Lokmat Sakhi >Fitness > थुलथुलीत पोट-बेढप शरीरामुळे त्रस्त? जीवनशैलीत करा ५ छोटेसे बदल-मिळेल परफेक्ट मनासरखी फिगर

थुलथुलीत पोट-बेढप शरीरामुळे त्रस्त? जीवनशैलीत करा ५ छोटेसे बदल-मिळेल परफेक्ट मनासरखी फिगर

Small Lifestyle Changes To Kickstart Your Weight Loss : काही केल्या वजन कमी होत नसेल तर, रोज नकळत घडणाऱ्या ५ चुका टाळाच-वजन कमी होणारच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2024 01:58 PM2024-02-18T13:58:35+5:302024-02-18T13:59:34+5:30

Small Lifestyle Changes To Kickstart Your Weight Loss : काही केल्या वजन कमी होत नसेल तर, रोज नकळत घडणाऱ्या ५ चुका टाळाच-वजन कमी होणारच..

Small Lifestyle Changes To Kickstart Your Weight Loss | थुलथुलीत पोट-बेढप शरीरामुळे त्रस्त? जीवनशैलीत करा ५ छोटेसे बदल-मिळेल परफेक्ट मनासरखी फिगर

थुलथुलीत पोट-बेढप शरीरामुळे त्रस्त? जीवनशैलीत करा ५ छोटेसे बदल-मिळेल परफेक्ट मनासरखी फिगर

लठ्ठपणाच्या त्रासापासून अनेक जण त्रस्त आहे. यामुळे फक्त शरीर बेढप दिसत नसून, मधुमेह, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही वाढतो. यासह आत्मविश्वास कमकुवत होऊ लागतो. वजन कमी करण्याच्या नादात आपण अनेक उत्पादनांचा वापर करतो. पण उत्पादनांच्या वापरामुळे त्याचे साईड इफेक्ट्स शरीरावर दिसून येतात (Fitness). बऱ्याचदा जिम आणि डाएट काटेकोरपणे फॉलो करूनही वजन कमी होत नाही. नकळत घडणाऱ्या काही चुकांमुळे वजन घटण्याऐवजी वाढते (Weight Loss Tips).

जर आपले देखील वजन कमी होण्याऐवजी वाढत असेल तर, आयुर्वेदिक डॉक्टर डॉ. निजिला एच आर यांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करून पाहा. या छोट्या टिप्समुळे नक्कीच वजन घटेल(Small Lifestyle Changes To Kickstart Your Weight Loss).

वजन कमी करण्यासाठी कोणते बदल करणे गरजेचं?

नियमित व्यायाम

डॉ. निजिला एचआर सांगतात, नियमित व्यायाम केल्याने वजन झपाट्याने कमी होते. व्यायामामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटते. वजन कमी करण्यासाठी आपण नियमित योगासने, व्यायाम, वॉकिंग आणि जॉगिंग यासारखे व्यायामाचे प्रकार करून पाहू शकता. वजन कमी करण्यासाठी आपण यापैकी एक व्यायाम ३० मिनिटांसाठी करू शकता.

बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल

मध आणि पाणी

वजन कमी करण्यासाठी सकाळी नियमित कोमट पाण्यात मध घालून प्या. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध घालून मिक्स करा. नियमित रिकाम्या पोटी मधाचे पाणी प्यायल्याने पोट भरल्यासारखे वाटते. ज्यामुळे आपण जास्त अन्न खाणे टाळतो. यासह उलट-सुलट पदार्थ खाण्याची इच्छा देखील कमी होते.

त्रिफळा चूर्ण

त्रिफळा चूर्ण शरीरातील मेटाबॉलिज्म वाढवते, जेव्हा चयापचय बुस्ट होते, तेव्हा शरीरातील चरबी कमी होते. एवढेच नाही तर त्रिफळा चूर्ण शरीरातील अतिरिक्त चरबीचे ऊर्जेत रूपांतर करून वजन कमी करण्यास मदत करते. यासाठी एक चमचा त्रिफळा पावडर एका ग्लास पाण्यात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी उठल्यानंतर या पाण्यात थोडे कोमट पाणी घालून प्या.

रामदेव बाबा सांगतात, वेट लॉसचा अचूक फॉर्म्युला, फॉलो करा फक्त ४ रुल्स; वजन घटणारच..

ताक

ताक लठ्ठपणा कमी करण्यास मदत करू शकते. एक कप ताकात काळी मिरी, पिंपळी, सुंठ आणि सैंधव मीठ घालून मिक्स करा. नियमित ताकात या गोष्टी मिक्स करून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. ताकामध्ये गुड बॅक्टेरिया, प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी१२ आणि डी असते. एक कप ताकामध्ये अंदाजे ९८ कॅलरीज असतात. कॅलरी कमी असल्याने ताक वजन कमी करण्यास मदत करते.

मिलेट्स

बार्ली, कुलथी, बाजरी यासारख्या धान्यांमध्ये वजन कमी करणारे घटक असतात. बाजरीमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, मँगनीज, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. हाय फायबरमुळे पोट दीर्घकाळापर्यंत भरल्यासारखे वाटते, जे भूक नियंत्रित करण्यास मदत करते. 

Web Title: Small Lifestyle Changes To Kickstart Your Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.