Join us  

'कोशिश जारी है',...म्हणत स्मृती ईराणींनी शेअर केले वर्कआऊट सेशन; फोटो पाहून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 7:07 PM

Smriti irani : अलिकडे त्यांनी इंस्टाग्रामवर जीममधला घाम गाळतानाचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये स्मृती या  वजन उचलताना दिसून येत आहेत. 

ठळक मुद्देगेल्या महिन्यातही स्मृती इराणींनी इन्स्टाग्राम स्टोरीजवर त्यांच्या वर्कआउट सत्रातील आणखी एक फोटो शेअर केला होता

केंद्रीय मंत्री स्मृती ईरानी (Union Minister Smriti Irani) सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असतात. नेहमीच आपल्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून स्मृती फोटो शेअर करत असतात. त्यांच्या पोस्ट लोकांना तुफान आवडतात कारण अनेकदा त्यांच्या पोस्ट लोकांसाठी प्रेरणादायी ठरतात. अलिकडे त्यांनी इंस्टाग्रामवर जीममधला घाम गाळतानाचा एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये स्मृती या  वजन उचलताना दिसून येत आहेत. 

शुक्रवारच्या सकाळची हेल्दी सुरूवात स्मृती यांनी केली. त्यांनी आपलाा वर्कआऊट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. स्मृती इराणी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ग्रे ट्रॅक पँट परिधान केलेली तुम्ही पाहू शकता, फोटोसह त्यांनी कॅप्शन दिले आहे, "प्रयत्न सुरू आहेत."

गेल्या महिन्यातही स्मृती इराणींनी इन्स्टाग्राम स्टोरीजवर त्यांच्या वर्कआउट सत्रातील आणखी एक फोटो शेअर केला होता. या फोटोसह त्याने कॅप्शन दिले, "सेल्फ केअर संडे." जर तुम्ही देखील फिटनेससाठी प्रेरणा शोधत असाल, तर तुम्ही निश्चितपणे यासाठी स्मृती इराणींचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवू शकता.

स्मृती इराणींच्या वेटलॉस काढ्याची चर्चा

काही दिवसांपुर्वीच ॲन्कर मनिष पॉल यांनी स्मृती इराणी यांची भेट घेतली होती. या भेटीचे फोटो मनिष यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड केले होते. या फोटोमध्ये मनिष यांच्या हातात एक काढा असलेला एक कप दिसत होता आणि बाजूलाच स्मृती इराणी यादेखील बसल्या होत्या. या फोटोमध्ये असणारी वैशिष्ट्यपुर्ण बाब म्हणजे यामध्ये स्मृती इराणी यांचे वजन खूपच कमी झालेले दिसत आहे. वजन कमी झाल्यामुळे साहजिकच त्या पहिल्यापेक्षा अधिक यंग दिसू लागल्या आहेत आणि या बदलाच्या मागे काढा पिणे हे रहस्य लपलेले आहे,  असे देखील  मनिष यांनी स्पष्ट केले होते.  

आपल्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारली की आपोआपच शरीरात फॅट तयार होण्याचे प्रमाण कमी होते आणि वजन नियंत्रणात राहते. म्हणून शरीरातील चयापचय क्रिया सुधारा असे औरंगाबाद येथील डॉ. पद्मा तोष्णीवाल यांनी सांगितले आहे. चयापचय क्रिया सुधारण्यासाठी सुंठ घालून केलेला काढा फायदेशीर ठरू शकतो. हा काढा तयार करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे. यामध्ये दोन लिटर पाणी एक ते दोन चमचे सुंठ घालून उकळायचे आणि दिवसभरात थोडे थोडे पिऊन संपवायचे. एक महिनाभरच हा उपाय करावा, त्यापेक्षा अधिक नको, असेही डॉ. तोष्णीवाल यांनी सांगितले. 

टॅग्स :हेल्थ टिप्सआरोग्यफिटनेस टिप्सस्मृती इराणी