Late Night Sleeping Causes Health Problems : आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांची लाइफस्टाईल खूप जास्त बदलली आहे. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, सुस्त लाइफस्टाईल यासोबतच जास्तीत जास्त लोक रात्री उशीरा झोपतात. तरूणांमध्ये ही सवय अधिक बघायला मिळते. बरेच लोक रात्री उशीरापर्यंत काम करतात किंवा टीव्ही-मोबाईल बघतात, ज्यामुळे रात्री ते उशीरापर्यंत जागे राहतात.
नेहमीच रात्री उशीरापर्यंत जागे राहणं ही एक फार चुकीची सवय तर आहेच, सोबतच आरोग्यासंबंधी अनेक गंभीर समस्यांचं कारणही ठरते. अशात रात्री उशीरापर्यंत जागल्यानं आरोग्यासंबंधी कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो हे माहीत असणं फार गरजेचं आहे. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून ही चुकीची सवय बदलून तुम्ही निरोगी रहाल.
रात्री उशीरा झोपल्यानं काय समस्या होतात?
एक्सपर्ट सांगतात की, रात्री उशीरा झोपल्यानं हाय ब्लड प्रेशर आणि हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्याशिवाय इम्यूनिटी कमजोर होते. इतकंच नाही तर इन्फेक्शनचा धोका असतो, हार्मोन्स असंतुलित होतात, डायबिटीस आणि पचनासंबंधी समस्याही होऊ शकतात. मानसिक समस्यांबाबत सांगायचं तर या सवयीमुळे स्मरणशक्ती कमजोर होते आणि लक्ष केंद्रीत करण्यासही अडचण येते. रात्री उशीरा झोपल्यानं डिप्रेशन आणि तणावही वाढतो. त्याशिवाय चिडचिडपणा वाढतो. डोळ्यांखाली डार्क सर्कल येतात आणि त्वचेवर सुरकुत्याही येतात.
किती झोप घेणं गरजेचं?
एका व्यक्तीनं एका दिवसात किती झोप घ्यावी हे व्यक्तीच्या वयावर अवलंबून असतं. नवजात बाळांनी दिवसभरात साधारण १४ ते १६ तास झोप घ्यावी. तेच शाळेत जाणाऱ्या मुलांनी ९ ते १३ तास झोप घ्यावी. टीनएजर्सनी ९ ते १० तास, तरूणांनी ७ ते ९ तास झोप घ्यावी, तर वृद्धांनी सुद्धा ७ ते ९ तास झोप घ्यावी.
झोपण्याची योग्य वेळ?
सामान्यपणे कोणत्याही व्यक्तीनं रात्री १० वाजेपर्यंत झोपायला हवं. कारण आपली स्लीप सायकल सूर्योदय आणि सूर्यास्त यावर अवलंबून असते. जसा ही सूर्यास्त होतो आपल्या शरीरात मेलिटेनियम हार्मोन रिलीज होणं सुरू होतं, जे झोपेसाठी गरजेचे असतात. सकाळ होताच याचा प्रभाव संपतो. झोपेसाठी मदत करणारे हे हार्मोन्स शरीरात रात्री चार वाजता जास्त रिलीज होतात. याच वेळी चांगली झोप येते.