Lokmat Sakhi >Fitness > फॅट टू फिट प्रवासात शहनाज गिल सकाळी प्यायची सिक्रेट ड्रिंक, इतकं स्वस्त की कुणालाही परवडेल...

फॅट टू फिट प्रवासात शहनाज गिल सकाळी प्यायची सिक्रेट ड्रिंक, इतकं स्वस्त की कुणालाही परवडेल...

Shehnaaz Gill spills her diet secrets, says ‘Haldi water is a must for me every morning : शहनाज गिलचा सांगतेय वजन कमी करताना प्यायच्या एका पेयाची गोष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2023 09:00 AM2023-08-12T09:00:30+5:302023-08-12T09:05:02+5:30

Shehnaaz Gill spills her diet secrets, says ‘Haldi water is a must for me every morning : शहनाज गिलचा सांगतेय वजन कमी करताना प्यायच्या एका पेयाची गोष्ट...

Shehnaaz Gill Swears By This Weight Loss Morning Drink: Check The Recipe And The Benefits. | फॅट टू फिट प्रवासात शहनाज गिल सकाळी प्यायची सिक्रेट ड्रिंक, इतकं स्वस्त की कुणालाही परवडेल...

फॅट टू फिट प्रवासात शहनाज गिल सकाळी प्यायची सिक्रेट ड्रिंक, इतकं स्वस्त की कुणालाही परवडेल...

'बिग बॉस १३' या रिऍलिटी शो च्या माध्यमांतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शहनाज गिल (Shehnaaz Gill), हिला आपण सगळेच ओळखतो. शहनाज एक उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती अप्रतिम गायिकाही आहे. आपल्या मस्तीखोर आणि खोडकर स्वभावामुळे शहनाजने असंख्य प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. शहनाज तिच्या अभिनयातील गुणांमुळे तर ओळखली जातेच शिवाय तिचा वजन कमी करण्याचा प्रवास, तिची फॅट टू फिट जर्नी यामुळे ती अधिकच लोकप्रिय झाली आहे. 

शहनाज (Shehnaaz Gill) आपल्या अभिनयासोबतच स्वतःच्या आरोग्याची व संपूर्ण शरीराची अतिशय काटेकोरपणे काळजी घेताना दिसून येते. शहनाज फिटनेस सोबतच त्वचेची काळजी देखील तितक्याच बारकाईने घेताना दिसून येते. या सगळ्यासाठी शहनाज आपल्या रोजच्या डाएटमध्ये चिमूटभर हळदीचा समावेश करते. आपल्याकडे हळद हा सर्व मसाल्यांपैकी एक महत्वाचा पदार्थ म्हणून ओळखला जातो. हळदीच्या वापराने स्वयंपाकाची चव वाढण्यास मदत मिळते. सोबतच याद्वारे आपल्याला आरोग्यदायी फायदे देखील मिळतात. औषधी गुणधर्मामुळे काही मसाल्यांना आयुर्वेदामध्येही विशेष स्थान देण्यात आले आहे. यापैकीच एक म्हणजे हळद. हळद ही एक अशी औषधी वनस्पती आहे, ज्यामुळे आपल्याला आरोग्यवर्धक तसेच सौंदर्यवर्धक देखील लाभ मिळतात(Shehnaaz Gill spills her diet secrets, says ‘Haldi water is a must for me every morning). 

शहनाज गिलच्या सिक्रेट ड्रिंक बद्दल... 

शहनाज तिचे फिटनेस व त्वचेचे आरोग्य सांभाळण्यासाठी, सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात चिमूटभर हळद घालून हे पाणी पिते. हेच शहनाजचे सिक्रेट ड्रिंक आहे. 

वजन कमी करण्यासाठी ४ मंत्र विसरुच नका ! तापसी पन्नूच्या न्यूट्रिशनिस्ट मुनमुन गनेरीवालचा सल्ला...

कसे तयार करायचे हळदीचे पाणी ?

एक ग्लास गरम पाणी घ्या आणि एका भांड्यात ते उकळत ठेवा. या पाण्यामध्ये आता एक छोटा चमचा हळद पावडर घाला आणि चांगल्या प्रकारे पाणी ढवळत राहा. आपल्याला हवे असल्यास यामध्ये मधाचा देखील वापर करू शकता. नियमित सकाळी हे पाणी आपण पिऊ शकता.

आपल्या वयानुसार आपण दिवसभरात किती पावले चालावीत ? पहा स्वीडन विद्यापीठाचा अभ्यास काय सांगतो...

१. वजन कमी होते :- हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी ऑक्सिडेंट, अँटी सेप्टिक, अँटी वायरल आणि किडनीसाठी पोषक असणारे औषधी गुणधर्म आहेत. वजन कमी करण्यासाठी हळदीच्या पाण्याची नक्कीच मदत होईल. वजन वाढीमुळे हृदयरोग, स्ट्रोक आणि मधुमेह यासारख्या आजारांचा धोका वाढत राहतो. पण योग्य प्रमाणात हळदीचे पाणी प्यायल्यास पोट आणि ओटी पोटावरील चरबी कमी होईल. यामध्ये असणाऱ्या कर्क्युमिन घटकामुळे अतिरिक्त चरबी कमी होते.

२. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते :- दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट हळदीचे पाणी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते आणि शरीरातील सूज देखील कमी होते, कारण हळदीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. 

सकाळी उठल्या उठल्या ढसाढसा पाणी पिणं योग्य की अयोग्य ? आयुर्वेदिक तज्ज्ञ सांगतात, तसे करावे की नाही...

घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...

३. पचनाच्या समस्या दूर होतात :- हळदीमध्ये असे गुणधर्म असतात जे आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात. हळदीचे पाणी रोज प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्याही दूर होऊ शकते.

४. हळदीचे पाणी चेहऱ्यावर लावा :- हळदीचे पाणी फक्त पिण्यातच नाही तर चेहऱ्यावर लावण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. रोज कोमट हळदीच्या पाण्याने चेहरा धुतल्यास चेहर्‍याची चमक कायम राहते आणि चेहराही चमकतो.

Web Title: Shehnaaz Gill Swears By This Weight Loss Morning Drink: Check The Recipe And The Benefits.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.