Join us  

‘जवान’फेम अभिनेत्री नयनताराचे ६ फिटनेस रुल्स, तिशीनंतरही दिसते कमाल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2023 5:28 PM

Shahrukh Khan Jawan Movie Lead Actress Nayanthara Fitness Beauty And Zero Figure Secret Know Her Daily Workout And Diet Plan २ मुलांची आई असलेली नयनतारा आपलं वय लपवत नाही, डाएटही चुकवत नाही..

बॉलीवूडचा बादशाह अर्थात शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात शाहरुखला मुख्य म्हणजे महिलांचा पाठींबा मिळाल्याचे दाखवण्यात आले आहे. एटली दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखच्या अपोजिट नयनतारा मुख्य भूमिकेत आहे.

नयनतारा ही साऊथ इंडियन अभिनेत्री असून, तिने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे. तिने यात लेडी ऑफिसरचा रोल साकारला असून, ती या रोलमध्ये खूप फिट अँड फाइन दिसत आहे. नयनतारा खरंतर ३८ वर्षांची आहे, व तिला २ अपत्य आहे. मात्र, २ मुलं असूनही, ती इतकी फिट कशी असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. टाइम्स ऑफ इंडिया या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार नयनतारा फिट राहण्यासाठी कोणता रुटीन फॉलो करते, पाहूयात(Shahrukh Khan Jawan Movie Lead Actress Nayanthara Fitness Beauty And Zero Figure Secret Know Her Daily Workout And Diet Plan).

दररोज करते वर्कआउट

बिझी शेड्युलमुळे अनेकांना वर्कआउट करायला जमेलच असे नाही. मात्र, नयनतारा आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. यासाठी ती रोज वर्कआउट करते. ती जिममध्ये वेट ट्रेनिंग घेते. यामुळे ती इतकी फिट अँड फाइन दिसते.

हेल्दी फुड्स

नयनतारा फिट राहण्यासाठी क्रॅश डाएटला फॉलो करत नाही. ती हेल्दी फुड्स खाण्यास प्राधान्य देते. तिच्या आहारात फळांचा आणि भाज्यांचा समावेश असतो.

फोर्टिफाइड धान्य म्हणजे नेमकं काय? कडकड वाजणारी हाडं ही धान्य खाऊन बळकट होतात?

नारळ पाणी

नयनताराला नारळाचे पाणी खूप आवडते. ती आपले ब्यूटी सिक्रेट नारळ पाण्यात दडलंय असे सांगते. ती आपल्या आहारात नारळ पाणी आणि नारळाच्या स्मूदीचा समावेश करते. नारळ पाण्यात कॅलरीज कमी व पौष्टीक घटक अधिक आढळतात. ज्यामुळे वेट मेन्टेन राहते.

साखर टाळते

लठ्ठपणा आणि इतर रोगांचे मूळ कारण साखर आहे. साखर हे पांढरे विष म्हणून ओळखले जाते. नयनतारा साखरेपासून दूर राहते.

दर १० पैकी ६ टीनएज मुलींना आहे ॲनिमियाचा त्रास, वयात येतानाच ॲनिमिया झाला तर, डॉक्टर सांगतात..

भरपूर पाणी पिते

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे महत्वाचे आहे. नयनतारा आपल्या आहारात नारळ पाण्यासह फळांचा रस आणि सूपचाही समावेश करते. व भरपूर पाणी पिते.

योग

नियमित योग केल्याने शारीरिकसह मानसिक आरोग्यही सुधारते. नयनतारा नियमित योगा करते. ज्यामुळे अनेक आजार दूर तर राहतात, शिवाय वजन देखील नियंत्रित राहते.

टॅग्स :नयनताराजवान चित्रपटफिटनेस टिप्समहिलाहेल्थ टिप्सआरोग्य