Lokmat Sakhi >Fitness > वन स्टेप @ अ टाइम, सोहा अली खानचा मंत्र! भन्नाट व्यायाम करा, पाहा व्हिडीओ..

वन स्टेप @ अ टाइम, सोहा अली खानचा मंत्र! भन्नाट व्यायाम करा, पाहा व्हिडीओ..

Fitness: सैफ अली खानची (Saif Ali Khan) बहिण सोहा अली खान (Soha Ali Khan) हिचा एक व्हिडियो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (social viral)होत आहे. तुम्हाला जर तुमचं नेहमीचं वर्कआऊट (workout) करून कंटाळा आला असेल, तर तिचा हा व्यायामाचा भन्नाट प्रकार नक्कीच ट्राय करून पहा.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 01:21 PM2021-11-25T13:21:14+5:302021-11-25T13:24:49+5:30

Fitness: सैफ अली खानची (Saif Ali Khan) बहिण सोहा अली खान (Soha Ali Khan) हिचा एक व्हिडियो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (social viral)होत आहे. तुम्हाला जर तुमचं नेहमीचं वर्कआऊट (workout) करून कंटाळा आला असेल, तर तिचा हा व्यायामाचा भन्नाट प्रकार नक्कीच ट्राय करून पहा.. 

Soha Ali Khan's stair workout, new idea for fitness, must see video of her workout | वन स्टेप @ अ टाइम, सोहा अली खानचा मंत्र! भन्नाट व्यायाम करा, पाहा व्हिडीओ..

वन स्टेप @ अ टाइम, सोहा अली खानचा मंत्र! भन्नाट व्यायाम करा, पाहा व्हिडीओ..

Highlightsकाही जणांना हा व्हिडियो आवडला आहे, तर काही जणांनी चक्क सोहाची खिल्ली उडवली आहे.

सोहा अली खान सध्या चित्रपटांमधून जणू काही गायबच झाली आहे. अभिनेता कुणाल खेमूसोबत (Kunal Khemu)लग्न केलं आणि चित्रपटांना रामराम करून ती तिच्या संसारात चांगलीच रमली. सोहा सोशल मिडियावर तशी बरीच ॲक्टीव्ह असते. चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा तिचा हा प्रयत्न नक्कीच चांगला आहे. सध्या सोहा तिच्या मुलीच्या संगोपनात बिझी असली तरी तिचा फिटनेस मात्र तिने कमालीचा सांभाळला आहे, हे तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या व्हिडियोतून दिसून येते. 

 

सोहा अली खानने तिचा एक व्हिडियो इन्स्टाग्रामवर (instagram)नुकताच शेअर केला आहे. यामध्ये ती स्टेअर वर्कआऊट (stair workout)करताना दिसत आहे. स्टेअर वर्कआऊट म्हणजे पायऱ्यांच्या मदतीने केलेला व्यायाम. आता घरात जर जीना असेल, तर दिवसभरातून पायऱ्या चढताना किंवा उतरताना आपला भरपूर व्यायाम होऊन जातो. पण हा व्यायाम आपली बॉडी टोन्ड ठेवण्यासाठी पुरेसा नसतो. या व्हिडियोमध्ये सारा खूप वेगळ्या पद्धतीने पायऱ्यांचे वर्कआऊट करते आहे. हे वर्कआऊट निश्चितच बॉडी शेपमध्ये आणण्यासाठी आणि तो मेंटेन ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल असाच आहे. 

मिलिंद सोमण म्हणतो, पेट भर के खाओ, फिट रहो! 'ही' पथ्यं मात्र विसरू नकाच..

 

- या व्हिडियोमध्ये सोहाने एकूण तीन स्टेअर वर्कआऊट सांगितले आहेत. यापैकी पहिल्या वर्कआऊटमध्ये ती पायऱ्या चढताना दिसली आहे. पण आपण नेहमी पायऱ्या चढतो, तसं ते अजिबात नाही. या वर्कआऊटमध्ये तिने दोन्ही हात समोर जोडून ठेवले आहेत, जेणेकरून पायऱ्या चढताना हाताचा उपयोग होऊ नये. यानंतर ती गुडघ्यामध्ये वाकली आहे आणि अशा पोझिशनमध्ये ती जीना चढली.
- आता दुसऱ्या प्रकारात ती पायऱ्या उतरताना दिसली आहे. हे देखील नेहमीसारखे पायऱ्या उतरणे नाही. यामध्येही तिने हात समोर बांधून ठेवले आहेत आणि गुडघ्यात वाकून ती पायऱ्या उतरली आहे. 

मंदिरा बेदीचा फिटनेस स्टंट, वय ५० आणि एकावेळी मारले ३३ हॅण्डस्टॅण्ड, व्हिडीओ पाहाल तर म्हणाल..
- स्टेअर वर्कआऊटचा तिसरा प्रकार तर चक्क व्हिडियो पाहणाऱ्याला चक्रावून टाकणारा आहे. यामध्ये तिने चक्क झोपूनच पायऱ्या उतरल्या आहेत. म्हणजेच ती दोन्ही हात आणि दोन्ही पाय यांचा वापर करून जीन्यावर पुर्ण आडवं होऊन पायऱ्या उतरते आहे. एवढी मेहनत घेऊन सोहा तिचा फिटनेस मेंटेन ठेवते आहे, ही कौतूकाचीच गोष्ट आहे. 

 

व्हिडियो पाहून नेटिझन्स म्हणाले की.....
या व्हिडियोविषयी अनेक उलट- सुलट कमेंट्स सोशल मिडियावर वाचायला मिळत आहेत. काही जणांना हा व्हिडियो आवडला आहे, तर काही जणांनी चक्क सोहाची खिल्ली उडवली आहे. व्हिडियोमध्ये दाखवलेल्या पहिल्या प्रकारात सोहा पायऱ्या चढताना दिसते आहे. ते पाहून एक जण म्हणाला की 'सोहाकडे पाहून असे वाटते आहे की एखादा बेडूक पायऱ्या चढतो आहे... '. आता नेटिझन्सच ते... चर्चा तर होणारच... पण तुम्हाला जर तुमचा नेहमीचा व्यायाम करून कंटाळा आला असेल, तर तुम्ही स्टेअर वर्कआऊटचा हा प्रकार नक्कीच ट्राय करू शकता. संपूर्ण शरीराच्या स्नायूंच्या बळकटीसाठी हा एक उत्तम व्यायाम आहे. 


 

Web Title: Soha Ali Khan's stair workout, new idea for fitness, must see video of her workout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.