एखादा साधा- सोपा, सुटसुटीत व्यायामप्रकार असेल तर तो करण्यासाठी अनेक जण उत्सूक असतात. सध्या घड्याळ्याच्या काट्यावर धावणं प्रत्येकालाच गरजेचं झालं आहे. धावधाव करण्यातून मग व्यायामाला आणि फिटनेस जपायलाही अनेकांना वेळ नसतो. म्हणूनच तर थोड्या वेळात करता आणि त्यातून भरपूर फायदा होईल, असं एखादं वर्कआऊट (simple and easy workout) शोधण्याकडे अनेकांचा कल असतो. म्हणूनच तर अशा वर्कआऊटच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकासाठी अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने एक जबरदस्त योगासन सांगितलं आहे..
शिल्पा शेट्टीने तिचा फिटनेस विषयीचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मिडियावर शेअर केला असून यामध्ये तिने विपरित नौकासन (Benefits of viparit naukasana) करून दाखविले आहे. ती म्हणते की हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हे आसन कोणत्याही प्रकारचे हेवी वर्कआऊट वाटणार नाही. पण या आसनाचे फायदे मात्र जबरदस्त असून हे एक पॉवर पॅक योगासन (simple workout giving more benefits) आहे.. कंबर, मान, पोट, पाठ, मांड्या अशा सगळ्या अवयवांच्या तक्रारी दुर करणारं हे आसन अतिशय प्रभावी आहे.
कसे करायचे विपरित नौकासन (Viparit Naukasana)- विपरित नौकासन करण्यासाठी पोटावर झोपा.- यानंतर दोन्ही हात उचला आणि समोरच्या बाजूला घ्या. तसेच दोन्ही पायदेखील मांड्यांपर्यंत उचलण्याचा प्रयत्न करा.- डोके, मान आणि छातीचा काही भागही उचललेला असावा. शरीराचा सगळा भार आता मुख्यत: पोटावर असेल.- नजर समोरच्या बाजूला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ही आसनस्थिती काही काळ टिकवा.
हा झाला विपरित नौकासनाचा एक प्रकार. दुसऱ्या प्रकारात केवळ एक पाय आणि एक हात उचलून हे आसन केले जाते. हा प्रकार करण्यासाठी पोटावर झोपा. उजवा हात समोरच्या बाजूला न्या आणि पुर्ण उचला. त्यासोबतच डावा पाय मांडीपर्यंत उचला. सोबतच मान आणि छातीचा काही भागही उचललेला असावा. आता अशाच पद्धतीने डावा हात आणि उजवा पाय उचलून आसन स्थिती करा.
विपरित नौकासन करण्याचे फायदे (Benefits of viparit naukasana)- कंबर आणि पेल्विक भाग मजबूत होतो.- खांद्यांच्या बळकटीसाठी उपयुक्त.- दंड, मांड्या, हिप्सवरची वाढलेली चरबी कमी होते.- मणक्याची लवचिकता वाढविण्यासाठी मदत होते.- पचनशक्ती चांगली होण्यासाठी फायदेशीर.सूचनागरोदर स्त्रियांनी तसेच ज्यांनी नुकतीच कोणत्याही प्रकारची सर्जरी झाली आहे, त्यांनी हे आसन करू नये.