बॉलिवूडमधील अभिनेत्री कधी त्यांच्या फॅशनमुळे तर कधी त्या करत असलेल्या डाएटमुळे सोशल मीडियावर प्रकाशझोतात असतात. अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आपली फिटनेस चॅलेंज आपल्या चाहत्यांशी शेअर करुन त्यांची वाहवा मिळवताना दिसतात. तर अशाप्रकारे आपल्या आवडत्या अभिनेत्रीला फॉलो करणाऱ्या तरुणी त्यांच्याप्रमाणे व्यायाम आणि आहार करत आपला फिटनेस जपण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे तुम्हाला अभिनेत्री आलिया भट आवडत असेल तर तिने नुकतेच केलेले हे स्ट्रेचिंगचे व्यायामप्रकार पाहा आणि तुम्हीही तिच्याकडून तसे व्यायाम करण्याची प्रेरणा घ्या. काही दिवसांवर लग्न असलेल्या अलियाने आपले डाएट आणि घरच्या खाण्याविषयीचे प्रेम काही दिवसांपूर्वी बोलून दाखवले होते. त्यानंतर आता तिचे हे व्हीलवरचे व्यायामप्रकार चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यामुळे तिच्या फिगरचे आणि फिटनेसचे सत्य ती नियमित करत असलेल्या व्यायामात असल्याचे दिसते.
आलियाची फिटनेस ट्रेनर अनुष्का परवानी हिने नुकतेच आलियाचे स्ट्रेचिंग करतानाचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. यामध्ये घरातील एका खोलीत योगा मॅटवर ठेवलेल्या योगा व्हीलवर आलिया व्यायाम करत असल्याचे दिसते. या फोटोंना अनुष्काने एक छान कॅप्शन दिली आहे. योगा व्हीलच्या साह्याने शरीराला ताण दिलेल्या कुत्र्याच्या पिल्लाची पोझ, हृदय आणि खांदे ओपन करणारी आहे. ही पोझ माझी आवडती असून अशाप्रकारे मॅटवरचे व्यायाम करणे सर्वात खोल व्यायाम करण्याचा एक भाग आहे. तसेच याआधीही अनुष्का हिने योगा व्हिलच्या साह्याने कपोतासन करतानाचा आलियाचा व्हिडियो आपल्या अकाऊंटवरुन शेअर केला होता. त्याला तिने - प्रगती - हॅपी बेंडी विकेंड अशी कॅप्शन दिली होती. अनुष्का ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर, अनन्या पांडे आणि रकुल प्रित यांची फिटनेस ट्रेनर आहे.
आलियाची जवळची मैत्रीण अनुष्का रंजन हिच्या लग्नाचा संगीत सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यासाठी आलिया फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला एक लेहेंगा घालून गेली होती. पिवळा, पोपटी आणि गुलाबी रंगाचं कॉम्बिनेशन असणारा हा लेहेंगा खरोखरंच खूप सुंदर होता. पण लेहेंगाच्या ब्लाऊजमुळे मात्र सगळीच गडबड झाली आणि आलियाला सोशल मीडियावर नेटीझन्सनी खूप ट्रोल केले. आलियाने घातलेला लेहेंगा मनिष मल्होत्रा यांच्या नुरीयत कलेक्शनपैकी एक होता. या लेहेंग्याचा बेस गुलाबी रंगाचा होता आणि त्यावर पोपटी रंगाने हॅण्ड एम्ब्रॉयडरी केलेली होती. ओढणीवर तसेच लेहेंग्यावरही अनेक ठिकाणी मोठ्या नजाकतीने सोनेरी रंगाने थ्रेडवर्क केलेले होते. लेहेंग्यावरची नक्षी अतिशय रेखीव आणि नाजूक होती. हा लेहेंगा घातल्यानंतर आलियाने कानात फक्त मोठे झुमके घातले होते पण ती अतिशय सुंदर दिसत होती.