Join us  

सोहा अली खानचं जबरदस्त वर्कआऊट, फिटनेस टिकविण्यासाठी पहा करते किती अवघड व्यायाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2022 8:10 AM

Fitness Tips By Soha Ali Khan: अभिनेत्री सोहा अली खानचे वर्कआऊट व्हिडिओ हा नेहमीच एक चर्चेचा विषय असतो. आता सध्या तिचा असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर गाजतो आहे.

ठळक मुद्दे हे सगळे व्यायाम हार्डकोअर वर्कआऊट प्रकारातले असून मसल्स स्ट्रेंथनिंगसाठी आहेत. शिवाय बॉडीपोश्चर सुधारण्यासाठीही या व्यायामांचा उपयोग होतो.

एरवी आपण ज्या अभिनेत्रींचे वर्कआऊट व्हिडिओ (viral video) सोशल मिडियावर पाहतो, त्यांचे व्यायाम आपल्याला बऱ्यापैकी घरी करता येण्यासारखे असतात. कारण ते थोडेतरी सोपे असतात किंवा ते आपल्याला किमान माहिती तरी असतात. पण सोहा अली खानचं वर्कआऊट हा मुळीच चेष्टेचा विषय नाही. कारण ती व्यायामाचे एवढे अवघड प्रकार करताना दिसते की ज्यांचा फिटनेस उत्तम आहे किंवा ज्यांना नियमित व्यायाम करण्याची सवय आहे, अशा मंडळींनाच सोहासारखं वर्कआऊट (Soha Ali Khan's  workout video) जमू शकतं. आता सध्या व्हायरल झालेला तिचा वर्कआऊट व्हिडिओही असाच अवघड आहे.

 

सोहाने इन्स्टाग्रामवर नुकताच हा व्हिडिओ पोस्ट केला असून त्याला Just hanging around with.... असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये काही व्यायाम ती बेल्टच्या मदतीने करते आहे तर काही व्यायामामध्ये ती वेटलिफ्टिंग करताना दिसते आहे.

केस गळाल्याने हेअर लाईन मागे जाऊन कपाळ मोठं दिसतं? केस पुन्हा वाढविणारा खास उपाय

बेल्टच्या मदतीने ती जे काही व्यायाम करते आहे, ते खरोखर अवघड आहेत. एका व्यायामात तर तिने बेल्टमध्ये पाय अडकवले आहेत. समोर एक बेंच असून हाताने त्यावर शरीराचा तोल सांभाळला आहे. आणि त्या बेल्टमध्ये पाय अडकवून ती ते सायकलिंग केल्याप्रमाणे जोरजोरात हलवते आहे.

 

दुसरा जो वेटलिफ्टिंगचा व्यायाम ती करतेय, त्यात दोन्ही हातात वेट धरून ती ते जोरजाेरात खाली- वर करते आहे.

करिश्मा कपूरला आवडली मोतिया रंगाची थ्रेडवर्क साडी, साडीवरची नाजूक नक्षी अशी की..

सोहाचे हे सगळे व्यायाम हार्डकोअर वर्कआऊट प्रकारातले असून मसल्स स्ट्रेंथनिंगसाठी आहेत. शिवाय बॉडीपोश्चर सुधारण्यासाठीही या व्यायामांचा उपयोग होतो.

 

टॅग्स :फिटनेस टिप्सव्यायामसोहा अली खान