वजन वाढण्याचा (Weight Gain Problem) प्रॉब्लेम पुरूषांपासून महिलांपर्यंत सर्वांनाच जाणवतो. चरबी कमी करण्यासाठी लोक तासनतास जीममध्ये जाऊन वर्कआऊट करतात. सकाळ-संध्याकाळ वॉकिंग करतात. तर काहीजण पोटाची चरबी कमी करण्यासाठी रोज जॉगिंगला जातात. (pot kami karnyache upau) काहीजणांना व्यायामसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने चरबी कमी करणं कठीण झालंय. बेली फॅट कमी करण्यासाठी तुम्ही काही योगासनांची मदत घेऊ शकता. रोज १ योगासन करून तुम्ही पोटाच्या वाढत्या चरबीवर नियंत्रण ठेवू शकता. कोणती योगासन पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात ते पाहूया. (How to lose weight easy steops)
चक्की चालासन (Simple yogasana for belly fat lose)
चक्की चालासन एक असा योगा प्रकार आहे. जो नियमित केल्याने तुम्ही पोटाची चरबी कमी करू शकता. या व्यायामामुळे मांसपेशींवर दबाव येतो आणि काही दिवसांतच चरबी कमी होऊ लागते. हा व्यायाम प्रकार सोपा सुद्धा आहे.
हे आसन करण्यासाठी सगळ्यात आधी जमिनीवर मॅट ठेवून बसा. नंतर दोन्ही पायांच्याध्ये व्ही आकार ठेवून पाय पसरवा. हात आणि जमिनीवर ठेवून समोर नजर ठेवून दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये इंटरलॉक करून पुढच्या बाजूने झुकून चक्की चालवा. १० वेळा एंटी क्लॉकवाईज फिरवा. ५ ते १० मिनिटं तुम्ही हा व्यायाम करू शकता. (How to Lose Belly Fat at Home Without Exercise)
चक्की चालासन करण्याचे फायदे
बऱ्याच महिला मासिक पाळीच्या दिवसांत वेदनांनी त्रस्त असतात. हे आसन केल्याने मासिक पाळीत होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळत. याशिवाय पोटदुखीपासूनही आराम मिळतो. आजकाल सगळेजचण स्ट्रेसमध्ये असतात. चक्की चालासन केल्याने ताण-तणाव कमी होतो. यामुळे फक्त मेंटल स्ट्रेस कमी होत नाही तर लठ्ठपणाही दूर होतो.
पोट सुटलंय-वॉक करूनही वजन कमी होत नाही? घरी ५ मिनिटं हे व्यायाम करा, झरझर घटेल चरबी
काहीजणांना ताण-तणावाबरोबरच झोपच्या संबंधित समस्याही उद्भतात. झोप न येण्याची समस्या उद्भवल्यास चक्की चालासन हा योगा प्रकार फायदेशीर ठरू शकतो. शारीरिक हालचाली केल्यास चांगली झोप येऊ शकते.
चक्की चालासन करताना काय काळजी घ्यावी?
१) गर्भवती महिलाांनी हे योगासन करण्याआधी एक्सपर्ट्सचा सल्ला अवश्य घ्यायला हवा. कोणाच्याही सांगण्यावरून योगा करू नये.
२) जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर या योगा प्रकाराचा आपल्या दिनचर्येत समावेश करू नका.
३) पाठीच्या कण्याशी संबंधित काही समस्या असतील तर किंवा सर्जरी झाली असेल तर हे योगासन करू नका.
४) जर कोणत्याही व्यक्तीला चक्कर येणं किंवा इतर समस्या जाणवत असतील हा योगा करू नये.
५) सकाळी रिकाम्या पोटी योगा केल्याने अधिक फायदा मिळतो. सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हा व्यायाम करू शकता. फक्त व्यायाम करण्याच्या ३ ते ४ तास आधी काहीही खाऊ नका.