फिटनेस क्वीन मलायका अरोरा (Malaika Arora) नेहमीच सोशल मिडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना फिटनेसविषयी प्रोत्साहन देत असते. तिचा प्रामुख्याने भर हा योगा (yoga) करण्यावर असतो. त्यामुळे तिने सांगितलेले व्यायाम सर्वसामान्यांना अगदी सहज घरच्याघरीही जमू शकतात. आता नुकताच तिने आणखी एक व्हिडिओ (viral video of Malaika Arora) शेअर केला असून यामध्ये तिने स्ट्रेचिंग प्रकारातला एक व्यायाम सांगितला आहे. हा व्यायाम केल्याने पाठदुखी, कंबरदुखी (stretching that helps to reduce backpain) तर कमी होतेच, पण त्यासोबतच बॉडी पोश्चर (how to improve body posture) सुधारण्यासही मदत होते.
मलायकाने केलेलं स्ट्रेचिंगव्हिडिओमध्ये ती जो व्यायाम सांगते आहे, त्यामध्ये तिने दोन्ही गुडघे आणि दोन्ही हातांचे तळवे जमिनीवर टेकवलेले आहेत. आता स्ट्रेचिंग करताना ती हाताची अवस्था जशी आहे तशीच ठेवते आहे. एक गुडघा मात्र उचलून पोटाखालून पुढे आणते आहे. त्याचवेळी मान देखील खाली घेते आहे. यानंतर पुढे घेतलेला पाय पुन्हा मागे घेऊन वर उचलत आहे. पाय जेव्हा वर असतो, तेव्हा ती मान वरच्या बाजूला वळवत आहे. हळूहळू पाय जास्तीतजास्त पुढे आणि तेवढाच अधिक मागे घेण्याचा तिचा प्रयत्न आहे. एका पायाने ८ ते १० वेळा हा व्यायाम केल्यानंतर दुसऱ्या पायानेही पुन्हा अशाच पद्धतीने व्यायाम करावा.
अशा पद्धतीने स्ट्रेचिंग करण्याचे फायदे- पाठीच्या कण्याची लवचिकता वाढविण्यास मदत होते.- बॉडी पोश्चर सुधारण्यास मदत होते. पाठीच्या कण्याला बाक येत असेल, तर तो वेळीच घालविण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त ठरतो.
'पैर टुटा है, हिंमत नही...', बघा पाय फ्रॅक्चर असूनही शिल्पा शेट्टी करतेय योगा, म्हणतेय.....- हाताचे आणि पायाचे स्नायू मजबूत करण्यासाठी उपयुक्त- शरीराचे संतुलन सांभाळण्यास मदत होते.- मन एकाग्र ठेवण्यासाठी फायदेशीर व्यायाम. - कंबर, मांड्या आणि पोट याठिकाणची अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त व्यायाम.