Lokmat Sakhi >Fitness > जिने चढणं उतरणं हा एकदम सुपरहॉट व्यायाम आहे! -करुन तर पहा..

जिने चढणं उतरणं हा एकदम सुपरहॉट व्यायाम आहे! -करुन तर पहा..

चालणं, धावणं, पळणं यांच्याइतकाच  भारी असतो जिने चढण्याचा व्यायाम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:13 PM2021-03-24T16:13:55+5:302021-03-24T16:37:08+5:30

चालणं, धावणं, पळणं यांच्याइतकाच  भारी असतो जिने चढण्याचा व्यायाम.

staircase exercise is a superhot workout, try this.. | जिने चढणं उतरणं हा एकदम सुपरहॉट व्यायाम आहे! -करुन तर पहा..

जिने चढणं उतरणं हा एकदम सुपरहॉट व्यायाम आहे! -करुन तर पहा..

Highlights जिना चढणे हा व्यायाम करतांना कानात मोट्ठ्या आवाजात मस्त गाणी किंवा ऑडिओबुक्स ऐकता येऊ शकतात.

गौरी पटवर्धन

आपल्याला फिट व्हायचं आहे हे ठरलं, त्यासाठी व्यायाम केला पाहिजे हे ठरलं, नियमितपणे केला पाहिजे हे ठरलं, तो कसा करायचा, त्यासाठी वेळ कसा काढायचा याचा प्लॅन ठरला, आता प्रश्न येतो की व्यायाम कुठला करायचा?
 सगळ्या नवीन व्यायाम करणाऱ्यांनी चालायला जाणं असा काही अलिखित नियम आहे का? कारण आजूबाजूला तसंच होतांना दिसतं. सगळे आपले रोज उठून चालायला जातात. आणि आपल्याला चालायला जायची इच्छा नसेल तर? ते आवडत नसेल तर? त्याचा कंटाळा येत असेल तर? आजूबाजूला चालायला जाण्यासारखे रस्ते नसतील तर? किंवा गुडघेदुखीसारख्या काही दुखण्यांमुळे चालणे या व्यायामाने त्रास होत असेल तर? 
तर एरोबिक व्यायाम कुठला करायचा?


यातल्या प्रत्येक अडचणींचा वेगवेगळा विचार करायला लागेल. पण आपली अडचण कुठली हे बघायचं आणि त्याप्रमाणे आपलं उत्तर शोधायचं तर एरोबिक व्यायाम अनेक प्रकारचे असू शकतात. ज्यांच्या बेसिक फिटनेसची पातळी चांगली आहे त्यांना ऑलमोस्ट चालण्याइतकाच सोयीचा व्यायाम म्हणजे धावणे. थोडे दिवस चालायला जायचं, आणि हळूहळू जॉगिंग सुरु करायचं. त्याची सवय झाली की सरळ रनिंग सुरु करायची. अर्थात वेळ आणि वेळ हळूहळू वाढवायचा हा प्राथमिक नियम जसा चालण्याला लागू आहे तसाच रनिंगला सुद्धा लागू आहेच. पण रनिंग हा चालण्यापेक्षा फार जास्त इंटरेस्टिंग व्यायाम आहे. रनिंग करण्याचा चालण्यासारखा कंटाळा येत नाही. रनिंग करायला सहकारी मिळू शकतात.
ज्यांना फिटनेसचा प्रॉब्लेम नाही, गु‌डघ्यांचे किंवा इतर कुठले आजार नाहीत, जरासा जास्त हेवी व्यायाम करू शकतात, पण ज्यांना बाहेर जायला जागा नाही किंवा बाहेर जाऊन व्यायाम करता येणार नाही अशांनी काय करायचं?

तर त्यांच्यासाठी जिने चढणं हा एक उत्तम व्यायाम असू शकतो. सोसायटीचा जिना ही व्यायाम करण्यासाठी उत्तम जागा असू शकते. फक्त त्या जिन्याच्या सगळ्या पायऱ्या शक्यतो एकसारख्या असाव्यात. (हे मुद्दाम सांगण्याचं कारण म्हणजे एवढ्यातल्या एवढ्यात तीन सोसायट्यांमध्ये हा अनुभव आला, की प्रत्येक पायरीची उंची वेगवेगळी होती.) लहानमोठ्या पायऱ्या असतील तर गु‌डघे दुखणं किंवा लचकणं अपरिहार्य आहे. त्यामुळे चांगला जिना शोधून मग त्यावर व्यायाम करायचा. जिना चढायचा आणि उतरायचा एवढाच व्यायाम. अगदी ५ वेळा जिना चढण्यापासून सुरुवात करायची. आपली वेळ आपण ठरवायची. काही महिन्यात तासभर हा व्यायाम करता येऊ शकतो. त्यानंतरही त्यात अजून व्यायाम व्हायला पाहिजे असेल तर हातात वजन घेऊन जिना चढायचा. या व्यायामातही चालण्यासारखा कंटाळा येण्याची भीती असतेच. पण तरीही आपण जेव्हा धावत जिना चढण्याच्या पातळीला पोचतो त्यानंतर तो व्यायाम कंटाळवाणा उरत नाही. आणि दुसरं म्हणजे जिना चढणे हा व्यायाम करतांना कानात मोट्ठ्या आवाजात मस्त गाणी किंवा ऑडिओबुक्स ऐकता येऊ शकतात. आपण रहदारीच्या रस्त्यावर नसल्यामुळे तसं करण्यात काही रिस्क नसते. फार फार तर आपण कोणातरी घरी जाणाऱ्या व्यक्तीच्या रस्त्यात येऊ.
हे झालं ज्यांना हेवी व्यायाम करता येऊ शकतात त्यांच्यासाठी. पण बघा म्हणजे हे करुन पाहता येतंय का..
 

Web Title: staircase exercise is a superhot workout, try this..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.