आपली फिगर एखाद्या अभिनेत्रीसारखी असावी असं प्रत्येक तरुणीला वाटतं. बॉलीवूड अभिनेत्रींना तर मोठ्या प्रमाणात फॉलो केले जाते. शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी आणि फिगरसाठी नेहमीच चर्चेत असते. तरुणी अभिनेत्रींसारखे दिसण्यासाठी कधी एखादा डाएट प्लॅन फॉलो करतात तर तर कधी व्यायामाला सुरुवात करतात. पण ही फिगर काही म्हणावी तशी शेपमध्ये येत नाही. केवळ चांगलं दिसण्यासाठी नाही तर उत्तम आरोग्यासाठीही आहार आणि व्यायाम यांचे संतुलन गरजेचे असते. शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेससाठी बरीच प्रसिद्ध आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन ती नेहमी आपल्या चाहत्यांचे प्रबोधन करत असते. कधी डाएटबाबत काहीतरी सांगून तर कधी व्यायाम आणि प्राणायाम यांसारख्या गोष्टींचे महत्त्व सांगत ती चाहत्यांना प्रेरणा देत असते. तिच्या हॉट आणि कूल फिगवरुन आपण तिचे फिटनेसप्रती असणारे डेडीकेशन समजू शकतो. नुकताच तिने ‘शिल्पा का मंत्रा’ या अंतर्गत आपल्या चाहत्यांना एक मंत्र दिला आहे.
पाहूयात शिल्पा शेट्टी कोणता मंत्र सांगतेय, ज्यामुळे आपल्यालाही फिट राहायला मदत होईल. ती म्हणते, तुम्हाला आयुष्यात जे मिळवायचं आहे किंवा अॅचिव्ह करायचं आहे ते तुम्हाला शिस्त, त्या गोष्टीप्रती असणारी एकरुपता, सातत्याने केले जाणारे प्रयत्न आणि ती गोष्ट मिळवण्याची तुम्हाला असणारी घाई यामुळे मिळू शकते. यासाठी जोपर्यंत तुम्ही स्वत:ला पुश करत नाही, तोपर्यंत हे स्वप्न पूर्ण करणे तुम्हाला एखाद्या स्वप्नासारखे वाटेल. त्यामुळे तुमचे एक व्यवस्थित शेड्यूल बनवा, त्याशिवाय काहीही साध्य होऊ शकत नाही. जास्त साखर खाण्यावर नियंत्रण ठेवा. तुमच्या वेळेचे योग्य पद्धतीने नियोजन करा त्यामुळे तुम्हाला आहार आणि व्यायाम याकडे लक्ष देण्यास मदत होईल. पर्यायाने तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
शिल्पा पुढे म्हणते, उत्तम आरोग्यासाठी पुरेसे पाणी प्या. चांगला आणि योग्य त्या प्रमाणात आहार घ्या. हे सगळे केल्यावर तुम्ही कालपेक्षा जास्त फिट आहात की नाही हे नियमित तपासत राहा. फिट राहण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका असा सल्ला ती आपल्या चाहत्यांना देते. तिच्या या पोस्टला इन्स्टाग्रामवर प्रचंड लाइक्स मिळाले असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. या पोस्टसाठी शिल्पाने तिचा व्यायाम करतानाचा फोटो असलेले एक छानसे पोस्टरही अपलोड केले आहे. त्यामुळे एकाच पोस्टच्या माध्यमातून आहार, व्यायाम आणि त्याचे दैनंदिन जीवनातील महत्त्व सांगणारी शिल्पा नकळत तिच्या फिटनेसचे रहस्यच सांगून जाते.