Join us  

ऐन तारुण्यात गुडघे दुखतात? दररोज फक्त १० मिनिटं करा खास व्यायाम, गुडघे ठणकणं होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2023 3:16 PM

Exercise That Helps To Reduce Knee Pain: ऐन तिशी- पस्तिशीतली तरुणाई आता गुडघे दुखतात (Simple exercises for knee pain) म्हणून तक्रार करते. हे टाळायचं असेल तर आतापासूनच बसल्याबसल्या काही व्यायाम करा...

ठळक मुद्देतुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला असेल तर पुढील व्यायामप्रकार करून बघा

पुर्वी बसता- उठता गुडघे कुरकुरायला लागले की वय झालं आहे, हे लक्षात यायचं. पण आता मात्र वयाचा आणि गुडघेदुखीचा  काहीही संबंध उरलेला नाही. आहारात खूप मोठा बदल झाला आहे. त्यामुळे जेवणातून पुरेपूर पोषण मिळेलच याची खात्री नाही (How to control knee pain at early age).  शिवाय वजन वाढीचा त्रासही अनेकांच्या मागे लागला आहे. यामुळे मग तब्येतीवर परिणाम होतो. कमी वयातली गुडघेदुखी हा त्यातलाच प्रकार. तुम्हालाही गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला असेल तर पुढील व्यायामप्रकार करून बघा (Simple exercises for knee pain)...

 

गुडघेदुखीसाठी व्यायामहे सगळे व्यायाम अगदी साधे सोपे असून अंथरुणावर, सोफ्यावर पाय पसरून बसल्या बसल्याही सहज करता येतील. शिवाय हे व्यायाम करण्यासाठी खूप वेळ देण्याचीही गरज नाही. हे सगळे व्यायाम इन्स्टाग्रामच्या theyoginiworld या पेजवर शेअर करण्यात आले आहेत.

 

पितळेची भांडी, जळकट कढई- तवा ५ मिनिटांत होतील चकाचक.. वाळलेल्या लिंबाचा करा खास उपयोग१. सुरुवातीला पाय पसरून जमिनीवर बसा. यानंतर एक पाय वर उचला. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या खाली पकडा. यानंतर ४५ डिग्री अंशात पायाची वर- खाली अशी हालचाल करा. अशाच पद्धतीने दुसऱ्या पायाचा व्यायाम करा.

२. दुसऱ्या प्रकारात पाय तशाच पद्धतीने पकडून ठेवा. यानंतर क्लॉकवाईज आणि ॲण्टी क्लॉकवाईज अशा पद्धतीने एकेक पाय गोलाकार दिशेने फिरवा.

 

३. यानंतर मग पाय तसेच पुढे पसरून ठेवावे. गुडघ्याखाली उशी ठेवावी आणि नंतर पाय शक्य होईल तेवढा वर उचलावा. गुडघा मात्र उशीवरून हलू देऊ नये.

४. चौथ्या व्यायाम प्रकारात पाठीवर झोपा. दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवा. यानंतर दोन्ही गुडघ्यांमध्ये उशी पकडा आणि उशीवर दोन्ही गुडघ्यांनी दाब द्या.

मुलांना सॅण्डविच खूप आवडतं, मग भरपूर भाज्या घालून करा पोळीचे सॅण्डविच! पोटभरीचा चटकमटक खाऊ

५. भिंतीला पाठ टेकवून उभे रहा. पाय थोडे तिरके ठेवा. नंतर फक्त पायाची बोटे उचलून वर खाली करा.

६. सहाव्या व्यायाम प्रकारात भिंतीचा आधार न घेता सरळ उभे राहा. एकानंतर एक असे करून दोन्ही पायांची टाच उचला.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायाम