Lokmat Sakhi >Fitness > दणक्यात व्यायाम सुरु करताय, फिटनेस चॅलेंजची क्रेझ आहे? ६ गोष्टी विसरु नका, मसल पेन नको तर..

दणक्यात व्यायाम सुरु करताय, फिटनेस चॅलेंजची क्रेझ आहे? ६ गोष्टी विसरु नका, मसल पेन नको तर..

Tips To Prevent Workout Injuries : व्यायामाने ताकद कमवायची असते मात्र व्यायामच चुकीचा केला तर.. पश्चाताप..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2023 02:30 PM2023-01-11T14:30:16+5:302023-01-11T14:42:16+5:30

Tips To Prevent Workout Injuries : व्यायामाने ताकद कमवायची असते मात्र व्यायामच चुकीचा केला तर.. पश्चाताप..

Starting exercise : Don't forget 6 things, if you don't want a muscle pen.. | दणक्यात व्यायाम सुरु करताय, फिटनेस चॅलेंजची क्रेझ आहे? ६ गोष्टी विसरु नका, मसल पेन नको तर..

दणक्यात व्यायाम सुरु करताय, फिटनेस चॅलेंजची क्रेझ आहे? ६ गोष्टी विसरु नका, मसल पेन नको तर..

आपण सगळेच फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटी करण्यावर जास्त भर देतो. या अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये, रनिंग, जिम वर्कआऊट, फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी, झुंबा अशा अनेक प्रकारांचा समावेश आपण करतो. वर्कआउट करताना आपण ते योग्य प्रकारे करतो आहे की नाही याकडे पण लक्ष देणे तितकेच महत्वाचे असते. वर्कआउट करताना कधी कधी आपण चुकीच्या पद्धतीने करतो यामुळे आपल्या शरीरातील काही अवयवांना इजा होण्याची शक्यता असते. वॉर्मअप , स्ट्रेचिंग योग्य पद्धतीने न केल्यामुळे मसल्स ताणले जाणे, खांदे दुखावणे, लोअर बॅकला दुखापत होणे अशा छोट्या छोट्या समस्या उद्भवू शकतात. वर्कआऊट करून  झाल्यावर मसल्समध्ये जाणवणार्‍या वेदनांचा त्रास प्रत्येकालाच होतो. यासाठी वर्कआउट दरम्यान काही इजा होऊ नये म्हणून आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. वर्कआऊट करताना कोणत्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून आपण काही टीप्स वापरून काय काळजी घेऊ शकतो हे समजून घेऊयात(Tips To Prevent Workout Injuries).

नक्की काय काय करता येऊ शकत ? 

१. वॉर्मअप जरूर करा - जेव्हा आपण व्यायाम सुरू करतो त्यापूर्वी मशीन एक्सरसाइज करण्याआधी वॉर्मअप करायला विसरू नये. जे अत्यंत आवश्यक असते. यामुळे जिम करताना होणाऱ्या इन्जुरी टाळता येतात. जेव्हा तुमचे शरीर गरम होईल, त्यानंतरच मशीनवरील एक्सरसाइज करा. वॉर्मअप न केल्याने शरीरात इन्जुरीचे चान्सेस वाढतात. यामुळे कमीत कमी १५ मिनिटे वॉर्मअप करावा.

२. टेक्निक शिकून घ्या - जिमला गेल्यानंतर तिथे असणाऱ्या सर्व साहित्यांची किंवा व्यायाम करण्याच्या साधनांची योग्य ती माहिती करून घ्या. एखादा व्यायाम प्रकार किंवा हेवी वेट उचलण्याआधी ट्रेनरची मदत घ्या. एखादा व्यायाम प्रकार किंवा वेट उचलण्याची टेक्निक शिकून व समजून घ्या. योग्य ती टेक्निक शिकून घेण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या.

३. वेदना होत असतील तर थांबा - एखाद्या वेळेस क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे, अधिकाधिक एक्सरसाइज करणे यांसारख्या कारणांमुळे आपले मसल्स दुखावले जाऊन वेदना होऊ शकतात. याच होणाऱ्या वेदनांना सोअरनेस असे म्हणतात. आपल्याला होणाऱ्या वेदना ओळखून काही काळ आराम करा. शरीरातील ज्या भागातील मसल्स दुखावले गेले असतील त्या अवयवांचा एक्सरसाइज करणे काही काळ थांबवा यामुळे तुम्हांला आराम पडेल. 

४. योग्य डाएट - व्यायाम करण्यासोबतच शरीराला योग्य डाएटची गरज असते. व्यायाम करण्यासोबतच शरीराला जे पोषक घटक लागतात त्यांचे रोजच्या आहारात सेवन करा. वर्कआउट करण्याआधी व नंतर शरीराला आवश्यक आणि योग्य असा आहार घेण्यास विसरू नका. 

५. हळुहळु प्रगती करा - एखादा व्यायाम करणारा व्यक्ती नवखा असेल किंवा अनुभवी असेल तरी त्यांनी व्यायाम करताना हळुहळु सुरुवात करावी. सुरुवात केल्यावर रोज एक - एक व्यायाम प्रकार वाढवत न्यावा. एकदम एखादा व्यायाम करण्यास सुरुवात करू नये किंवा एकदम एखाद्या करण्याची घाई करू नये.      

६. बॉडी चेकअप करून घ्या - कोणीही एक्सरसाइज किंवा जिमला जाण्याआधी शरीराची पूर्ण तपासणी करणे गरजेचे असते. कोणत्याही जिममध्ये जाण्यापूर्वी तुम्ही आपल्या पूर्ण शरीराची तपासणी करून घेतली पाहिजे. उदा. बॉडी मास इंडेक्स (BMI). योग्य रीतीने एक्सरसाइज करण्यासाठी आपले ब्लड प्रेशर, पल्स रेट आणि हार्ट रेटची तपासणीही जरूर करून घ्यावी.

 

Web Title: Starting exercise : Don't forget 6 things, if you don't want a muscle pen..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.