आजकाल पचनाच्या समस्या (digestive problems) खूप जास्त वाढल्या आहेत. कुणाला वारंवार ॲसिडिटीचा (acidity) त्रास होतो तर कुणाला सारखं सारखं कॉन्स्टीपेशन (constipation), कुणाला जेवणात थोडं जरी काही खाली- वर झालं तरी लगेच पचनाचा त्रास होऊ लागतो, तर कुणाला थोडंसं खाल्लं तरी पोट फुगल्यासारखं वाटतं. हे असे सगळे त्रास वारंवार होत राहीले की त्यातून आपोआपच आरोग्याच्या वेगवेगळ्या तक्रारी (health issue) निर्माण होतात. कारण पचनक्रिया ही सगळ्या शारिरीक क्रियांचा 'बेस' मानली जाते. त्यामुळेच पोटाच्या किंवा पचनाच्या समस्या कमी करायच्या असतील, तर त्यावरचा एक खास उपाय सांगते आहे अभिनेत्री शिल्पा शेट्टी. (special yoga to control acidity and digestion)
योगा, व्यायाम, आहार, फिटनेस याबाबत शिल्पा शेट्टी अतिशय परफेक्ट आहे. जगात ती कुठेही असली आणि कितीही व्यस्त असली तरी ती तिचं रोजचं वर्कआऊट काही सोडत नाही. म्हणूनच तर अगदी सुटीवर असताना किंवा प्रवासात असतानाही तिने कसा व्यायाम केला, याचे काही व्हिडिओ ती सोशल मिडियावर नियमितपणे टाकतच असते. नुकताच असाच एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. यावेळी ती व्हॅकेशनला गेलेली आहे, पण तरीही तिने तिचा व्यायाम सोडलेला नाही. तिच्या या पोस्टमध्ये तिने पचनाच्या वेगवेगळ्या समस्या कमी करण्यासाठी कोणती आसनं नियमितपणे केली पाहिजेत, याबाबतची माहिती दिली आहे.
अपचन- ॲसिडिटीचा त्रास कमी करणारी आसन१. एकपाद उत्तानासन (Eka Pada Uttanasana)सुरुवातीला ५ ते १० मिनिटे वार्मअप करावे आणि त्यानंतरच ही आसनं करावीत. एकपाद उत्तानासन करताना शिल्पाने त्यात काही बदल करण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्यासारखे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर पाठीवर झोपा. त्यानंतर दोन्ही गुडघ्यात वाकवून वर उचला. दोन्ही हातदेखील वरच्या बाजूने असावेत. यानंतर उजवा पाय पुढे व त्यासोबतच उजवा हात पुढे, नंतर तो पुन्हा आधीच्या पोझिशनवर आणून डावा पाय व डावा हात पुढे घ्यावा. प्रत्येक पायाने जवळपास १०- १० वेळा अशी हालचाल करावी.
२. नौकासन (naukasana)नौकासन करतानाही शिल्पा शेट्टीने त्यात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला आहे. तिने काही वेळ शुद्ध नौकासन केले आणि त्यानंतर त्यात काही बदल केले. नौकासन करण्यासाठी आधी पाठीवर झोपा. त्यानंतर दोन्ही पाय हिप्सपर्यंत उलचा तसेच डोके आणि पाठीचा भागही उचलावा. दोन्ही हात पुढे करून जमिनीला समांतर ठेवावे. अशी आसनस्थिती काही सेकंद टिकवावी. या आसनात काही वेळ थांबल्यानंतर शिल्पाने त्यातच दोन्ही हाता वर- खाली १० ते १५ वेळा हलवले.
ही आसनं नियमितपणे करण्याचे फायदे (Benefits of Eka Pada Uttanasana & naukasana)१. वरील आसनं नियमितपणे केल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.२. लिव्हर तसेच किडनीचे कार्य सुधारण्यासाठी ही आसनं फायदेशीर ठरतात.३. याशिवाय हाताचे, पायाचे आणि खांद्याचे स्नायू मजबूत करण्यासाठी ही आसनं उपयुक्त आहेत.४. ही आसने नियमितपणे केल्यास चयापचय क्रिया सुधारण्यास मदत हाेते आणि त्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी साचणे कमी होते.५. सुटलेले पोट कमी करण्यासाठी वरची तिन्ही आसनं अतिशय उपयुक्त आहेत.
असा त्रास असेल तर सावधान- ज्या लोकांना स्लिपडिस्कचा त्रास आहे, त्यांनी ही आसनं करू नयेत.- तसेच ज्या लोकांना बॅकपेन, सर्व्हायकल त्रास आहे, अशा लोकांनीही तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय ही आसनं करू नयेत.- गर्भवती स्त्रियांनीही ही आसनं करू नयेत.