Lokmat Sakhi >Fitness > शिल्पा शेट्टी सांगते शरीर- मन फिट ठेवण्यासाठी ३ योगासनं, बघा कशी करायची

शिल्पा शेट्टी सांगते शरीर- मन फिट ठेवण्यासाठी ३ योगासनं, बघा कशी करायची

Fitness Tips by Shilpa Shetty: या आठवड्यासाठी शिल्पा शेट्टीने तिच्या चाहत्यांना एक खास फिटनेस मोटीव्हेशन दिलं आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2022 08:15 AM2022-11-22T08:15:21+5:302022-11-22T08:20:02+5:30

Fitness Tips by Shilpa Shetty: या आठवड्यासाठी शिल्पा शेट्टीने तिच्या चाहत्यांना एक खास फिटनेस मोटीव्हेशन दिलं आहे.

Shilpa Shetty suggests 3 yoga poses for the fitness of body and mind too | शिल्पा शेट्टी सांगते शरीर- मन फिट ठेवण्यासाठी ३ योगासनं, बघा कशी करायची

शिल्पा शेट्टी सांगते शरीर- मन फिट ठेवण्यासाठी ३ योगासनं, बघा कशी करायची

Highlightsखांदे, हात, पाय, पाठीचा कणा, मान तसेच मांड्या या भागांचे उत्तम स्ट्रेचिंग होऊन वेटलॉस होण्यास फायदा होतो. 

मागचे काही महिने शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) तिच्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे त्रस्त होती. पण तरीही व्हीलचेअरवर बसून का असेना पण ती दर सोमवारी तिच्या चाहत्यांना एखादं तरी फिटनेस मोटीव्हेशन द्यायचीच. आता खूप दिवसांनी ती पुन्हा एकदा तिच्या पुर्वीच्या फॉर्ममध्ये आली असून तिने चाहत्यांना परत व्यायामासाठी मोटीव्हेट (Fitness Tips by Shilpa Shetty) करायला सुरुवात केली आहे. तिने तिचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामला शेअर केला असून यामध्ये तिने ३ योगासनं करायला सांगितली आहे. एकानंतर एक अशा साखळी पद्धतीने ही ३ योगासनं (yoga poses for the fitness of body and mind too) केल्यास त्याने आरोग्याला नेमके कोणते लाभ होतात, याचीही तिने सविस्तर माहिती सांगितली आहे. 

 

शिल्पा शेट्टीने कोणती आसनं केली?
१. शिल्पाने या व्हिडिओमध्ये सुरुवातीला विरभद्रासन करून दाखवले आहे. हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी दोन्ही पायांत अंतर घ्या. उजवा तळपाय बाहेरच्या बाजुने वळवा, शरीर उजव्या बाजूला वळवा आणि उजवा पाय गुडघ्यात वाकवा. डावा पाय सरळ ठेवा. दोन्ही तळहात वर उचलून एकमेकांना जोडावे आणि शक्य तितके कंबरेतून मागे जाण्याचा प्रयत्न करावा. ही स्थिती २५ ते ३० सेकंद टिकवा आणि नंतर दुसऱ्या पायानेही अशाच पद्धतीने विरभद्रासन करा.

थंडीच्या दिवसांत बदाम खायला विसरू नका, कारण..... वाचा बदाम खाण्याचे ७ जबरदस्त फायदे 

२. नंतर तिने बद्ध विरभद्रासन केले. यासाठी विरभद्रासनात जशी पायाची अवस्था आहे, तशीच ठेवा. दोन्ही हात मागच्या बाजूने घ्या आणि तळवे एकमेकांत गुंफा. यानंतर कंबरेतून वाकत डोके शक्य तेवढे खाली नेण्याचा प्रयत्न करा. ही स्थिती २५ ते ३० सेकंद टिकवा आणि नंतर दुसऱ्या बाजूनेही अशाच पद्धतीने बद्ध विरभद्रासन करा.

 

३. यानंतर शिल्पाने प्रसरिता पादोत्तानासन केले. यासाठी दोन्ही पायात शक्य तेवढे अंतर घ्या. दोन्ही हात मागच्या बाजूने घ्या आणि तळहात एकमेकांत गुंफा. यानंतर कंबरेतून खाली वाकत डोके जमिनीला टेकविण्याचा प्रयत्न करा. ही स्थिती २५ ते ३० सेकंद टिकवा.

 

ही ३ आसनं करण्याचे फायदे
१. ही आसनं केल्यामुळे nervous system ला चालना मिळते.

गाजर- बीट- टोमॅटोचं चवदार गरमागरम सूप, थंडीमध्ये प्यायला हवंच.. बघा झटपट रेसिपी

२. पोट, कंबर या भागातील शरीराच्या आत असणाऱ्या अवयवांचे कार्य अधिक चांगले होण्यास मदत होते. 

३. खांदे, हात, पाय, पाठीचा कणा, मान तसेच मांड्या या भागांचे उत्तम स्ट्रेचिंग होऊन वेटलॉस होण्यास फायदा होतो. 

४. मन शांत ठेवण्यासाठी ही आसने उपयुक्त आहेत.

 

Web Title: Shilpa Shetty suggests 3 yoga poses for the fitness of body and mind too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.