Join us  

अमिताभ बच्चन पाहा रोज कसा करतात व्यायाम, त्यांचे ट्रेनर सांगतात-शिस्त आम्हाला त्यांनी शिकवली कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2024 8:36 PM

See how Amitabh Bachchan exercises everyday, says his trainer - He taught us discipline because.. : वय ८० च्या पुढे पण काम आणि व्यायाम यांची शिस्त अमिताभ बच्चन मोडत नाहीत, त्यांच्या एनर्जीचं तेच सिक्रेट

'अरे आज व्यायाम करायला वेळच नाही मिळाला.' असं म्हणत आपण जिमला किंवा व्यायाम करण्यास टाळाटाळ करतो (Fitness). आणि कारण काय तर जॉब किंवा अभ्यास. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण नकळत आरोग्याकडे दुर्लक्ष करतो, आणि आपली व्यायामाची सवय मोडते (Health tips). पण कितीही व्यग्र शेड्युल असलं तरी, व्यायामाला पुरेपूर वेळ देणारे ज्येष्ठ कलाकार म्हणजे बॉलीवूडचे शहंशाह अर्थात अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). वय ८० पण त्यांचा कामाचा झपाटा, ऊर्जा आणि उत्साह यासह फिटनेस आदर्श घ्यावा असाच आहे, ते त्यांना कसं जमतं याची गोेष्ट त्यांचे तरुण फिटनेस ट्रेनर सांगतात.

वयाच्या ८१ व्या वर्षीही बच्चन यांचा कामाचा झपाटा पाहिला तर कुणालाही प्रश्न पडावा की त्यांना हे जमतं कसं? त्यांचं जसं आपल्या कामावर प्रेम आहे तसंच शिस्तीवर आणि रुटीनवरही! व्यायाम कोणताही असो, तो पॅशनेटली करणं हे बच्चन यांच्याकडून शिकायला हवं असं त्यांचे ट्रेनर सांगतात(See how Amitabh Bachchan exercises everyday, says his trainer - He taught us discipline because..).

ट्रेनर सांगतात अमिताभ फार एनर्जेटिक

सध्या शिवोहम अमिताभ बच्चन यांचे ट्रेनर आहेत. ते म्हणतात, 'अमिताभ बच्चन यांचे बिझी शेड्युल, ते सतत कामात असतात. ज्यामुळे त्यांना कधीकधी सायंकाळी व्यायाम करण्यास वेळ मिळतो. पण सायंकाळी किंवा रात्री व्यायाम करणे योग्य नाही. यामुळे झोपेचं चक्र बिघडू शकतं. मात्र त्यातही त्यांची तयारी असते व्यायामाची. ते वेळात वेळ काढून व्यायाम करतातच.

मुकेश अंबानी यांचा व्हायरल डाएट प्लॅन, नीता अंबानी सांगतात घरच्या साध्या जेवणातला त्यांचा आवडता पदार्थ

दुसऱ्या ट्रेनर आहेत वृंदा. त्यांनी नुकतंच एका मुलाखतीत सांगितलं की बच्चन यांच्या व्यायामाची सुरुवात प्राणायामपासून होते, आणि पुढे योगाभ्यास करतात. शिस्त आणि वक्तशीरपणा या दोन गोष्टी तर मी बच्चन सरांकडूनच शिकले. मला अजूनही आठवते की आम्ही सकाळी ६ वाजता ट्रेनिंग सुरू करायचो. ते कायम वेळेवर असायचे. त्यांनी कधीच उशीर केला नाही. त्यांच्यामुळे मला वेळेचे महत्व पटले.

उगीच का माणसं थोर आणि यशस्वी असतात. ते रोज ठरवून काही गोष्टी न कंटाळता करतात, आपली ऊर्जा मनापासून चांगल्या गोष्टीवर खर्च करतात. जगाला यश दिसतं पण त्यामागचे कष्ट असे निरंतर चालू असतात.

टॅग्स :अमिताभ बच्चनफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य