Join us  

घ्या स्वत:ची परीक्षा आणि बघा तुमच्या शरीराचं नेमकं वय किती.. करून तर पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2022 4:23 PM

Self Test to Identify Your Body Age: आपलं खरंखुरं वय आणि शारिरीक वय, यात बऱ्याचदा अंतर असतं, असं तुम्हीही ऐकलंय ना? ही परीक्षा तशीच काहीशी आहे. घेऊन तर बघा स्वत:च स्वत:ची परीक्षा.

ठळक मुद्देदोन्ही पायांनी किती वेळ बॅलेन्स धरता आला त्याची बेरीज करून सरासरी काढा. आणि खाली दिलेल्या चार्टवरून तुमच्या शरीराचं वय तपासून पहा.

काही जण वयाने मोठे असतात. पण त्यांचा उत्साह आणि कोणतंही काम करण्याची त्यांची उर्मी एवढी जास्त असते की ते पाहून तरुणांनाही लाज वाटावी. मग अशा व्यक्तींकडे पाहून आपल्याला वाटतं की यांचं नुसतंच वय वाढलं आहे, पण शरिराने तर ते अगदी तरुण आहेत. याउलट काही मंडळी अशीही असतात, जे तरुण तर असतात. पण त्यांच्याठायी सदा आळस आणि निरुत्साह भरलेला असतो. असे लोक मग तरुण असूनही वयस्कर भासतात. म्हणूनच आपलं खरं वय आणि शारिरीक वय यात बऱ्याचदा तफावत असते. आता तुम्हालाही तुमचं खरं वय कितीही असलं तरी शरीर नेमकं किती वर्षांचं आहे, हे ओळखायचं असेल तर ही घरच्याघरी स्वत:ची परीक्षा करून बघा. 

 

आपलं शरीर नेमकं किती वर्षांचं झालं आहे, हे ओळखण्याची एक सोपी ट्रिक sangitasyogasutra या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये एका विशिष्ट अवस्थेत उभं राहून शरीराचा तोल सावरायचा आहे.

हिवाळ्यात खायलाच हवी आवळ्याची चटपटीत चटणी! चवीला भारी आणि करायला सोपी, बघा रेसिपी

Medical Research Council यांच्यावतीनेही काही वर्षांपुर्वी अशी टेस्ट सुचविण्यात आली होती. ज्यांना अधिक वेळ स्वत:चा तोल सावरून धरता येईल, त्यांचं वय कमी, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला होता. कारण वाढत्या वयानुसार स्वत:चा तोल सावरण्याची क्षमता कमी- कमी होत जाते, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. 

 

कशी घ्यायची परीक्षा?यासाठी दोन्ही हात कोपऱ्यामध्ये दुमडा आणि तळहात दोन्ही खांद्यावर क्रॉसमध्ये ठेवा. यानंतर एक पाय गुडघ्यात दुमडून मागच्या बाजूने वर उचला. दुसऱ्या पायावर शरीराचा तोल सावरून धरा.

इंग्लंडमध्ये सापडलं १३०० वर्षे जुनं सोन्याचं रत्नजडीत नेकलेस, बघा त्या अनमोल दागिन्याची नजाकत

हीच कृती आता दुसऱ्या पायाने करा. दोन्ही पायांनी किती वेळ बॅलेन्स धरता आला त्याची बेरीज करून सरासरी काढा. आणि खाली दिलेल्या चार्टवरून तुमच्या शरीराचं वय तपासून पहा.१ ते ५ सेकंद- ६५ वर्षांपेक्षा जास्त ६ ते १० सेकंद- ६४ ते ५० वर्षे११ ते १५ सेकंद- ४९ ते ४० वर्षे१६ ते २१ सेकंद- ३९ ते ३५ वर्षे२२ ते ३० सेकंद- ३४ ते ३० वर्षे 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सव्यायाम