Join us  

साठीनंतरही संगीता दिसते फिट अँड ब्यूटीफुल, दुपारच्या जेवणात खाते बाजरीची भाकरी, वजन कमी करायचं तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2024 11:59 AM

Sangeeta Bijlani diet choices to stay fit at 63 : सलमानची हिरॉईन संगीताच्या फिटनेस आणि तरुण दिसण्यामागचं रहस्य काय?

साठी पार केल्यानंतरही फिट अँड फाईन आयुष्य जगणारी, अर्थात सलमानची (Salman's Ex Girlfriend) एक्स गर्लफ्रेण्ड संगीता बिजलानी (Sangeeta Bijlani) प्रत्येकाला ठाऊक आहे. बॉलीवूडमध्ये ८० चं दशक गाजवणारी ही अभिनेत्री अनेक ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावताना दिसते. त्यांनी १९८० साली ‘मिस इंडिया’चा किताबही पटकावला होता. पण त्याचं सौंदर्य, आकर्षक फिगर, कमनीय बांधा हे एखाद्या तरूणीलाही लाजवेल इतके आकर्षक आणि मनमोहक आहे (Fitness). पण अभिनेत्रीची आकर्षक फिगर आणि चमकदार त्वचेमागचं रहस्य काय? त्यांचा आहार असतो तरी कसा?

टाईम्स ऑफ इंडिया या वेबसाईटनुसार, 'संगीता यांच्या फिटनेसमागे साधी सोपी जीवनशैली आहे. त्या आपल्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेतात. मुख्य म्हणजे वेळेवर आहार आणि वर्कआउटकडे लक्ष देतात'(Sangeeta Bijlani diet choices to stay fit at 63).

दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने

संगीता बिजलानी आपल्या दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करतात. त्यात ते एलोवेरा पल्प घालून मिक्स करतात. सकाळी फक्त एक ग्लास नसून, त्या २ ते ३ ग्लास पाणी पितात.

रोज १० किमी पळूनही कणभरही कमी होणार नाही पोट, ३ चुका - आयुष्यात वजन कमी होणार नाही

ब्रेकफास्ट

संगीता आपलं ब्रेकफास्ट वेळेवर करतात. नाश्त्यामध्ये संगीता कलिंगडाच्या काही फोडी, २ भिजवलेले बदाम, एॅवोकॅडो आणि ग्रीन टी पिऊन आपला ब्रेकफास्ट पूर्ण करतात. या व्यतिरिक्त त्या आहारात बरेचसे पदार्थ खातात.

लंच

संगीता दुपारच्या जेवणात बाजरीची भाकरी, हिरवे पालेभाज्या, सॅलॅड आणि सूप पितात. हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाण्याचे विशेष महत्व आहे. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे घटक आढळतात. जे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात. विशेषतः हिवाळ्यात बाजरी खाण्याला जास्त  महत्व आहे. जर आपल्याला फिट राहायचं असेल तर, लंचमध्ये बाजरीची भाकरी खा.

वर्कआउट

संगीता आपल्या वर्कआउटकडे विशेष लक्ष देतात. त्या जिममध्ये तर जातातच, याव्यतिरिक्त घरातही १ ते २ तास खास वर्कआउटसाठी देतात. वर्कआउट केल्याने अतिरिक्त चरबी तर घटतेच, यासह त्वचेवर तेज देखील येते.

प्रोटीनयुक्त आहार

संगीता आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करतात. प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने बऱ्याचशा समस्या सुटतात. प्रथिनेयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटाची चरबी यासह वजन कमी करण्यास मदत होते, व स्नायू बळकट करण्यासही मदत होते. ज्यामुळे फिगर टोण्ड राहते.

साखर टाळा

लॉकडाऊनमध्ये संगीताने २१ दिवस साखरयुक्त पदार्थ, यासह गोड खाणे कमी केले किंवा सोडून दिले होते. साखरेत कॅलरीजचे प्रमाण जास्त असल्यामुळे वजन झपाट्याने वाढते. पण साखर सोडल्याने वजन तर कमी झालेच, शिवाय चेहऱ्यावरील वृद्धत्वाच्या खुणाही कमी झाल्या.

मध-खजूर

संगीताला कधीही गोड खाण्याची इच्छा झाली की, त्या साखर वगळून गुळ, मध किंवा खजूर खातात. यामुळे गोड खाण्याची क्रेविंग्स कमी होते. यासह आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते.

कोण म्हणतं फक्त डाएट- वर्कआउट केल्यानेच वजन घटतं? ५ सोपे बदल, सहज घटेल वजन

डिनर

डिनर प्रत्येकाने लवकर करायला हवे. जर आपल्याला फिट आरोग्य राखायचं असेल तर, नियमित रात्री ८ वाजेच्या आत डिनर पूर्ण करा. डिनरमध्ये संगीता सूप किंवा सॅलॅड खातात. रात्री हलका आहार घेतल्याने वजन वाढत नाही, शिवाय अपचन व इतर आजारांचा त्रासही होत नाही.

टॅग्स :सलमान खानफिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स