हेल्दी आणि फिट राहण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे. पौष्टीक घटकयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होते. आपण वेट लॉससाठी मोड आलेले हिरवे मूग खाऊ शकता. अंकुरित मूगामध्ये कॅलरीज कमी आणि दर्जेदार पोषक जास्त प्रमाणात आढळतात. त्यात फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते (Fitness). प्रति १०० ग्रॅम मूगामध्ये फक्त ३० कॅलरीज आढळून येतात.
मूगामध्ये असलेले फायबर अन्न पचनास मदत करते (Weight Loss). यासह बॅड कोलेस्टेरॉलची पातळी देखील कमी होते. पण मोड आलेले हिरवे मूग कधी खावे? याचे इतर आरोग्यदायी फायदे किती?(Sprout moong beans the right way for weight loss).
मोड आलेले हिरवे मूग खाण्याचे फायदे
वेट लॉससाठी उपयुक्त
मोड आलेल्या हिरव्या मुगामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. १०० ग्रॅम मूगामध्ये ३० कॅलरीज आढळून येतात. तसेच अंकुरलेल्या मुगात तांबे, लोह, मॅंगनीज, फॉस्फरस, कॅल्शियम आणि जस्त भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे शरीर सुदृढ आणि वजन कमी करण्यास मदत होते. मोड आलेल्या मुगामध्ये असलेले फायबर शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. ज्यामुळे शरीर निरोगी राहते.
पिवळे दात राहतील कायम पांढरेशुभ्र, बाल्कनीत कुंडीत लावा ३ रोपं, करा साेपा उपाय
डोळ्यांसाठी फायदेशीर
व्हिटॅमिन ए समृद्ध मोड आलेले हिरवे मूग डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. अंकुरलेले मूग व्हिटॅमिन ए चा उत्तम स्त्रोत आहे. ज्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते आणि तेज होते.
बॅड कोलेस्टेरॉल कमी करते
एक कप स्प्राउट्समध्ये १४ ग्रॅम प्रथिने असतात. एक कप मोड आलेल्या हिरव्या मुगामध्ये ०. ३८ ग्रॅम चरबी असते. कमी चरबीयुक्त आहार आणि फायबरयुक्त स्प्राउट्स बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
उन्हाळ्यात पचनसंस्था कमकुवत होते? रामदेव बाबा सांगतात ६ सोपे बदल; पचेल अन्न-राहाल निरोगी
हेअर ग्रोथसाठी उत्तम
मोड आलेल्या हिरव्या मुगामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे केसांच्या वाढीस मदत होते. नियमित मोड आलेले मूग खाल्ल्याने केस गळणे कमी होते आणि कोंडापासून आराम मिळतो. शिवाय ब्लड सर्क्युलेशन वाढते. ज्यामुळे नव्या केसांच्या वाढीस मदत होते.