Join us  

इडली, डोसा, उपमा खाऊन होईल वजन कमी, पाहा साऊथ डिशेसचे चविष्ट वेट लॉस डाएट प्लॅन, वजन कमी करा खाऊन पिऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2023 7:07 PM

South Indian Diet Plan For Weight Loss : वाफाळलेल्या भाज्यांमुळे तोंडाची चव गेली? पाहा ७ दिवसांचं वेट लॉस डाएट प्लॅन, वजन होईल कमी-आरोग्याला सुधारेल

इडली, डोसा, सांबार, मेदू वडा..(South Indian Dishes)काय मग पदार्थांचे नाव ऐकताच तोंडात पाणी सुटलं ना? पण तुम्हाला जर कोणी सांगितलं की, या पदार्थांचा डाएटमध्ये समावेश केल्याने वजन कमी होईल तर?... हो, साऊथ इंडियन पदार्थ फक्त चवीलाचं नसून, वजन कमी (Weight loss) करण्यासही मदत करू शकतात. बरेच जण वजन कमी करण्यासाठी विविध उपाय करून पाहतात, वाफाळलेल्या भाज्या, सूप आणि भिजलेले कडधान्य खाऊन जगतात. पण याने वजन तर कमी होते, पण जिभेचे चोचले पूर्ण होत नाही. शिवाय, मनसोक्त काही चविष्ट खायलाही मिळत नाही.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी शरीरात संतुलित पौष्टीक घटकांचा समावेश करणं गरजेचं आहे. दाक्षिणात्य पदार्थांमध्ये अधिक करून भाज्या, तांदूळ, मिलेट्स यासह विविध पौष्टीक पदार्थांचा समावेश असतो. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय लवकर भूकही लागत नाही. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, ७ दिवस दाक्षिणात्य पदार्थ खा. यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी, शिवाय पोट कमी करण्यास मदत होईल(South Indian Diet Plan For Weight Loss).

दिवस - पहिला

नाश्ता - नाश्तामध्ये आपण २ इडलीसोबत वाटीभर सांबर आणि चटणी खाऊ शकता.

लंच - मिक्स वेजिटेबल करी सोबत ब्राऊन राईस खाऊ शकता. जर आपल्याला सायंकाळी छोटीशी भूक लागत असेल तर, मुठभर चणे, शेंगदाणे खा.

डिनर - डोश्यासोबत आपण पुदिना चटणी किंवा सांबार खाऊ शकता.

वजन कमी करण्याचे सगळे फंडे फेल झाले? करून पाहा मेथी दाण्याचे ३ सोपे उपाय; वजन घटेल-दिसाल सुडौल

दिवस - दुसरा

नाश्ता - वेजिटेबल उपमासोबत आपण खोबऱ्याची चटणी खाऊ शकता. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय यात कॅलरीजही कमी असतात.

लंच - दुपारच्या जेवणात आपण मिक्स व्हेज प्लेटसोबत क्विनोआ पुलाव खाऊ शकता. जर आपल्याला सायंकाळची छोटी भूक लागली असेल तर, आपण एक वाटी फ्रूट सॅलॅड खाऊ शकता.

डिनर - रात्री आपण एक वाटी वेजिटेबल पुलावसोबत एक वाटी रायता खाऊ शकता.

दिवस - तिसरा

नाश्ता - नाश्त्यामध्ये आपण वेजिटेबल पोहा खाऊ शकता. वेजिटेबल पोहा खाल्ल्याने लवकर भूक लागणार नाही.

लंच - ब्राऊन राईससोबत आपण डाळ - पालक व लोणचं खाऊ शकता. यामुळे शरीराला प्रोटीन मिळेल.

डिनर - बाजरीच्या डोशासोबत आपण रोस्टेड पनीर आणि खोबऱ्याची चटणी खाऊ शकता. पनीरमधील कॅल्शियम हाडं बळकट आणि प्रोटीन वजन कमी करण्यास मदत करतील.

दिवस - चौथा

नाश्ता - नाचणीचा डोसा आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. आपण सकाळी नाचणीच्या डोशासोबत टोमॅटोची चटणी आणि एक ग्लास ताक पिऊ शकता.

लंच - शिजलेल्या क्विनोआसोबत आपण मिक्स व्हेज करी खाऊ शकता. शिवाय सायंकाळी कडधान्यांचा सॅलॅड तयार करून खाऊ शकता.

डिनर - डिनरमध्ये आपण चपातीसोबत वांग्याचं भरीत खाऊ शकता. पण रात्री झोपताना जिऱ्याचे पाणी प्यायला विसरू नका.

दिवस - पाचवा

नाश्ता - सकाळी ब्रेकफास्टमध्ये आपण मिश्र डाळींचा डोसा खाऊ शकता. त्यासोबत दह्याची चटणी उत्कृष्ट लागेल.

लंच - एक वाटी ब्राऊन राईससोबत आपण टोमॅटो रसम आणि मिक्स व्हेज भाजी खाऊ शकता. सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी आपण पॉपकॉर्न खाऊ शकता.

डिनर - डिनरमध्ये हलके पदार्थ खा. आपण टोमॅटो राईससोबत मिक्स भाजी खाऊ शकता.

न्यू इअर पार्टीमध्ये दिसायचंय सुंदर-सुडौल? मग आजपासूनच फॉलो करा ४ वेट लॉस रुल्स, काही दिवसात दिसेल फरक

दिवस - सहावा

नाश्ता - नाश्तामध्ये आपण भाजी आणि कडधान्यांचा सॅलॅड करून खाऊ शकता. यामुळे पोट दिर्घकाळ भरलेले राहिल.

लंच - ब्राऊन राईससोबत आपण व्हेज सांबार खाऊ शकता. आपल्याला जर ब्राऊन राईस आवडत नसेल तर, व्हाईट राईसही खाऊ शकता.

डिनर - डिनरमध्ये मल्टीग्रेन चपातीसोब मिक्स व्हेज भाजी खा. शिवाय रात्री झोपण्यापूर्वी एक कप ग्रीन टी प्यायला विसरू नका.

दिवस - सातवा

नाश्ता - विकेंडला आपण दिवसाची सुरुवात रवा इडली आणि खोबऱ्याच्या चटणीने करू शकता.

लंच - लंचमध्ये आपण मेदू वडासोबत सांबार खाऊ शकता. सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी आपण दह्यात दालचिनी पावडर आणि डार्क चॉकलेट मिक्स करून खाऊ शकता. यामुळे आपली स्वीट क्रेविंग कमी होईल.

डिनर - रात्री आपण कांदा-  टोमॅटोची चटणीसोबत बाजरीचा डोसा खाऊ शकता. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्स