Lokmat Sakhi >Fitness > शिल्पा शेट्टीच्या फिट आणि फंटास्टिक फिगरचं रहस्य काय? पाहा आल्याचे ती करत असलेले ‘खास’ प्रयोग

शिल्पा शेट्टीच्या फिट आणि फंटास्टिक फिगरचं रहस्य काय? पाहा आल्याचे ती करत असलेले ‘खास’ प्रयोग

Shilpa Shetty's easy weight loss drink can make you lose weight : आल्याचं करा वेट लॉस ड्रिंक; थुलथुलीत पोट आणि मांड्या होईल कमी आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2024 05:01 PM2024-06-17T17:01:19+5:302024-06-17T17:03:41+5:30

Shilpa Shetty's easy weight loss drink can make you lose weight : आल्याचं करा वेट लॉस ड्रिंक; थुलथुलीत पोट आणि मांड्या होईल कमी आणि..

Shilpa Shetty's easy weight loss drink can make you lose weight | शिल्पा शेट्टीच्या फिट आणि फंटास्टिक फिगरचं रहस्य काय? पाहा आल्याचे ती करत असलेले ‘खास’ प्रयोग

शिल्पा शेट्टीच्या फिट आणि फंटास्टिक फिगरचं रहस्य काय? पाहा आल्याचे ती करत असलेले ‘खास’ प्रयोग

बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आपल्या फिटनेससाठी ओळखली जाते (Shilpa Shetty). योग, व्यायाम आणि डाएटकडे बारकाईने लक्ष देते. जर आपल्याला शिल्पासारखी कर्व्ही फिगर हवी असेल तर, वेट लॉस ड्रिंक करून पाहा (Weight Loss Drink). याला फॅट बर्निंग वेट लॉस ड्रिंक देखील म्हणतात. या वेट लॉस ड्रिंकमध्ये आल्याचा वापर होतो. आलं खाण्याचे अनेक फायदे आहेत.

आल्यामध्ये लोह, जीवनसत्त्वे, अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी यांसारखे पोषक घटक असतात (Fitness). त्यात अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म असतात. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते. शिवाय शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होते. शिल्पा शेट्टी देखील वेट लॉससाठी हे ड्रिंक पिते. पण हे वेट लॉस ड्रिंक कसं बनवायचं? पाहूयात(Shilpa Shetty's easy weight loss drink can make you lose weight).

लागणारं साहित्य

आलं

गरम पाणी

'या' पद्धतीने बनवा फॅट बर्निंग ड्रिंक

गव्हाची पोळी रोजच खातो, आता त्यात ' या ' ४ पैकी १ पदार्थ मिसळा; हाडे होतील बळकट

सर्वात आधी एका ग्लासमध्ये एक चमचा किसलेलं आलं घ्या. त्या एक ग्लास गरम पाणी घालून मिक्स करा. अशा प्रकारे शिल्पाचं फेवरीट वेट लॉस ड्रिंक पिण्यासाठी रेडी.

आलं वजन कमी करण्यास मदत करू शकते?

आल्याचा वापर प्रत्येक स्वयंपाकघरात होतो. यासंदर्भात आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल सांगतात, आरोग्यदायी फायद्यांसाठी आलं ओळखले जाते. यातील गुणधर्म चयापचय वाढवण्यास व भूक कमी करण्यास मदत करते. मुख्य म्हणजे पचन सुधारण्यासही मदत करते. त्यातील दाहक-विरोधी गुणधर्म वजन कमी करण्यास महत्वाची भूमिका बजावतात.

जेवण बंद केले, कमी खाल्ले तरी वजन वाढते! वेट लॉससाठी खाणे गरजेचे कारण..

आलं आणि लिंबू पाणी

आपण आपल्याला दिवसाची सुरुवात एक ग्लास आले आणि लिंबू पाण्याने करू शकता. फक्त आले आणि लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळा आणि ते डिटॉक्स ड्रिंक म्हणून प्या. लिंबू आणि आल्यातील गुणधर्म नक्कीच वेट लॉससाठी मदत करतील.

Web Title: Shilpa Shetty's easy weight loss drink can make you lose weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.