आपल्या घरात जुन्या काळापासून चपातीला तूप लावून खाण्याची पद्धत आहे. गरमागरम चपातीला नेहमीच तूप लावून खाल्ले जाते. (Roti With Ghee) तूपाच्या वासाने चपातीची चव अधिकच वाढते. पण बऱ्याच घरांमध्ये चपातीला तूप लावल्यानंतर लोकांना वाटतं की यामुळे कोलेस्टेरॉल किंवा लठ्ठपणा वाढेल. चपातीला तूप लावल्याने काय फायदे होतात किंवा काय नुकसान होते ते समजून घेऊ. (What Happens If You Eat Roti With Ghee)
भारतात जुन्या जमान्यापासूनच दूध आणि दुधापासून तयार झालेल्या पदार्थांचे सेवन केले जाते. तूप हे दूधापासून निघालेल्या सायीला गरम करून तयार केले जाते. भारतात डाळी, पराठे अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये तुपाचा वापर केला जातो. आयुर्वेदात प्रत्येक आजारांवर तूप रामबाण उपाय असल्याचं सांगितले गेले आहे. गरजेपेक्षा जास्त तुपाचे सेवन केल्याने तब्येतीचे नुकसानही होऊ शकते. (Should You Eat Chapati With Ghee)
तुपात हेल्दी फॅट्स असतात ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. तूप खाल्ल्याने त्वचेवर ग्लो येतो इतकंच नाही तर त्वचा मऊ आणि मुलायम होते. तुपामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे हाडं आणि सांधे मजबूत राहतात. तूपातील ओमेगा-3 फॅटी एसिड्स मेंदूची कार्यक्षमता वाढवतात. जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने वजन वाढतं आणि त्यात हाय कॅलरीज असतात. तुपाचे अतिप्रमाणात सेवन केल्याने शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल वाढते. तुपाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने हृदयाशी संबंधित समस्या वाढतात. पचनाच्या समस्या उद्भवल्यास गॅस, अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
डॉ. रसिका माथुर सांगतात की, जेव्हा तुम्ही योग्य प्रमाणात चपातीला तूप लावून याचे सेवन करता तेव्हा तब्येतही चांगली चांगली राहते. चपातीला तूप लावून सकाळी सकाळी तुम्ही खाल्ले तर दिवसभर तुमचं पोट भरलेलं राहील. निश्चित स्वरूपात वजनावरही याचा परिणाम होईल. जे लोक वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांनी कमी प्रमाणात तूप खावे. यामुळे डायबिटीसचा धोका कमी होतो.
जास्वंदाचं रोपं लावलंय पण त्यात फुलंच नाही? मातीत 'ही' १ सिक्रेट वस्तू मिसळा, फुलचं फुलं येतील
जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने याचा उलटा परिणाम होतो ज्यात फॅटचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या उद्भवत नाहीत. ज्यामुळे इतर समस्या उद्भवू शकतात. चपातीला तूप लावून खायचे नसेल तर कमीत कमी प्रमाणात तेल लावू शकता.