दिवसभर आपण आपल्या रुटीननुसार काम करतो. तेव्हा काही जाणवत नाही. पण सगळं काम करून रात्री जेव्हा अंथरुणावर पडतो, तेव्हा मात्र तळपाय आणि टाचा ठणकू लागतात. किंवा काही जणींच्या बाबतीत तळपाय किंवा टाचा दाबल्या तर त्या जागी खूप वेदना होतात. बऱ्याच जणींना सकाळी झोपेतून उठल्यावर पाय जमिनीवर ठेवताना तळपायात, टाचेत खूप त्रास होतो. हळूहळू मग कामाला सुरुवात केली की ते दुखणं कमी होत जातं. अशा कोणत्याही प्रकारचा त्रास तुम्हाला असेल किंवा plantar fasciitis सारखा त्रास होत असेल तर हा त्रास कमी करण्यासाठी करिना कपूर- आलिया भट यांच्या फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी ३ सोपे व्यायाम सांगितले आहेत.
टाचा- तळपायांचं दुखणं कमी करण्यासाठी व्यायाम
१. पहिला व्यायाम
हा व्यायाम करण्यासाठी खुर्चीवर किंवा जमिनीवर बसू शकता. यासाठी एक पाय गुडघ्यात दुमडा आणि त्याचा तळपाय दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवा.
नैसर्गिक पद्धतीने बॉडी डिटॉक्स करणारी योगमुद्रा, वेटलॉससाठीही होईल फायदा- बघा कशी करायची
आता एका हाताने तळपायाच्या बोटांना पकडा आणि पाय क्लॉकवाईज, ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने प्रत्येकी १०- १० वेळा फिरवा. पाय अशा पद्धतीने फिरवा की तळपायाच्या स्नायुंवर ताण येऊन त्यांचं चांगल्या पद्धतीने स्ट्रेचिंग झालं पाहिजे.
२. दुसरा व्यायाम
पहिला व्यायाम करताना ज्या अवस्थेत बसला होतात, तशाच पद्धतीने या व्यायामासाठी बसावे. यामध्येही पायाच्या बोटांना एका हाताने पकडा आणि ती पुढे- मागे या पद्धतीने हलवा.
पिवळट डाग पडल्याने वॉश बेसिन खराब दिसतं? ३ उपाय, कमी मेहनतीत वॉश बेसिन चमकेल अगदी नव्यासारखं
यामध्येही तळपायाच्या स्नायुंवर योग्य पद्धतीने ताण आला पाहिजे. असा व्यायाम दोन्ही पायांनी प्रत्येकी १०- १० वेळा करा.
३. तिसरा व्यायाम
हा व्यायाम करण्यासाठी योगा बॉलचा वापर करा. हा बॉल जमिनीवर ठेवा आणि तळपायाने दाब देऊन बॉल पुढे- मागे करा. हा व्यायामही दोन्ही पायांनी प्रत्येकी १०- १० वेळा करावा.