Lokmat Sakhi >Fitness > ४७ व्या वर्षीही तरुण दिसणाऱ्या शिल्पा शेट्टीचं फिटनेस सिक्रेट; फक्त १ योगासन, करा रोज

४७ व्या वर्षीही तरुण दिसणाऱ्या शिल्पा शेट्टीचं फिटनेस सिक्रेट; फक्त १ योगासन, करा रोज

Shilpa shetty fitness tips : काही दिवसांपूर्वी शिल्पानं पदोत्तानासन करताना एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर  शेअर केला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2023 02:00 PM2023-06-05T14:00:59+5:302023-06-05T14:31:10+5:30

Shilpa shetty fitness tips : काही दिवसांपूर्वी शिल्पानं पदोत्तानासन करताना एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर  शेअर केला होता.

Shilpa shetty fitness tips : Prasarita padottanasana benefits by shilpa shetty : | ४७ व्या वर्षीही तरुण दिसणाऱ्या शिल्पा शेट्टीचं फिटनेस सिक्रेट; फक्त १ योगासन, करा रोज

४७ व्या वर्षीही तरुण दिसणाऱ्या शिल्पा शेट्टीचं फिटनेस सिक्रेट; फक्त १ योगासन, करा रोज

शिल्पा शेट्टी ९० च्या दशकातील सुपरहीट अभिनेत्रींपैकी एक आहे. एक्टिंगबरोबरच फिटनेसाठीही ती ओळखली जाते.  ८ जून ला शिल्पानं आपला ४८ वा वाढदिवस साजरा केला. (Shilpa shetty fitness tips)  तिच्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावला जाऊ शकत नाही. याचं संपूर्ण क्रेडीट तिच्या फिटनेस रुटीनला जातं. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज योगा करते. (Prasarita padottanasana benefits by shilpa shetty)

योगानं शरीराला बरेच फायदे मिळतात. रोज योगा केल्यानं शरीरातील फ्लेक्सिबिलिटी वाढते. रक्ताभिसारण (Blood Circulation) सुधारते. वजन कमी होते आणि वेदनांपासूनही आराम मिळतो आणि चेहरा ग्लोईंग दिसतो, केस मजबूत राहतात. वाढत्या वयात फिट राहण्यासाठी रोज योगासनं करायला हवीत.  जर तुम्हाला कोणती योगासनं करावीत हे कळत  नसेल तर शिल्पा शेट्टीप्रमाणे (Shilpa Shetty)  आपल्या रुटीनमध्ये खास योगासनांचा समावेश तुम्ही करू शकता. 

काही दिवसांपूर्वी शिल्पानं पदोत्तानासन करताना एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर  शेअर केला होता. याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, हे योगासन केल्यानं हॅमस्ट्रींग, ग्लूट्स आणि पाठीच्या खालच्या भागात  स्ट्रेच येतो आणि  हिप जॉइंट फ्लेक्सिबिलिटीमध्ये सुधारणा होते. सकाळच्या वेळी स्ट्रेचिंग व्यायाम केल्यानं दिवसभर फ्रेश वाटतं.  स्लिप डिस्क,  हाय ब्लड प्रेशर,  वर्टिगो आणि मायग्रेनचा त्रास असल्यास हे आसन करू नये.

पादोत्तानासन ही  एक जुनी योग मुद्रा आहे. या व्यायामाला वाईड लेग स्टँडींग फॉरवर्ड बेंड नावानंही ओळखलं जातं. पादोत्तानासन म्हणजे पाद, उत्तान आणि आसन या शब्दांपासून मिळून तयार झाले आहे. याचा अर्थ पसरणं असा होतो.  या आसनानं शारीरिक, मानसिक कमकुवतपणा दूर होण्यास मदत होते. 

हे आसन केल्यानं रक्ताभिसरण सुरळीत होते. डिप्रेशन, चिंता कमी होते. पोटाचे स्नायू मजबूत होतात. पोटाची चरबी  कमी होते, चेहऱ्यावर ग्लो येतो. केसांचे आरोग्यही सुधारते आणि महिलांच्या प्रजनन क्षमतेसाठीसुद्धा हे फायदेशीर ठरते.  अंगदुखी, शरीराच्या विशिष्ट भागात वेदना जाणवत असल्यास हे आसन करू नका,  हृदयाशी संबंधित समस्या असल्यास हे आसन करणं टाळा, प्रेग्नंसीदरम्याही हे आसन करू नका.

Web Title: Shilpa shetty fitness tips : Prasarita padottanasana benefits by shilpa shetty :

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.