साधं वरण खाल्लं तरी अनेकांना पोटदुखीचा त्रास होतो. पचनाच्या समस्या उद्भवतात. अनेकांना ड्रायफ्रुट्स खाल्ल्यानंतरही गॅस झाल्याप्रमाणे जाणववतं. (Soak at Night and Eat 5 Foods in The Morning) रात्रीच्यावेळी दाळ किंवा इतर पदार्थ पाण्यात भिजवून सकाळी याचे सेवन केले तर तब्येतीच्या समस्या टाळता येतात आणि काही पदार्थ रात्री भिजवून सकाळी खाल्ल्याने त्यातील पोषक तत्व वाढतात. (Things after soaking them overnight nutritional value increases) असे कोणते पदार्थ आहेत ज्याच्या सेवनाने शरीराच्या समस्या टाळता येतील ते पाहूया. (foods you should always soak before eating)
भिजवलेल्या ळी आणि ड्रायफ्रुट्सचा आहारात समावेश का करावा?
१) ड्रायफ्रुट्स पाण्यात भिजवल्याने आयर्न, जिंक, व्हिटामीन बी-१२, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स मिळतात. ज्यामुळे शरीराला फायदे मिळतात.
२) डाळी, बदाम रात्री भिजवून सकाळी खाल्ल्याने त्यातील फायटिक एसिड कमी होते.
३) पॉलिफेनोल्ससारखे एंजाइम्स कमी होतात. ज्यामुळे पोटात गॅस तयार होणं यांसारख्या समस्या कमी होतात.
४) डाळी आधी पाण्यात भिजवल्यामुळे शिजायला कमी वेळ लागतो आणि गॅसचीही बचत होते.
पाण्यात भिजवून सकाळी डाळी, ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने काय होते.
१) आहारतज्ज्ञांच्यामते बीन्स रात्री भिजवून खाल्ल्यास फायदेशीर ठरते. यात फायटिक एसिड आणि फायटेट्स् नावाचे एसिड असते ज्याचे प्रमाण कमी होते. शरीरातील सूज आणि गॅस तयार होणं कमी होतं. याशिवाय पोषक तत्वांच्या पोषणास मदत होते.
रात्रीच्या जेवणात चपाती खावी की भात? वजन कमी करण्यासाठी काय उत्तम, तज्ज्ञ सांगतात...
२) ओट्स रात्री पाण्यात भिजवून खाल्ल्याने शरीराला फायदे मिळतात. इतकंच नाही तर तुम्ही रात्री पाण्यात भिजवून खाल्ल्यास त्यातील स्टार्च आणि एसिड कमी होते. असं केल्याने ओट्स सतत शिजवावे लागत नाही.
३) बदाम रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी खाल्ल्याने फॅट ब्रेकडाऊन होण्यास मदत होते. न्युट्रिशन्स जास्तीत जास्त प्रमाणात मिळतात आणि पचनक्रिया चांगली राहते.
कुकरमध्ये १० मिनिटांत करा वाटाणा-बटाट्याची भाजी; सोपी चमचमीत रेसिपी-चव एकदम भन्नाट
४) रात्रभर पाण्यात भिजवलेलं जीरं सकाळी खाल्ल्याने मेटाबॉलिझ्म वाढतो. उल्टी होणं, गॅस यांसारख्या समस्या दूर होतात. लिव्हर डिटॉक्स होण्यास मदत होते.
५) मनूके रात्रभर भिजवून सकाळी खाल्ल्याने इम्यून सिस्टीम बुस्ट होण्यास मदत होते. याशिवाय रोगप्रतिकारकशक्ती चांगली राहते. गॅस, पोटदुखी समस्या टळते आणि पचनक्रिया चांगली राहते.