Walking Speed : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज पायी चालणं फार महत्वाचं मानला जातं. पायी चालणं ही एक सोपी आणि परिपूर्ण एक्सरसाईज मानली जाते. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, केवळ पायी चालून फायदा नसतो तर चालण्याचा स्पीडही तेवढाच महत्वाचा असतो. तुमच्या चालण्याच्या स्पीडवरून तुमच्या आरोग्याबाबत बरंच काही सांगितलं जातं. जर तुम्ही रोज स्पीडनं चालत नसाल, तर फायदे मिळण्याऐवजी तुमचं नुकसानच होऊ शकतं. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा करण्यात आला आहे की, स्लो चालण्यानं तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वॉक करताना स्पीडकडेही लक्ष द्या.
असोसिएशन ऑफ न्यूरोकॉगनिटिव अॅन्ड फिजिकल फंक्शनच्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जर तुमच्या चालण्याची स्पीड कमी असेल तर तुम्ही वेळेआधीच म्हातारे होऊ शकता. तसेच स्लो स्पीडनं वॉक केल्यानं तुमची मसल्स पॉवरही कमजोर होऊ लागते.
वेगानं चालण्याचे फायदे
या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, स्लो स्पीडनं चालणाऱ्यांच्या तुलनेत वेगानं चालणारे लोक जास्त हेल्दी राहतात. रिसर्चमध्ये आढळलं की, जे लोक चांगल्या स्पीडनं चालतात त्यांची कार्डियोवस्कुलर हेल्थ स्लो चालणाऱ्यांच्या तुलनेत खूप मजबूत असते. अशा लोकांना हृदयरोगांचा धोका कमी असतो. तसेच स्पीडनं चालल्यानं फुप्फुसांच्या कामातही सुधारणा होते.
वॉक करून दिसाल आणखी तरूण
रिसर्चमधून अशीही बाब समोर आली आहे की, जे लोक रोज चांगल्या स्पीडनं वॉक करतात, ते लोक इतरांच्या तुलनेत अधिक तरूण दिसतात. म्हणजे जे लोक रोज वॉक करतात ते वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यास सक्षम असतात. तेच तुम्ही वॉक करत नसाल किंवा स्पीडनं वॉक करत नसाल तर तुम्ही कमी वयातच जास्त वृद्ध दिसू लागाल. त्यासोबतच रोज स्पीडनं वॉक केल्यानं तुमचं वजनही कमी होतं. शरीर जास्त अॅक्टिव राहतं. जर तुम्ही रनिंग करत असाल तर जास्त हेल्दी आणि अॅक्टिव राहता. रनिंग केल्यानं हृदय निरोगी राहतं आणि शरीर सतर्क राहतं.