Lokmat Sakhi >Fitness > शिल्पा शेट्टीची रेसिपी 'ABS OF STEEL'; म्हणजे नेमकं काय? फिटनेससाठी आता हे काय भलतेच..

शिल्पा शेट्टीची रेसिपी 'ABS OF STEEL'; म्हणजे नेमकं काय? फिटनेससाठी आता हे काय भलतेच..

Core Strength Workout by Shilpa Shetty: सुटलेलं पोट पुन्हा शेपमध्ये (belly fat) आणायचं असेल आणि एकंदरीतच फिट राहण्याचा मंत्र हवा असेल, तर शिल्पा शेट्टीचा हा नवा व्हिडिओ एकदा बघाच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2023 12:18 PM2023-08-08T12:18:05+5:302023-08-08T12:19:05+5:30

Core Strength Workout by Shilpa Shetty: सुटलेलं पोट पुन्हा शेपमध्ये (belly fat) आणायचं असेल आणि एकंदरीतच फिट राहण्याचा मंत्र हवा असेल, तर शिल्पा शेट्टीचा हा नवा व्हिडिओ एकदा बघाच...

Shilpa Shetty shared recipe for ABS OF STEEL, Exercise for weight loss, How to reduce belly fat? How to build core strength | शिल्पा शेट्टीची रेसिपी 'ABS OF STEEL'; म्हणजे नेमकं काय? फिटनेससाठी आता हे काय भलतेच..

शिल्पा शेट्टीची रेसिपी 'ABS OF STEEL'; म्हणजे नेमकं काय? फिटनेससाठी आता हे काय भलतेच..

Highlightsसंपूर्ण शरीराच्याच फिटनेसासाठी हा व्यायाम उपयुक्त ठरतो असं शिल्पाचं म्हणणं आहे.या व्हिडिओमध्ये शिल्पाने एकूण ३ प्रकारचे व्यायाम सांगितले आहेत.

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty ) हिची फिटनेस लेव्हल खरोखरच कमालीची आहे. नियमित योगा किंवा रोजचं वर्कआऊट हेच तिच्या फिटनेसचं सिक्रेट (fitness secret of shilpa shetty) आहे. त्यामुळेच तर वयाची पन्नाशी आली, तरी अजूनही शिल्पा जो व्यायाम करते किंवा शरीराची लवचिकता दाखवते, ती बघून थक्क होतात. व्यायामाविषयी अशीच जागरुकता आपल्या चाहत्यांमध्येही यावी, याबाबत शिल्पा आग्रही आहे. त्यामुळेच ती दर सोमवारी तिच्या वर्कआऊटचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते आणि चाहत्यांनीही तिच्याप्रमाणे व्यायाम करून त्यांचा व्हिडिओ शेअर करावा, असे आवाहन करते. आता नुकताच तिने तिचा एक व्हिडिओ शेअर केला असून त्याला रेसिपी फॉर 'ABS OF STEEL', असं कॅप्शन दिलं आहे. 

 

संपूर्ण शरीराच्याच फिटनेसासाठी हा व्यायाम उपयुक्त ठरतो असं शिल्पाचं म्हणणं आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पाने एकूण ३ प्रकारचे व्यायाम सांगितले आहेत. या तिन्ही व्यायाम प्रकारात प्रामुख्याने पायांची हालचाल दिसून येते.

कडू कारल्याचं झटपट चविष्ट लोणचं करण्याची सोपी रेसिपी, कडवटपणा गायब- कारलंही लागेल आवडायला

एका ठिकाणी स्थिर बसून पायांची वर- खाली, डावीकडे- उजवीकडे हालचाल करणे, हे पहिल्या दोन प्रकारच्या व्यायामात दिसून येते. तर तिसऱ्या प्रकारच्या व्यायामात एका अंगावर झोपून पायाचा व्यायाम तिने दाखवला आहे. 


हा व्यायाम केल्याने मिळणारे फायदे
१. शरीराची लवचिकता वाढण्यासाठी उपयुक्त. 

२. पोटावरची, कंबरेवरची चरबी कमी होते.

हात- पाय खूपच काळपट दिसतात? फक्त १० रुपयांत करा एक खास उपाय- हातापायांवर येईल चमक

३. पाठीच्या कण्याचा योग्य व्यायाम.

४. कंबरदुखीसाठी फायदेशीर.

५. बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी उपयुक्त.

 

काय आहे नेमकी Recipe for ABS OF STEEL?
या व्यायामाची कृती सांगताना तिने रेसिपी हा मजेशीर शब्द वापरला आहे. तीन टप्प्यांमध्ये तिने कृती सांगितली आहे. त्यातली पहिली पायरी म्हणजे...

१. हा व्यायाम करण्यासाठी एक्सरसाईज बेंच.

गंजलेल्या नळापासून कळकट कपड्यांपर्यंत, सगळं घरच होईल चकाचक- वापरा १ खास पदार्थ

२. तिने सांगितलेला प्रत्येक व्यायाम सुरुवातीला ४५ सेंकद करावा.

३. यानंतर ४५ सेकंदाचा ब्रेक घ्यावा आणि पुन्हा पुढच्या ४५ सेकंदासाठी व्यायाम करावा. अशा पद्धतीने एक व्यायाम प्रत्येकी ४ वेळा करावा.  

 

Web Title: Shilpa Shetty shared recipe for ABS OF STEEL, Exercise for weight loss, How to reduce belly fat? How to build core strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.