मणका हा आपल्या शरीराला बांधून ठेवणारा आणि आधार देणारा एक महत्त्वाचा अवयव असतो. मात्र या मणक्याला काही त्रास झाला तर मात्र आपलं कामच थांबतं. पाठ, कंबर दुखणे, मणक्याला इजा होणे यांसारख्या समस्या निर्माण झाल्यास आपल्या दैनंदिन हालचालींवर मर्यादा येतात. पण आपला मणका मजबूत आहे की त्याचं वय झालं आहे हे ओळखायचं कसं? तर प्रसिद्ध योगतज्ज्ञ जूही कपूर यासाठी एक खास टेस्ट सांगतात. यामध्ये त्या एक आसन सांगतात (Simple Spine test to find out how healthy it is).
हे आपण न थकता १० सेकंद ठराविक पद्धतीने टिकवून ठेवू शकलो तर आपला मणका चांगला आहे असे समजावे. पण हे आसन टिकवणे आपल्याला अवघड गेले तर मात्र आपण कमी वयातच वयस्कर झालो हे समजून जा. आता हे आसन कोणते आणि ते टिकवून ठेवण्याचे नियम काय याविषयी जही कपूर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ती नेमकी काय ते पाहूया...
नियम काय?
१. दोन्ही हात वर घ्यावेत आणि जोडून डोक्यावर ताठ करुन नमस्कार करावा.
२. यानंतर डोक्यावर नमस्कार तसाच ठेवून कंबरेतून डाव्या बाजूला आणि उजव्या बाजुला वाकावे.
३. पाय आणि गुडघे जमिनीपासून वर उचलले जाऊ नयेत.
४. आसन करताना हात सरळ रेषेत ताठ असावेत.
५. पाठीत बाक न काढता पाठ ताठ ठेवायला हवी.
६. दोन्ही बाजूला कंबरेतून वाकल्यानंतर १० सेकंद आसन टिकवता यायला हवे.
७. आसनाच्या शेवटच्या टप्प्यात जाल तेव्हा सामान्य श्वासोच्छवास सुरू ठेवावा.
फायदे
१. या आसनामुळे मणक्याला चांगला स्ट्रेच होण्यास मदत होते.
२. शरीराच्या बाजुचे स्नायूंची ताकद वाढण्यास मदत होते.
३. स्वादुपिंड आणि यकृत यांची रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होण्यास मदत होते.
४. कंबरेचा वाढलेला भाग कमी होण्यास मदत होते
५. पेल्विक फ्लोअर चाचणी वाढवते.
टिप
पण तुम्हाला फ्रोजन शोल्डर, मानदुखी आणि सर्व्हायकल स्पॉंडीलायसिस असेल तर मात्र तुम्ही हे आसन आणि ही चाचणी करणे टाळावे.