Lokmat Sakhi >Fitness > वजन वाढत नाही? लोक हडकुळे म्हणून टोमणे मरतात? सोयाबीन 'या' पद्धतीने खा-वाढेल ताकद

वजन वाढत नाही? लोक हडकुळे म्हणून टोमणे मरतात? सोयाबीन 'या' पद्धतीने खा-वाढेल ताकद

Soya Chunks For Weight Gain- Here's How It Helps : हाडांना बळकटी ते पचन सुधारणे; पाहा सोयाबीन खाण्याचे ६ जबरदस्त फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2024 04:26 PM2024-05-29T16:26:53+5:302024-05-29T17:27:06+5:30

Soya Chunks For Weight Gain- Here's How It Helps : हाडांना बळकटी ते पचन सुधारणे; पाहा सोयाबीन खाण्याचे ६ जबरदस्त फायदे

Soya Chunks For Weight Gain- Here's How It Helps | वजन वाढत नाही? लोक हडकुळे म्हणून टोमणे मरतात? सोयाबीन 'या' पद्धतीने खा-वाढेल ताकद

वजन वाढत नाही? लोक हडकुळे म्हणून टोमणे मरतात? सोयाबीन 'या' पद्धतीने खा-वाढेल ताकद

काही जण वजन वाढत नाही म्हणून टेन्शनमध्ये आहेत (Weight Gain Tips in Marathi). तर, काही जण वजन कमी होत नाही म्हणून चिंतेत आहेत. वजन वाढवणं ही देखील मोठी समस्या आहे (Soyabean). बऱ्याचदा भरपूर खाल्ल्यानेही वजन वाढत नाही. वजन वाढावं म्हणून आपण बऱ्याच गोष्टी करतो. पण वजन वाढेलच असे नाही.

जर आपलं कोणतेही उपाय करून वजन वाढत नसेल तर, सोयाबीनचा आहारात समावेश करून पाहा. सोयाबीन खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे असतात. तसेच त्यात प्रोटीन,  मॅग्नेशियम, आयर्न असते. सोयाबीन खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहते. ते फायदे कोणते पाहूयात(Soya Chunks For Weight Gain- Here's How It Helps).

सोयाबीन खाण्याचे फायदे

प्रोटीनचा पॉवरहाउस

शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत आहे. प्रोटीनमुळे स्नायुंना बळकटी मिळते. शिवाय जर आपल्याला फॅट लॉस करून मसल्स वाढवायचे असतील तर, प्रोटीनने परिपूर्ण सोयाबीन खा.

हाडांना मिळते मजबुती

सोयाबीनम प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहेच. शिवाय त्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारख्या खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. जर आपले कमी वयात हाडं ठणकत असतील तर, वेळीच आहारात सोयाबीनचा समावेश करा.

बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारे ५ पदार्थ, हृदय ठेवा ठणठणीत-रक्ताभिसरणही सुधारेल

हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

सोयाबीनमध्ये अनेक जीवनसत्त्वांसह गुड फॅट्स देखील आढळते. सोयाबीनमधील गुड फॅट्स खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते. शिवाय रक्ताभिसरणात सुधारणा होते.

मधुमेहाचा धोका कमी

सोयाबीनमध्ये असलेले फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

वेट लॉससाठी मदत

सोयाबीनमध्ये अधिक प्रमाणात फायबर आणि प्रोटीन आढळते. ज्यामुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते. या करणामुळे आपण उलट सुलट खाणं टाळतो. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते किंवा कमी होते.

सायंकाळी व्यायाम केल्याने वजन झरझर घटते? ४ आरोग्यदायी फायदे; स्ट्रेस कमी होईल आणि..

पचन सुधारणे

सोयाबीनमध्ये असलेले फायबर पचन सुधारण्यास मदत करते. ज्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते. शिवाय अपचन, बद्धकोष्ठता, पोटाचे विकार यांसारखे आजार दूर राहतात.

Web Title: Soya Chunks For Weight Gain- Here's How It Helps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.