Join us  

झोपच येत नाही, रात्री अंथरुणावर तळमळत राहावं लागतं, दिवसभर थकवा? ७ टिप्स- झोपा शांत-व्हा फ्रेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 11:26 AM

Secrets to a good night's sleep : रात्री चांगली झोप घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे झोपण्यापूर्वी आंघोळ करणे.

शरीराच्या चांगल्या कार्यासाठी वेळेवर झोप घेणं फार महत्वाचं आहे. तज्ज्ञ रोज ७ ते ८ तास झोपण्याचा सल्ला देतात पण व्यस्त जीवनशैलीत ताण-तणावामुळे झोपेची कमतरता जाणवते. हेल्थ एक्सपर्ट्स Luke Coutinho यांनी चांगली झोप येण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. चांगली झोप घेतल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. (Easy and free ways to get deep sleep and sleeping benefits) पण सध्याच्या ताण-तणावाच्या आयुष्यात झोप येणं खूपच कठीण होतं. उन्हाळ्याच्या दिवसात वातावरणात गारवा नसल्यानं अस्वस्थ वाटतं आणि शांत झोपच येत नाही. (How to get sleep Faster)

गाढ, शांत झोपेचे फायदे

इम्यूनिटी मजबूत राहते

वजन नियंत्रणात राहते

डायटबिटीज, डार्ट डिसिजचा झोका कमी होतो.

ताण-तणाव कमी होऊन मूडमध्ये सुधारणा होते.

विचार करण्याची क्षमता अधिक चांगली होते. 

गाढ झोप येण्याचे साईटिफिक उपाय

हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते गाढ झोप येण्यासाठी तुम्ही अनेक गोष्टींचा अवलंब करू शकता. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार पॅरासिम्पेथेटिक नर्व्हस सिस्टमला उत्तेजित करणं आहे. हे काम वेगस नर्व्हच्या माध्यमातून केले जाते. ल्यूक यांनी गाढ झोपेसाठी दीर्घ  श्वास घेण्याची शिफारस केली आहे. यामध्ये तुम्हाला मंद दीर्घ श्वास घ्यावा लागेल आणि आणखी हळू श्वास सोडावा लागेल. झोपेचा हा सर्वात जलद मार्ग आहे, याला त्यांनी एलएसडी असे नाव दिले आहे.

ना डाएट- ना जीम; फक्त ५ रिफ्रेशिंग पदार्थ रोज घ्या; घटेल पोट-कंबरेची वाढलेली चरबी

रात्री झोपण्याआधी मेडिटेशन केल्याचे अनेक फायदे मिळतात. रात्री १० मिनिटांत शांत, एकांत मेडिटेशन केल्यानं तब्येत चांगली राहण्यास मदत होते. झोपेच्यावेळी कॅफीन घेतल्याने झोप येण्यास त्रास होऊ शकतो किंवा तुमच्या झोपेच्या पद्धतींवर परिणाम होऊ शकतो. झोपण्यापूर्वी कॉफी पिणे हे तुमच्या झोपेसाठी चांगले नाही आणि तुम्ही ते टाळले पाहिजे. कारण ते तुमच्या शरीराला रात्री नैसर्गिकरित्या विश्रांती घेण्यापासून प्रतिबंधित करते आणि तुम्हाला सक्रिय ठेवते.

पोट खूपच सुटलंय? बेली फॅट घटवण्यासाठी रामदेव बाबांचे १० उपाय, सुडौल दिसाल

रात्री चांगली झोप घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे झोपण्यापूर्वी आंघोळ करणे. युरोपियन जर्नल ऑफ अप्लाइड फिजियोलॉजी आणि ऑक्युपेशनल फिजियोलॉजीनुसार, झोपण्यापूर्वी आंघोळ केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते, विशेषत: वृद्धांमध्ये. जर तुम्हाला झोपेचा त्रास होत असेल तर ते देखील मदत करते.

साखर आणि पॅकेज केलेले अन्न यांसारखे पदार्थ खाणे टाळा, कारण यामुळे तुमच्या साखरेचे असंतुलन होऊ शकते, परिणामी रात्रीचे स्नॅकिंग होऊ शकते. त्याऐवजी फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थ जास्त खा. रात्री भूक लागू नये म्हणून दिवसभरात पाण्याचे प्रमाण वाढवा.

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य