Lokmat Sakhi >Fitness > शिल्पा शेट्टीचं जबरदस्त 'कॅलरी किलर' वर्कआऊट! वजन पटकन कमी करायचं, तर हा व्यायाम करा..

शिल्पा शेट्टीचं जबरदस्त 'कॅलरी किलर' वर्कआऊट! वजन पटकन कमी करायचं, तर हा व्यायाम करा..

Benefits of Lunges Exercise: वाढलेल्या कॅलरी कमी कशा करायच्या, हा अनेकांपुढचा प्रश्न. त्याचंच तर नेमकं उत्तर देत आहे बॉलीवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2022 08:14 AM2022-12-14T08:14:18+5:302022-12-14T12:03:27+5:30

Benefits of Lunges Exercise: वाढलेल्या कॅलरी कमी कशा करायच्या, हा अनेकांपुढचा प्रश्न. त्याचंच तर नेमकं उत्तर देत आहे बॉलीवूडची फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी..

Shilpa Shetty is suggesting one calorie-killer exercise, What is lunges exercise? How to do lunges exercise? | शिल्पा शेट्टीचं जबरदस्त 'कॅलरी किलर' वर्कआऊट! वजन पटकन कमी करायचं, तर हा व्यायाम करा..

शिल्पा शेट्टीचं जबरदस्त 'कॅलरी किलर' वर्कआऊट! वजन पटकन कमी करायचं, तर हा व्यायाम करा..

Highlightsहे वर्कआऊट प्रामुख्याने लोअर बॉडी टोन्ड होण्यासाठी केले जाते. या व्यायामामुळे कंबर, पाय, हिप्स, मांड्या, पोटऱ्या येथील चरबी कमी होण्यास मदत होते. 

शिल्पा शेट्टी आणि तिचा फिटनेस या दोन्ही गोष्टी नेहमीच चर्चेचा विषय असतात. फिटनेस, डाएट, व्यायाम याविषयी प्रेरणा देणाऱ्या  वेगवेगळ्या पोस्ट शिल्पा नेहमीच सोशल मिडियावर शेअर करत असते. तिने नुकतीच शेअर केलेली अशीच एक पोस्ट सध्या सोशल मिडियावर गाजते आहे. यामध्ये तिने तिचा एक वर्कआऊट (lunges exercise by Shilpa Shetty) व्हिडिओ शेअर केला असून त्यालाच ती 'कॅलरी किलर' वर्कआऊट असं म्हणत आहे. हा व्यायाम नेमका काेणता आणि तो कसा करायचा, हे पाहूया.(Benefits of Lunges Exercise).

 

नेमका काेणता व्यायाम करतेय शिल्पा शेट्टी?
१. शिल्पा शेट्टी जो व्यायाम करते आहे त्याला लंज वर्कआऊट असं म्हणतात. लोअर बॉडी एक्सरसाईज किंवा लेग एक्सरसाईज म्हणून हा व्यायाम ओळखला जातो. 

२. म्हणजेच हे वर्कआऊट प्रामुख्याने लोअर बॉडी टोन्ड होण्यासाठी केले जाते. या व्यायामामुळे कंबर, पाय, हिप्स, मांड्या, पोटऱ्या येथील चरबी कमी होण्यास मदत होते. 

जेवण करताना पाणी प्यावं की नाही? काय नेमकं खरं- आरोग्यावर काय होतात परिणाम? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

३. एकाग्रता आणि स्टॅमिना वाढविण्यासाठीही या व्यायामाचा उपयोग होतो.

४. बॉडी बॅलेन्सिंगसाठी लंज वर्कआऊट उत्तम मानले जाते.

५. पाठदुखीवरही हा व्यायाम फायदेशीर ठरतो.

 

कसं करायचं लंज वर्कआऊट?
१. हा व्यायाम करण्यासाठी हातात एक तर वजन घ्यावे. किंवा दोन्ही हात कंबरेवर ठेवावेत किंवा मग दोन्ही हात छातीजवळ घेऊन नमस्काराच्या अवस्थेत जोडावेत.

२. त्यानंतर एक पाय पुढे एक मागे अशा पद्धतीने असावे. दोन्ही पायांमध्ये साधारण अडीच- तीन फुटांचे अंतर असावे.

'सुनो सजना पपीहे ने..' आजींनी हे गाणं गाताच अनेकांना आली लता दिदींची आठवण, व्हिडिओ व्हायरल

३. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यात वाकवावे. पण असे करत असताना पाठीचा कणा ताठ राहील याकडे लक्ष द्यावे.

४. मागचा पाय खाली झुकवावा पण गुडघा जमिनीला टेकणार नाही, याची काळजी घ्यावी. 

५. एका पायाने झाल्यानंतर पुन्हा मागचा पाय पुढे आणि पुढचा पाय मागे घेऊन अशाच पद्धतीने व्यायाम करावा. 

 

 

Web Title: Shilpa Shetty is suggesting one calorie-killer exercise, What is lunges exercise? How to do lunges exercise?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.