Join us  

स्तन ओघळल्याने लाज वाटते? ब्रेस्ट लिफ्टींगसाठी १० मिनिटांत करा सोपे व्यायाम, व्हा सुडौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2024 12:16 PM

Simple Useful Exercises For Sagging Breast : काही किमान व्यायामप्रकार केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो.

स्तन हा महिलांच्या शरीरातील एक अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. स्तनपान करणे, बांधा सुडौल दिसण्यासाठी स्तन अतिशय महत्त्वाचे असतात. आपला चेहरा किंवा इतर अवयव चांगले असावेत आणि दिसावेत असे आपल्याला वाटते त्याचप्रमाणे स्तनांचा आकार आणि ठेवणही चांगली असावी यासाठी आपला अट्टाहास असतो. स्तन खूप मोठे असतील, लहान असतील किंवा खूप ओघळलेले असतील तर आपल्याला ओशाळल्यासारखे होते (Simple Useful Exercises For Sagging Breast).

स्तन खूप मोठे किंवा ओघळलेले असतील तर आपल्याला फॅशनेबल कपडेही घालता येत नाहीत. मात्र काही कारणांनी स्तन ओघळण्याची समस्या उद्भवते आणि मग नकळत आपल्या आत्मविश्वासावर त्याचा परीणाम होतो. स्तन ओघळू नयेत आणि ओघळले असतील तर ते पुन्हा पूर्ववत व्हावेत यासाठी काही किमान व्यायामप्रकार केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. हे व्यायामप्रकार कोणते आणि ते कसे करायचे पाहूया.. 

१. दोन्ही पायांत अंतर घेऊन एक पाय काटकोनात वाकवा. जो पाय वाकवला आहे त्यावर त्याच बाजूच्या हाताचा कोपरा ठेवा आणि दुसरा हात खांद्यातून दोन्ही बाजुने गोलाकार फिरवा. असेच दुसऱ्या हाताचेही करा. यामुळे ब्रेस्टच्या आजुबाजूचे स्नायू बळकट होण्यास मदत होते. 

२. बालासन आणि भुजंगासन ही दोन्हीही आसने मानेपासून मणक्याच्या स्नायूंपर्यंत दोन्हीसाठी अतिशय उपयुक्त अशी आसने आहेत. पालथे झोपून श्वास घेत कंबरेपासूनचा भाग वर उचलायचा म्हणजेच भुजंगासन आणि श्वास सोडत गुडघ्यांमधून उठून मागे पायावर बसायचे म्हणजे बालासन असे २० वेळा केल्यास फायदेशीर ठरते. 

३. उष्ट्रासन हेही ओघळणाऱ्या ब्रेस्टसाठी अतिशय उपयुक्त आसन आहे. पण हे आसन रोखून न ठेवता वज्रासनात बसायचे आणि मग कंबरेतून उठून परत पाठीतून मागे वाकायचे. २० वेळा हे आसन करायचे. 

४. पोटावर झोपायचे आणि श्वास घेत छाती, हात आणि डोक्याचा भाग वर उचलायचा. पुन्हा खाली टेकवत श्वास सोडायचा आणि पुन्हा वर उचलायचा. हातांची स्थिती व्यवस्थित ठेवल्यास छातीच्या स्नायूंना व्यायाम होण्यास मदत होते. 

याशिवाय आणखीही बरेच व्यायामप्रकार योगा एक्सपर्ट असलेल्या अंजली वारीयर यांनी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवले असून ते नियमित केल्यास ब्रेस्ट ओघळण्याच्या समस्येपासून आपण दूर राहू शकतो किंवा आधीच ओघळले असतील तरी ते नीट शेपमध्ये येण्यास मदत होऊ शकते.  

टॅग्स :फिटनेस टिप्सस्तनांची काळजीव्यायाम