सर्वाधिक काळ राजेपदी विराजमान असलेल्या युकेच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं. त्यांनी ८ सप्टेंबर रोजी स्कॉटलँड येथे अखेरचा श्वास घेतला. एलिझाबेथ या जगातील सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या महाराणींपैकी एक होत्या. त्यांनी ७० वर्षांहून अधिक काळ ब्रिटनसह इतर अनेक देशांवर राज्य केले. मृत्यूच्या वेळीही राणी ब्रिटनसह 15 देशांची राणी होती. महाराणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलिप यांचं निधन एप्रिल 2021 रोजी झाले. मृत्युसमयी त्या ९९ वर्षांच्या होत्या. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना चार मुलं आहेत. त्या दोघांनीही ९० वर्षांच्यावर एकत्र काढली. सध्याच्या युगात फार कमी लोक इतकी वर्ष जगतात. मात्र, त्या दोघांनीही आरोग्याची भरपूर काळजी घेतली. या वयातही त्या खूप सक्रिय होत्या. राणी एलिझाबेथ या इतकी वर्षं कशा जगल्या आणि फिट राहिल्या याबाबत मात्र अनेकांना उत्सुकता आहे. चला तर मग जाणून घेऊया, त्यांच्या आयुष्याचे काही रहस्य..
रॉयल शेफचा खुलासा
पती-पत्नी दोघेही दीर्घकाळ जगले. आजच्या युगात आरोग्य सुविधा प्रगत झाल्या असल्या तरी ९० वर्षांच्यावर जगणे फार दुर्मिळ आहे. अशा परिस्थितीत या जोडप्यांनी कशी आपल्या आरोग्याची काळजी घेतली. कसे इतके वर्ष जगले. यासंदर्भात राणी एलिझाबेथचे रॉयल शेफ असलेले डॅरेन मॅकग्रेडी यांनी अलीकडेच खुलासा केला आहे.
माजी रॉयल शेफने त्यांच्या 'इटिंग रॉयली: रेसिपीज अँड रिमेब्रेन्सेस फ्रॉम अ पॅलेस किचन' या पुस्तकात राणीच्या खाद्यपदार्थांच्या निवडी आणि खाण्याच्या सवयींबद्दल लिहिलं आहे. राणी एलिझाबेथ यांची लाइफस्टाइल अतिशय साधी होती, पण त्या आपल्या रूटीनबाबतीत ठाम होत्या. हेल्दी जेवण, व्यायाम करणे, वेळेवर झोपणे आणि वेळेवर उठणे हा त्यांच्या रूटीनचा एक भाग होता.
एलिझाबेथ सहसा दिवसातून चार वेळा जेवण करायच्या. ज्यामध्ये नाश्ता, दुपारचे जेवण, दुपारचा चहा आणि रात्रीच्या जेवणाचा समावेश होता. बकिंगहॅम पॅलेसमध्ये जवळपास 15 वर्षे काम करणाऱ्या शेफ मॅकग्रेडी यांच्या मते, 96 वर्षीय राणीने कधीही पिझ्झा खाल्ला नाही. राणीला चॉकलेट बिस्किटे, केक आणि डार्क चॉकलेट खूप आवडायचे हेही पुस्तकातून समोर आले आहे. राणी कधीही कॅलरीनुसार अन्न खात नव्हत्या.
खाण्यात या गोष्टींचा असायचा समावेश
राणीचा नाश्ता साधा असायचा. त्यात एक वाटीभर कडधान्य किंवा दही असायचे. राणी दुपारच्या जेवणात पालक खात होते. कधी कधी सॅलडसह लो-कार्ब जेवण करायच्या. दुपारच्या चहासोबत राणी जॅम आणि टोस्ट पण घेत असे. राणी रात्रीच्या जेवणासाठी कधीही स्टार्चयुक्त पदार्थ खायच्या नाही, याचा अर्थ बटाटे, पास्ता अगदी भाताचा देखील आहारात समावेश न्हवता.
व्यायाम करायला आवडायचं
राणी जास्त व्यायाम करत नसे, पण त्यांचा एक ठरलेला योगा होता जो त्या रोज करत असे. राणीला घोडेस्वारीची आवड होती. त्या कुत्र्यांसोबत ही फिरायच्या. त्यांना निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडायचं. त्या रात्री अकरा वाजेपर्यंत झोपायच्या आणि सकाळी 7 वाजता उठायच्या.
स्वतःला वेळ देणे
चहा पिणं महाराणी एलिझाबेथ यांना विशेष पसंत होतं. दुपारच्या चहासाठी त्या व्यस्त शेड्यूलमधूनही वेळ काढत. चहा आणि केक खाणं त्यांना आवडत असे, असं त्यांच्या मास्टर शेफने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
स्मोकिंगपासून दूर
आपल्या नात्यातील अनेकांचा स्मोकिंगशी संबंधित आजाराने मृत्यू झाल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्यामुळे त्या स्मोकिंगपासून अखेरपर्यत दूरच राहिल्या.