Join us  

शिल्पा शेट्टी करतेय मुलासोबत व्यायाम, बघा मुलाला नेमकं शिकवतेय तरी काय- व्यायामाचा हा कोणता प्रकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2023 9:12 AM

Fitness Tips Given By Shilpa Shetty: शिल्पाने आता तिच्या मुलालाच व्यायामाचे धडे द्यायला सुरुवात केली आहे. तुम्ही पाहिला का तिचा हा व्हायरल व्हिडिओ.....

ठळक मुद्देतुम्हीही तुमच्या मुलांना सोबत घ्या आणि हा व्यायाम करा... तुम्हाला आणि मुलांना दोघांनाही मजा येईल.

व्यायामाच्या बाबतीत अभिनेत्री शिल्पा शेट्टी कधीच मागे हटत नाही. त्यामुळेच तर वयाची पन्नाशी आली तरी ती अजूनही एवढी फिट आहे. आपल्याप्रमाणेच आपल्या चाहत्यांनीही फिट रहावं, असं तिला मनापासून वाटतं. त्यामुळेच तर ती दर आठवड्याला तिच्या चाहत्यांसाठी एक फिटनेस मोटीव्हेशन देत असते. यावेळी चाहत्यांसाठी तिने जो व्यायामाचा व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये तिने तिच्या मुलाला म्हणजेच विआनला सोबत घेतलं आहे (Shilpa Shetty is doing exercise with her son Viaan). आता त्याला ती नेमके व्यायामाचे कोणते धडे गिरवायला लावते आहे, ते बघा (Fitness Tips Given By Shilpa Shetty )....

 

शिल्पा शेट्टी कोणता व्यायाम करतेय?

या व्हिडिओमध्ये शिल्पा जो व्यायाम करते आहे तो मोठाच मजेशीर आहे. लहान मुलांना एखाद्या खेळाप्रमाणे तो वाटू शकतो. मुले अगदी हसत हसत तो व्यायाम करतील.

दसऱ्यासाठी आर्टिफिशियल तोरण- फुलांच्या माळा घ्यायच्या? बघा सुंदर पर्याय, फुलं दिसतील अगदी खऱ्यासारखी

हा व्यायाम तुम्हालाही करायचा असेल तर सगळ्यात आधी जमिनीवर सतरंजी किंवा योगा मॅट टाकून बसा. त्यानंतर उजवा पाय वर करा, गुडघ्यातून वाकवा आणि उजवा तळपाय डाव्या हाताने पकडा. आता डावा पाय उजवा पाय आणि डावा हात यांच्यामधली जी जागा आहे, त्याच्या वरून एकदा आणि खालून एकदा या पद्धतीने पुढे- मागे करा.

 

आलिया भट ते जेनेलिया, अभिनेत्रींनी पुन्हा पुन्हा वापरले कपडे- नवा ट्रेण्ड काय सांगतो?

असाच व्यायाम आता डावा पाय उजव्या हाताने पकडूनही करा. यावेळी मात्र दुसऱ्या हाताने अजिबात सपोर्ट घ्यायचा नाही. किंवा दुसरा हात जमिनीलाही टेकवायचा नाही. बघा तुम्हीही तुमच्या मुलांना सोबत घ्या आणि हा व्यायाम करा... तुम्हाला आणि मुलांना दोघांनाही मजा येईल.

 

हा व्यायाम करण्याचे फायदे 

१. शिल्पा शेट्टी मुलाला सोबत घेऊन जो व्यायाम करते आहे, त्यामुळे मांडीजवळच्या स्नायूंचा व्यायाम होतो.

२. गुडघ्याची योग्य हालचाल होऊन गुडघ्यांनाही व्यायाम मिळतो.

खाऊन पाहिली कधी उपवासाची झुणका भाकरी? ही घ्या मस्त रेसिपी- फराळही होईल चमचमीत- चवदार

३. hamstrings चा त्रास असणाऱ्यांसाठी फायदेशीर.

४. हिप मसल्स मोकळे हाेण्यास फायदा होतो. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामशिल्पा शेट्टी