Join us  

चाला 8 च्या आकड्यात! मनावरचा ताण कमी करणारा सिद्ध वॉक, माहिती आहे? स्ट्रेस कमी करण्याचा फॉर्म्युला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2022 5:07 PM

मनातले विचार, ताण-तणाव बाजूला ठेवून एका विशिष्ट पध्दतीनं चालणं म्हणजे (siddha walking) सिध्द वाॅकिंग. अशा नियमबध्द चालण्यानं शारीरिक आणि मानसिक आरोग्य (benefits of siddha walking) सुधारतं . 

ठळक मुद्देइंग्रजी 8 च्या आकारात चालण्याच्या नियमामुळे सिध्द्द वाॅकिंगला 8 वाॅकिंग असंही म्हणतात. घरातल्या एखाद्या खोलीत, गच्चीवर, बागेत  सिध्द वाॅकिंग केलं तरी चालतं.  सिध्द वाॅकिंग करताना सर्व लक्ष चालण्यावर केंद्रित करावं लागतं.

फिट राहाण्यासाठी सकाळी चालायला जाणे हा उत्तम व्यायाम आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी रोज सकाळी चालण्याचा खूप फायदा होतो. सकाळी चालण्याचा केवळ शारीरिक आरोग्यावरच परिणाम होतात असं नाही तर मानसिक आरोग्यासाठीही चालणे हा उत्तम व्यायाम आहे. सकाळी मोकळ्या हवेत फिरण्यामुळे मन आणि मेंदू शांत होतो. कामात एकाग्रता वाढते. चालण्याचा असाच एक फायदेशीर प्रकार म्हणजे  (siddha walking) सिध्द वाॅकिंग. अनेक देशात याला 'इन्फिनिटी वाॅकिंग' असं म्हणतात. आपल्या देशात याला 8 वाॅकिंग असं म्हणतात. इंग्रजी आठ आकड्याच्या आकारात चालणं म्हणजे 8 वाॅकिंग. सिध्दा वाॅकिंग  (how to do siddha walking) घरात, एखाद्या खोलीत, गच्चीवर किंवा बागेत देखील करता येतं.  सिध्द वाॅकिंग करताना चालता चालता ध्यानधारणाही होते. या पध्दतीच्या चालण्यात मनातले विचार, ताण तणाव विसरुन चालावं लागतं. म्हणून अशा प्रकारच्या नियमबध्द चालण्याला सिध्द वाॅकिंग (benefits of siddha walking)  असं म्हणतात.

Image: Google

सिध्द वाॅकिंगचे फायदे

1. सिध्द वाॅकिंगमुळे पचन क्रिया सुधारते. पोटाशी निगडित समस्या दूर होतात. 

2. पोट चांगलं राहिलं की वजन ही कमी होतं , रोगप्रतिकारशक्तीही वाढते. सिध्द वाॅकिंग नियमित केल्यानं वातावरण बदलल्यानं होणारे आजार होत नाहीत. 

3. उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या समस्येत सिध्द वाॅकिंग लाभदायक असतं. चालण्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहाते. तसेच शरीरातील नसा, रक्तवाहिन्या क्रियाशील आणि गतिमान राहातात.

4. सिध्द वाॅकिंगमुळे मनावरचा ताण तणाव निवळतो. सिध्द वाॅकिंग केल्यास दिवसभर उत्साह राहातो.

5. नियमित सिध्द वाॅकिंग केल्यास स्मरणशक्ती वाढते. कामातली एकाग्रता वाढते. डोकेदुखी, गुडघेदुखी, थायराॅइड, स्थूलता, संधिवात, बध्दकोष्ठता या  समस्या दूर् होतात. 

6. सिध्द वाॅकिंग करण्यामुळे नाक स्वच्छ होतं. दोन्ही नाकपुड्यातून मुक्त श्वास घेता येतो. या प्रकारे चालताना शरीरात ऑक्सिजन जास्त जातो आणि कफ बाहेर पडतो. 

7. 8 च्या आकड्यात फिरल्याने नजर सुधारते. डोळ्यांच्या सम्स्या दूर होतात. 

सिध्द वाॅकिंगचं तंत्र काय?

1. सिध्द वाॅकिंग करताना काही नियम काटेकोर पाळावे लागतात. तंत्रबध्द असं हे चालणं असल्यानंच याला सिध्द वाॅकिंग असं म्हणतात. सिद्ध वाॅकिंग जिथे करायचं आहे तिथे उजव्या आणि डाव्य दिशेने 6 फूट व्यासाचे दोन गोळे करावेत. हे गोळे इंग्रजी 8 आकड्यासारखे दिसतात. या गोळ्यांवर चालताना सर्वात आधी दक्षिण ते उत्तर दिशेला 15 मिनिटं चालावं आणि मग उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे 15 मिनिटं चालावं. म्हणजेच 15 मिनिटं सुलट आणि 15 मिनिटं उलट चालावं.

2. सिध्द वाॅकिंग करताना कोणतेच विचार मनात आणू नये. मन शांत ठेवावं. सर्व लक्ष चालण्यावर केंद्रित असावं. सिध्द वाॅकिंग करताना भराभर न चालता नियंत्रित वेगानं चालावं. चालताना मंद गतीनं श्वास सुरु ठेवावा. 

3.  सिध्द वाॅकिंग करण्याआधी पोट पूर्ण रिकामं हवं.  म्हणूनच सिध्द वाॅकिंगआधी काही खाऊ नये. पोट रिकामं नसल्यास चालताना त्रास होतो. 

4. पायात चप्पल बूट न घालता सिध्द वाॅकिंग केल्यास एक्युप्रेशर पाॅइंटवर दाब पडून इतर समस्याही सुटतात. 

5. चालण्याचा व्यायाम करताना अनेकजण मोबाइलवर गाणी ऐकत चालतात. पण सिध्द वाॅकिंग करताना जवळ मोबाइल बाळगू नये. चालताना लक्ष एकाग्र करण्यासाठी हा आवश्यक नियम आहे. 

6. दिवसातून दोन वेळा अर्धा तास सिध्द वाॅकिंग केल्यास चांगला फायदा होतो.  सिध्द वाॅकिंग केल्यानंतर सूर्यनमस्कार घातले तरी चालतात. 

 

टॅग्स :फिटनेस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्स