Join us  

पोट सुटत चाललंय, व्यायामासाठी वेळच नसतो? रोज इतका वेळ चाला-आपोआप कमी होईल फॅट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 8:38 AM

Simple ways to get a flatter stomach without exercising : पायी चालणं हा एक कार्डिओ व्यायाम आहे. ज्यामुळे फक्त वजन कमी होत नाही तर पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होते.

पायी चालणं हा प्रत्येकाचच्या रुटीनचा एक भाग असतो. ज्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते. एका दिवसात आपण किती पाऊलं चाललो हे पाहण्यासाठी लोक आपल्या स्मार्ट वॉचचा वापर करतात. पायी चालण्याचा व्यायाम वजन कमी करण्यात आणि कॅलरीज बर्न करण्यास महत्वाची भूमिका बजावतो. (How to Lose Belly Fat Without Exercise)

पायी चालणं हा एक कार्डिओ व्यायाम आहे. ज्यामुळे फक्त वजन कमी होत नाही तर पोटाची चरबी कमी होण्यासही मदत होते. वजन कमी करण्यासाठी आणि बेली फॅट कमी करण्यासाठी किती पाऊलं चालावे असा प्रश्न अनेकांना पडतो. (Best Ways To Lose Belly Fat Without Any Exercise)

जर तुम्ही रोजच्या रुटीनमध्ये ३० मिनिटांच्या  वॉकचा समावेश केला तर तुम्ही दिवसभरात  १५० पेक्षा जास्त कॅलरीज बर्न करू शकता. तुम्ही जितक्या जास्त वेगाने चालाल तितक्या जास्त कॅलरीज  बर्न होण्यास मदत होईल. आठवड्यातील ५ दिवस वॉक केल्यानं वजन कमी होण्यास मदत होईल. (Simple ways to get a flatter stomach without exercising)

नवरात्राच्या ९ दिवसात भराभर घटेल पोटाची चरबी; फराळाचे हे पदार्थ खा-फिगर दिसेल मेंटेन

मसल्स मजबूत होतात

पायी चालल्याने मसल्स मजबूत होण्यास मदत होते. याशिवाय पोटाची  चरबी कमी होते. फिजिकली फिट राहण्यासाठी आणि हृदयाशी संबंधित  आजार टाळण्यासाठी, फिट राहण्यासाठी रोज चालणं गरजेचं आहे. फिजिकली फिट राहण्याबरोबचच हृदयाशी संबंधित आजार, डायबिटीज  यांसारख्या आजारांचा धोका टळतो. पायी चालण्याचा व्यायाम डेली रूटीनमध्ये असल्यास व्यायामाचीही गरज नाही. 

कॅलरीज बर्न होतात

तुम्हाला दर दिवशी किती कॅलरीजची आवश्यकता असते हे वेगवेगळ्या व्यक्तीवर अवलंबून आहे. तुमचं वय, लांबी, वजन यावर अवलंबून असतं की तुम्ही फिजिकली फिट आहात की नाही. दिवसभरात अर्धा ते एक तास  चालल्याने  कॅलरीज बर्न करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत होईल.

ओटी पोट-मांड्यांचा घेर वाढला? झोपण्याच्या ५ मिनिटं आधी १ काम करा; झरझर कमी होईल चरबी

मसल्सचा  विकास

जेव्हा तुम्ही कॅलरीज बर्न करून वजन कमी करता तेव्हा शरीरात फॅट्सबरोबर काही मसल्सही लॉस होतात.  मसल्समध्ये फॅट्सच्या तुलनेत मेटाबॉलिझ्म जास्त एक्टिव्ह असतो. याचा अर्थ असा की जास्त मसल्स असल्यास तुमचं शरीर कॅलरी बर्न करण्यास मदत करेल.

कोण म्हणतं फक्त बदामातून प्रोटीन मिळतं? मूठभर शेंगदाणे रोज खा, भरपूर कॅल्शियम मिळेल

सांधुदुखीवर आराम

रोज चालल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. आठवड्यातून ५ ते  ६ किलोमीटर चालल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो. वॉक केल्यानं गुडघे आणि कुल्ह्याचे मसल्स मजबूत होात.. जे ज्वाईंट्सची लवचीकता मजबूत  करताना मदत करतात. 

मूड चांगला राहतो

वॉकसारखी फिजिकल एक्टिव्हीटी केल्यानं मूड चांगला राहण्यास मदत होते. याशिवाय राग,ताण-तणाव आणि स्ट्रेस कमी होतो. वॉक करणं हा उत्तम व्यायाम आहे. रोज सकाळी चालल्याने मूड कायम चांगला राहतो आणि मानसिक आरोग्य सुधारते, मनात नकारात्मक विचार येत नाहीत. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्स