठी शरीराची तयारी करायची तर....." समीरा रेड्डी सांगतेय मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असताना नेमकं काय करावं....

Highlightsती म्हणते अशा पद्धतीने व्यायाम करणे ही माझ्या शरीरावर प्रेम करण्याची, शरीराला 'थँक यू' म्हणण्याची माझी पद्धत आहे. कारण प्रत्येक दिवशी माझं शरीर मला खंबीरपणे साथ देतं.

अभिनेत्री समीरा रेड्डी सोशल मिडियावर नेहमीच ॲक्टीव्ह असते. सोशल मिडियाच्या माध्यमातून ती जे काही शेअर करते ते सर्वसामान्य महिलांशी खूपच जास्त कनेक्ट होणारं असतं. आताही तिने मेनोपॉजविषयी असंच काहीसं सांगितलं असून ते मेनोपॉजच्या उंबरठ्यावर असणाऱ्या प्रत्येकीसाठीच उपयुक्त ठरणारं आहे (Sameera Reddy's viral post about pre menopause stage). तिच्या या पोस्टमध्ये तिने स्वत:चे ३ फोटो शेअर केले असून प्रत्येक फोटोमध्ये ती वेगवेगळे योगासने करताना दिसत आहे (yoga and exercise for smooth and healthy menopause). अतिशय अवघड योगासनं तिने अगदी सहजपणे करून दाखवली आहेत.

 

ती म्हणते अशा पद्धतीने व्यायाम करणे ही माझ्या शरीरावर प्रेम करण्याची, शरीराला 'थँक यू' म्हणण्याची माझी पद्धत आहे. कारण प्रत्येक दिवशी माझं शरीर मला खंबीरपणे साथ देतं.

महिनाभरात वाढतील केस- होतील चमकदार, अभिनेत्री स्मिता शेवाळे सांगतेय तिच्या हेअर केअर टिप्स!

प्री- मेनोपॉज स्टेज आता माझ्यासाठी अगदी जवळ असून त्या काळात होणारा त्रास कमी करण्यासाठी मी आज हे जे काय करते आहे ते एक 'PRESERVATION!!' आहे. बॉडी पॉझिटीव्हीटी हा केवळ 'acceptance' नसून ते एक प्रकारचे 'self preservation' आहे. या पोस्टमध्ये अर्ध हलासन, सर्वांगासन आणि कर्णपिडासन तिने करून दाखवलं असून सुरुवातीचे दोन्ही खुर्चीची मदत घेऊन केले आहेत. हे तिन्ही आसन केल्याने नेमके काय फायदे होतात, याविषयीही समीराने माहिती दिली आहे. 

 

हलासन, सर्वांगासन, कर्णपिडासन करण्याचे फायदे
- बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी फायदेशीर

- भावनिक ताण कमी होतो.

- एकाग्रता वाढण्यास मदत होते

- शरीरातील उर्जा वाढते.

"नविन गोष्टी करायला माझी मुलं मुळीच घाबरत नाहीत, कारण.....", काजोल सांगतेय तिच्या मुलांच्या गोष्टी...

- शरीरावर आणि श्वासावर नियंत्रण मिळवता येते.

- शारिरीक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

- endocrine system चे कार्य सुधारण्यास मदत होते. 


 

Web Title: Sameera Reddy's viral post about pre menopause stage, yoga and exercise for smooth and healthy menopause

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.