Join us  

सोहा अली खानचे गाजलेले स्टेअर्स वर्कआउट, हा व्यायामाचा कोणता प्रकार? काय त्याचं टेक्निक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2021 5:08 PM

तुम्ही घरात असा किंवा घराच्या बाहेर अगदी तुमच्या इमारतीच्या जिन्यांच्या पायर्‍यांवर उभ्या असलात तरी व्यायाम होतो. हे खोटं वाटत असेल तर अभिनेत्री सोहा अली खानच्या इंस्टाग्रामवरील पोस्ट पाहा. त्यात तुम्हाला सोहा अली खान पायर्‍यांचा वापर करत व्यायाम करताना दिसते. पायर्‍यांवरील व्यायाम विविध पध्द्तीने करता येतो हे सोहाच्या स्टेअर्स वर्कआउटमुळे लक्षात येतं.

ठळक मुद्देइंस्टाग्रामवरील व्हिडीओद्वारे सोहाने स्टेअर्स वर्कआउटचे तीन प्रकार सांगितले आहेत.स्टेअर्स वर्कआउटमुळे वजन कमी होतंच. हे व्यायाम प्रकार स्क्वॉटस आणि प्लॅन्क पोझिशनमधे केल्यास कॅलरीज बर्न होतात, चरबी वेगानं घटते. शरीरातील कॅलरीज बर्न होण्यासाठी आठवड्यातून किमान 2-3 वेळा 20- 25 मिनिटं स्टेअर्स वर्कआउट करण्याच सल्ला फिटनेस तज्ज्ञ देतात.

 वजन कमी करणं, वजन नियंत्रित ठेवणं यासाठी प्रयत्न करण्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा खूप जास्त वाढलं आहे. जिममधे जाऊनच व्यायाम होतो असा समज असलेले जसे आहेत तसेच हौशीने जिम लावून जिमला टप्पे देणारेही खूप आहेत. आपला मूळ उद्देश जर वजन कमी करण्याचा असेल, फिट राहाण्याचा असेल तर जिमचा प्रश्न येतोच कुठे? आज जिमला गेले नाही म्हणून व्यायाम केला नाही हे व्यायाम न करण्याचं कारण असूच शकत नाही. तुम्ही घरात असा किंवा घराच्या बाहेर अगदी तुमच्या इमारतीच्या जिन्यांच्या पायर्‍यांवर उभ्या असलात तरी व्यायाम होतो. हे खोटं वाटत असेल तर अभिनेत्री सोहा अली खानच्या इंस्टाग्रामवरील पोस्ट पाहा. त्यात तुम्हाला सोहा अली खान पायर्‍यांचा वापर करत व्यायाम करताना दिसेल. याचाच अर्थ व्यायाम करण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणीच जाण्याचं कारण नाही. घराच्या, इमारतीच्या पायर्‍यांचा वापर करत उत्तम व्यायाम करता येतो हे सोहा अली खाननं दाखवून दिलं आहे.

Image: Google

विशिष्ट गतीनं पायर्‍या चढणं उतरणं या व्यायामामुळेही वजनावर चांगला परिणाम होतो. पायर्‍यांचा वापर करत आणखी कोणते व्यायाम करता येतात हे सोहा अली खानचा हा व्हिडीओ पाहून लक्षात येतं. सोहा अली खाननं पायर्‍यांचा वापर करत चार प्रकारचे व्यायाम केले आहेत.

पोटाकडील स्नायुंचा म्हणजे कोअरचा आणि मांड्या आणि पायांच्या स्नायुंचा व्यायाम होण्यासाठी स्क्वॉटस केले जातात. सोहाने हे स्क्वॉटस पायर्‍यांचा वापर करत केले आहेत. सोहा स्क्वॉटसच्या पोझिशनमधे 10-15 पायर्‍या चढते आणि स्क्वॉटस पोझिशनमधे उतरते.

पायर्‍यांवरील तिचा दुसरा व्यायाम प्रकार म्हणजे वरच्या पायरीवर दोन्ही पाय ठेवून आणि उंचीप्रमाणे दोन ते तीन पायर्‍या सोडून खालच्या पायरीवर दोन्ही हात ठेवून प्लॅंक स्थितीत किमान दोन मिनिटं थांबणं. या प्रकाराचे तीन सेट करण्याचा उत्तम परिणाम होतो.

Image: Google

तिसर्‍या प्रकारात सोहा वरच्या पायरीवरुन प्लॅंक स्थितीत रांगत खाली उतरते. पायर्‍यांवरील व्यायामाचे हे तीन प्रकार केल्याने कोअरचा, मांड्या आणि पायांच्या स्नायुंचा व्यायाम होतो. तसेच हाताच्या आणि दंडाच्या स्नायुंचा व्यायाम होतो. केवळ वजन कमी करण्यासाठी म्हणून नाही तर फिटनेस राखण्यासाठी तसेच शरीराला सुडौल आकार प्राप्त होण्यासाठी पायर्‍यांवरचे हे व्यायाम प्रकार सोहा करते. शरीराला सुडौलता किंवा जिममधील उपकरणं वापरुनच येते, बॉडी टोन ही फक्त जीममधे जाऊनच होते हा समज विना उपकरण आणि विना जिमचा सोहाचा पायर्‍यांवरील व्यायाम प्रकारांनी दूर होतो.

https://www.instagram.com/reel/CWrypPkDUSf/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" data-instgrm-version="14" >
https://www.instagram.com/reel/CWrypPkDUSf/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" target="_blank">
https://www.w3.org/2000/svg" xmlns:xlink="https://www.w3.org/1999/xlink">
View this post on Instagram

https://www.instagram.com/reel/CWrypPkDUSf/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading" target="_blank">A post shared by Soha (@sakpataudi)

सोहाने इन्स्टावर आपला पायर्‍यांवरचा व्हिडीओ पोस्ट करताना जिन्याचा उपयोग करा पण नेहमीच्या पध्दतीने नाही असं सांगणारं हेडिंग दिलं आहे. ‘ टेक द स्टेअर्स! बट नॉट इन द युजवल वे’ असं हेडिंग दिलं आहे. हे हेडिंगच जिना म्हणजे आपल्या व्यायामाचं उत्तम साधन आहे, असू शकतं हे सांगून जातं.

एकीकडे जिममधे जाऊन व्यायाम करण्याचा अट्टाहास आणि दुसरीकडे स्वत:च्या पहिल्या मजल्यावरील घरात जाण्यासाठीही लिफ्टचा उपयोग असा विरोधाभास आजच्या जीवनशैलीत दिसतो. तो दूर करायचा असेल तर आहे त्या साधन आणि सुविधांचा उपयोग करुन व्यायाम करण्याची पध्दत शिकून घ्यायला हवी. स्टेअर्स वर्कआउट हा व्यायामाचा एक प्रकार आहेच. पण आपल्या रोजच्या जीवनशैलीत लिफ्ट टाळून पायर्‍या चढून उतरुन गेलं तरी व्यायाम होवू शकतो हे समजून घेतलं तरी व्यायामासाठी वेळ मिळत नाही हे सांगण्याची वेळ येणार नाही, तसेच पायर्‍या हेच व्यायामाचं साधन मानलं तर व्यायामासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज उरणार नाही.

Image: Google

स्टेअर्स वर्कआउट केल्यानं काय होतं?

सोहा अली खाननं पोस्ट केलेला व्हिडीओ बघून पायर्‍यांवरचे विविध व्यायाम प्रकार कळतीलच पण सोबत फिटनेस तज्ज्ञांनी सांगितलेले पायर्‍यांवरच्या व्यायामाचे फायदेही वाचा, म्हणजे पायर्‍यांवरच्या व्यायामावर नक्कीच विश्वास बसेल.1. पायर्‍या चढ-उतार करणं हा विना उपकरणाचा व्यायाम प्रकार आहे. या व्यायामानं हदयाचे ठोके वाढतात, शरीरातील कॅलरीज बर्न होतात. कॅलरी बर्न होण्यासाठी फिटनेस तज्ज्ञ आठवड्यातून 2-3 वेळा किमान 20-25 मिनिटं स्टेअर्स वर्कआउट करण्याचा सल्ला देतात.2. स्टेअर्स वर्कआउटमुळे शरीरावरील चरबी लवकर कमी होते. स्क्वॉटस पोझिशनमधे पायर्‍या चढल्या उतरल्याने ओटीपोटावरची, मांड्यावरची चरबी लवकर कमी होते.3. स्टेअर्स वर्कआउट विथ स्क्वॉटस पोझिशनमुळे ओटीपोटाचे स्नायू मजबूत होतात.4. पायांचे स्नायू बळकट होण्यासाठी, त्यांना बांधेसूदपणा येण्यासाठी स्टेअर्स वर्कआउट फायदेशीर ठरतो.

Image: Google

5. कुल्हे आणि मांड्यांवरची चरबी कमी होते.6. स्टेअर्स वर्कआउटमुळे पायांच्या रक्तवाहिन्या लवचिक होतात. पायांकडचा रक्तप्रवाह सुधारतो. यामुळे पायांना सूज येणं, पाय दुखणं , व्हेरिकोज व्हेन्ससारख्या समस्यांचा धोका टाळला जातो.7. फुप्सुसांचा आणि हदयाचा प्रभावी व्यायाम होण्यासाठी स्टेअर्स वर्कआउट फायदेशीर ठरतो.8. पायर्‍यांवर प्लॅंक पोझिशनमधे राहिल्याने कोअर स्नायुंची ताकद वाढते, ते लवचिक होतात.9. स्टेअर्स वर्कआउट हा मुळातच चरबी कमी करणारा व्यायाम आहेच पण पायर्‍या स्क्वॉटस पोझिशनमधे चढ उतार केल्याने वजन वेगानं कमी होतं.