Join us  

एकेकाळी तिचं ९५ किलो वजन होतं, सोनाक्षी सिन्हाने ३० किलो वजन घटवलं, वाचा कसं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2024 1:25 PM

Sonakshi Sinha's weight loss journey: From being unable to run on the treadmill to practising self-love, here are her fitness secrets : दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल नुकतेच विवाह बंधनात अडकले..

दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि अभिनेता झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) नुकतेच विवाह बंधनात अडकले आहेत. त्यांचे लग्नातील खास फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे (Wedding). दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे. दोघांचे धर्म हे वेगवेगळे असल्याने दोघांनी रजिस्टर मॅरेज करणं पसंत केलं आहे (Weight loss journey). लग्नाच्या दिवशी एम्ब्रॉयडरी साडीत सोनाक्षी खूप सुंदर आणि सोज्वळ दिसत होती.

सोनाक्षी आता जितकी फिट अँड फाईन दिसते, सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्यापूर्वी ती अनफिट होती (Fitness). तिचं वजन तब्बल ९५ किलो होते. ज्यामुळे तिला एकेकाळी बॉडी शेमिंगला देखील सामोरे जावे लागले होते. सोनाक्षी सिन्हाने वजन कमी करण्यासाठी नक्की काय केलं?(Sonakshi Sinha's weight loss journey: From being unable to run on the treadmill to practising self-love, here are her fitness secrets).

बॉडी शेमिंगला जावे लागले सामोरे

सोनाक्षीने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या, वेट लॉस जर्नीबद्दल काही किस्से शेअर केले होते. तिची आई पूनम तिला नेहमी वजन कमी करण्यास सांगत असे. शिवाय लठ्ठपणामुळे शाळेतील मुलं देखील तिला चिडवत असत.

पावसाळ्यात चेहऱ्यावर दह्यात १ सोनेरी गोष्टी मिसळून जरूर लावा; मुरुमांचे डाग - टॅनिंग होईल गायब

९५ किलोपर्यंत वाढलं होतं वजन

बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी सोनाक्षीचे वजन ९५ किलो झाले होते. दबंग या पाहिल्या चित्रपटासाठी तिने ३० किलोपर्यंत वजन कमी केलं होतं. वयाच्या १८ व्या वर्षापासून तिने वजन कमी करण्यास सुरुवात केली होती.

३० सेकंदही धावणे अवघड होते

सोनाक्षीचे वजन जेव्हा जास्त वाढले होते, तेव्हा तिला ट्रेडमिलवर ३० सेकंदांपेक्षा जास्त वेळ धावायला जमत नव्हते. तिने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. ही खास मेहनत तिने आपल्या पहिल्या चित्रपटासाठी घेतली असल्याचं ती सांगते.

अशा प्रकारे ३० किलो वजन केलं कमी

वजन कमी करण्यासाठी सोनाक्षीने जिम जॉईन केली होती. पण त्यानंतर तिने व्यायामशाळेत जाणं सोडलं. तिने अनेक व्यायाम करण्याचे पर्याय निवडले. ती नेहमी सकाळी रिकाम्या पोटी ३० ते ४५ मिनिटे कार्डिओ करायची आणि नंतर २० मिनिटे वेगवान वॉकिंग करायची.

फक्त २ गोष्टी दह्यात कालवून खा, बॅड कोलेस्टेरॉलचा त्रास होईल कमी, रक्ताभिसरण होईल छान

सोनाक्षीचा डाएट प्लान असा होता

सोनाक्षी सुरुवातीपासून फुडी आहे. यामुळे तिचे वजन वाढायचे. पण वेट लॉससाठी सोनाक्षीने फास्ट फूड सोडलं. शिवाय आहारात प्रोटीन्स, कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचा समावेश केला. याशिवाय ती दिवसभर भरपूर पाणी प्यायची. चयापचय बुस्ट करण्यासाठी तिने एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी, २ तासांनी थोडे थोडे जेवण करण्याची सवय लावली. सायंकाळी ६ नंतर कार्ब्स खाणं सोडलं, आणि रात्रीचे जेवण लवकर करण्यास सुरुवात केली.

टॅग्स :सोनाक्षी सिन्हावेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य