गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी (Diwali 2024) असे एकामागून एक येणारे सण आपण मोठ्या आनंदाने साजरे करतो. या सणांदरम्यान आपल्यात देखील एक वेगळ्याच प्रकारच्या फेस्टिव्हल वाइब्स येतात. येणाऱ्या प्रत्येक सणावाराला आपल्या घरात गोडाधोडाचे पदार्थ केले जातात. यातही दिवाळी दसऱ्या सारखे सण म्हटले की खाण्याच्या पदार्थांची फार मोठी रेलचेल असते. दिवाळी दसऱ्यासारखे सण गोड पदार्थांशिवाय अपूर्णच आहे. दिवाळीत एकमेकांना गोड फराळाचे पदार्थ किंवा मिठाई देऊन आपण शुभेच्छा देतो. अशाप्रकारे दिवाळीत फराळाचे गोड पदार्थ, मिठाया असे अनेक गोड पदार्थ खाल्ले जातात.
आपण कितीही गोड खायचे नाही असे ठरवले तरी या सणानिमित्ताने गोड खाणं होतंच. पण कित्येकदा असे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला वाढत्या वजनाची आणि आरोग्याची चिंता सतावू लागते. गोड पदार्थ खाताना मात्र आपण अगदी ताव मारुन खातो, पण त्यानंतर भरपूर गोड खाल्लं असा विचार आपल्या मनात येतोच. या सणानिमित्ताने गोड खाताना आपले वजन वाढेल किंवा डायबिटीस असणाऱ्यांना आपल्या आरोग्याची काळजी वाटू लागते. अशावेळी गोड खाताना जर आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपल्यालाच त्याचा फायदा होतो. यंदाच्या दिवाळीत जर तुम्हाला तुमचे आरोग्य सांभाळून गोड खायचे असेल तर काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. हेल्थ एक्सपर्ट लवनीत बत्रा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सणावर असताना गोड खाऊन देखील आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दलच्या आवश्यक टिप्स सांगितल्या आहेत.
दिवाळीत गोड खाण्यापूर्वी लक्षात ठेवा...
१. दिवाळीत गोड पदार्थ खाण्यापूर्वी फायबरयुक्त पदार्थ खावेत. फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने आपल्या पचनक्रियेचे कार्य सुरळीत चालते. यासोबतच असे पदार्थ खाल्ल्याने आपले पोट दीर्घकाळासाठी भरलेले राहते. आपले पोट भरलेले असल्यामुळे आपण गोड पदार्थ फार कमी प्रमाणात खातो. जर आपले पोट भरलेले असेल तर आपल्याकडून गोड पदार्थ आपोआपच कमी प्रमाणात खाल्ले जातील. यासाठीच सणावाराला गोड पदार्थ खाण्यापूर्वी फायबरयुक्त पदार्थ खाण्यावर अधिक भर द्यावा.
वजन कमी करण्यासाठी मध आणि लिंबाचा रस घातलेले पाणी कधी-कसे प्यावे? डॉक्टर सांगतात...
२. हेल्थ एक्सपर्टच्या सांगण्यानुसार, जेव्हा तुम्ही कोणताही गोड पदार्थ खाल तेव्हा त्यासोबत प्रोटिन्स आणि हेल्दी फॅट्स असणारे पदार्थ अवश्य खावेत. गोड पदार्थांसोबत हेल्दी फॅट्स आणि प्रोटिन्स असणारे पदार्थ खाल्ले तर असे कॉम्बिनेशन अधिक रुचकर आणि ऊर्जा देण्यासाठी फायदेशीर ठरेल. उदाहरणार्थ, जर तुम्ही गोड खात असाल तर तुम्ही त्यासोबत एक ग्लास दूध पिऊ शकता. जर तुम्ही चॉकलेट खात असाल तर त्यासोबत ड्रायफ्रुट्स खावेत.
सामोसा-गुलाबजाम खाल्ले भरपूर तर तेवढ्या कॅलरी जाळायला तुम्हाला किती चालावं लागेल, माहिती आहे?
३. गोड पदार्थ किंवा मिठाई खाताना त्यावर थोडासा लिंबाचा रस शिंपडा. लिंबाचा रस शिंपडल्याने आपल्या शरीरातील ग्लुकोजची पातळी स्थिर राखण्यास मदत होते. लिंबामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन 'सी' रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात.
अशा काही सोप्या टिप्स लक्षात ठेवून आपण दिवाळीत हवे तितके गोड पदार्थ पोटभरून खाऊ शकतो.