"कसौटी जिंदगी की", या मालिकेतून प्रत्येकाच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी टिव्ही इंडस्ट्रीमधील अभिनेत्री श्वेता तिवारी.श्वेता तिवारी ४४ वर्षांची असून देखील तितकीच बोल्ड अँड (Shweta Tiwari Trainer Shares Benefits Of Methi Dana) ब्युटीफूल दिसते. तिने स्वतःला खूप मेन्टेन ठेवलं आहे. तिचे चाहते आजही तिची एक झलक पाहून घायाळ होतात. मात्र, तिने स्वतःला मेन्टेन ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि पोषक आहाराची मदत घेतली आहे. त्यामुळे ती आजही तितकीच सुंदर आणि फिट दिसते(Shweta Tiwari trainer share fenugreek benefits).
श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. तिचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. ती आपल्या फॅशन सेन्स, फिटनेस आणि ग्लॅमरसाठी ओळखली जाते. श्वेता तिवारीकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणे देखील काहीवेळा कठीण होते. श्वेता तिवारीचे फिटनेस ट्रेनर प्रसाद नंदकुमार शिर्के हे नेहमीच सोशल मिडीयाच्या माध्यमातून फिटनेसचे फंडे इंस्टाग्रामच्या माध्यमातून शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवरून मेथी दाणे आपल्या डाएटमध्ये समावेश करण्याचे वेगवेगळे फायदे सांगितले आहे. मेथी दाणे आपल्या रोजच्या डाएटमध्ये घेण्याचे अनेक फायदे कोणते आणि मेथी दाणे कसे खावेत ते पाहूयात.
मेथी दाणे खाण्याचे फायदे...
१. वजन कमी करण्यासाठी :- मेथी दाण्यांचा आपल्या रोजच्या आहारात समावेश केल्याने वजन कमी होण्यास आणि शरीरातील हार्मोन्स संतुलित राहण्यास मदत होते.
२. ब्लड प्रेशर राहते नियंत्रणात :- ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण मेथी दाणे दररोज खाऊ शकतो. मेथीच्या दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणांत पोटॅशियम असते. यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. याचबरोबर, आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मेथी दाणे खाणे फायदेशीर ठरते.
सुटलेली ढेरी आत जात नाही? करा ३ सोपे एक्सरसाइज, जिम - डाएट न करताही पोट होईल सपाट...
३. डायबिटीस राहते नियंत्रणात :- ब्लड प्रेशर प्रमाणेच डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी देखील मेथी दाणे खाणे फायदेशीर ठरते. डायबिटीसच्या रुग्णांसाठी मेथी दाणे हे कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाहीत. आपल्या शरीरात रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मेथी दाणे खाणे फायदेशीर ठरते.
४. चांगल्या मेंटल हेल्थसाठी :- मेथी दाण्यांमधून भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ॲण्टी इन्फ्लामेटरी कम्पाउंड मिळतात. याचबरोबर, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात. विशेषत: व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी मेथी दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणांत असतात. ही सगळी पोषक तत्व आपली मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी फायदेशीर असते. याशिवाय, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील मेथी दाणे खाणे अधिक चांगले असते.
भेळ- मखाणे- खाकरा हेल्दी म्हणून भरपूर आणि रोज खाता? थांबा, रडायची पाळी येईल कारण...
५. स्तनपान करणाऱ्या मातांसाठी :- मेथीचे दाणे स्तनदा मातांमधील दुधाचे प्रमाण वाढवण्यास मदत करतात. मेथीच्या दाण्यांमध्ये गॅलॅकटोगॉग्स असतात जे स्तनदा मातांमधील दुधाचे प्रमाण वाढवण्यास अधिक मदत करतात.
६. केसांसाठी :- केसांतील कोंडा आणि केसांच्या मुळांना मजबूत करण्यासाठी मेथी दाणे फार उपयुक्त ठरतात. केसांसाठी मेथी दाण्यांचा वापर केल्यास केस अधिकच मजबूत होतात.
७. कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यासाठी :- कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी मेथी खाणे फायदेशीर ठरते. मेथी दाणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करुन चांगल्या कोलेस्ट्रॉल पातळी वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते.