Join us  

ऑफिसमध्ये तासनतास बसून पोट सुटलंय? जागेवरच उभं राहून ३ व्यायाम करा, मेंटेन होईल फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 11:09 AM

Standing Exercise to burn belly fat : बेली फॅट कमी करण्यासाठी हिप सर्कल व्यायाम हा उत्तम आहे. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल.

ऑफिसच्या कामासाठी दिवसभरातील ८ ते ९ तास बसल्याने पोट सुटू  लागते. ज्यामुळे शरीर  मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्वरूपात थकते. सतत लॅपटॉप स्क्रिनकडे पाहिल्यामुळे अनेकांना चष्मा लागतो.  खराब सिटींग पोश्चर आणि दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे पोटाचा आकार वाढत जातो.  यामुळे शरीराचा पोश्चर बिघडतो ज्यामुळे कपड्यांची फिटिंगही व्यवस्थित येत नाही. (1 minute standing exercise belly fat burner)

जर तुम्हालाही व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर तुम्ही उभ्या उभ्या जागच्या काही व्यायाम करून वजन कमी करू शकता. ज्यामुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. स्टॅडींग व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (3 standing exercises to burn belly fat without any equipment)

स्टॅडिंग बेली फॅट व्यायाम (Standing Belly Fat Exercice)

1) फॉरवर्ड फोल्ड (Forward Fold)

फॉरवर्ड फोल्ड हा व्यायाम सगळ्यात परिणामकारक व्यायामप्रकार आहे. सुटलेलं पोट कमी करण्याासाठी तुम्ही रोज हा व्यायाम करू शकता. यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होईल. दीर्घकाळ एकाचजागी बसल्यामुळे वेदना जाणवतात. या उपायाने शरीराच्या खालच्या भगात  होणाऱ्या वेदना कमी होतात.

त्यानंतर दोन्ही हात वरच्या बाजूंनी खेचा आणि कोपरे सरळ ठेवा. यानंतर दोन्ही बाजूंनी हात खाली घेऊन जमिनीला टच करा.  हा व्यायाम करताना कंबर सरळ ठेवा. गुडघे वाकवू नका. या स्थितीत तुम्ही १ मिनिटं राहू शकता. ३ ते ४ वेळा हा व्यायाम केल्यास चांगला परिणाम दिसून येईल.फॉरवर्ड फोल्ड हा व्यायाम करताना दोन पायांच्यामध्ये अंतर ठेवा यामुळे शरीर व्यवस्थित बॅलेंन्स राहते. 

घरी असो किंवा प्रवासात रोज खा मूठभर फुटाणे, ५ फायदे; मिळेल भरपूर प्रोटीन-पचन सुधारेल

२) हिप सर्कल ( Hip circles)

बेली फॅट कमी करण्यासाठी हिप सर्कल व्यायाम हा उत्तम आहे. यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होईल. या व्यायामामुळे चरबी कमी होत नाहीतर पेल्विक मसल्ससुद्धा मजबूत होतात. हा व्यायाम करण्यासाठी मॅटवर सरळ उभे राहा. दोन पायांच्यामते थोडं अंतर ठेवा. यामुळे शरीर व्यवस्थित बॅलेंन्स राहील. नंतर दोन्ही हात कंबरेवर ठेवा आणि क्लॉकवाईज मोशनमध्ये फिरवत सर्कल बनवा. यामुळे हिप्सवर जमा झालेलं फॅट कमी होईल.  २ ते ३ मिनिटं हा व्यायाम करा. हा व्यायाम केल्यानंतर शरीर रिलॅक्स ठेवा. यामुळे बेली फॅट कमी होण्यास मदत होईल.

कंबर, मांड्या खूपच जाड दिसतात? 30-30-30 फॉर्म्यूला ट्राय करा, महिन्याभरात व्हाल स्लिम

३) जंपिग (Jumping)

हा सगळ्यात सोपा व्यायाम आहे. हा व्यायाम केल्यास वेगानं वजन कमी होण्यास मदत होईल. या व्यायामाने तुमच्या संपूर्ण शरीरावर प्रेशर येईल. पोटाशिवाय ज्या इतर भागांमध्ये फॅट जमा झालं आहे ते कमी करण्यासही मदत होईल. हा अत्यंत सोपा स्टँडींग व्यायाम आहे ज्यामुळे पोट कमी करण्यास मदत होईल. यात तुम्हाला २० ते २५ वेळा जागच्याजाही उड्या मारायच्या आहेत. 

टॅग्स :फिटनेस टिप्सहेल्थ टिप्सवेट लॉस टिप्स