Lokmat Sakhi >Fitness > हाडकुळे-काटकुळे म्हणून लोक हिणवतात? ५ गोष्टी रात्रभर पाण्यात भिजवून खा, वाढेल वजन-व्हाल फिट

हाडकुळे-काटकुळे म्हणून लोक हिणवतात? ५ गोष्टी रात्रभर पाण्यात भिजवून खा, वाढेल वजन-व्हाल फिट

Struggling to gain weight? Eat these 5 foods at morning : वजन वाढवण्याचं देसी डाएट; 'या' पद्धतीने खा स्वयंपाकघरातल्या ५ गोष्टी; वाढेल उर्जा आणि..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2024 05:28 PM2024-03-22T17:28:47+5:302024-03-22T18:46:51+5:30

Struggling to gain weight? Eat these 5 foods at morning : वजन वाढवण्याचं देसी डाएट; 'या' पद्धतीने खा स्वयंपाकघरातल्या ५ गोष्टी; वाढेल उर्जा आणि..

Struggling to gain weight? Eat these 5 foods at morning | हाडकुळे-काटकुळे म्हणून लोक हिणवतात? ५ गोष्टी रात्रभर पाण्यात भिजवून खा, वाढेल वजन-व्हाल फिट

हाडकुळे-काटकुळे म्हणून लोक हिणवतात? ५ गोष्टी रात्रभर पाण्यात भिजवून खा, वाढेल वजन-व्हाल फिट

कोणी बारीक तर, कोणी जाड असते. तर कोणाची शरीरयष्टी मध्यम आकाराची असते (Weight Gain). तर काही लोकं इतके काटकुळे असतात की, काही केल्या त्यांना खाल्लेलं अन्न व्यवस्थित लागत नाही. ज्यामुळे वजन वाढत नाही. वजन कमी करण्यासोबत वाढवण्यासाठी देखील बरेच लोकं खटाटोप करत असतात (Fitness). जर आपले वजन काही केल्या वाढत नसेल, शिवाय खाल्लेलं अन्न शरीराला लागत नसेल तर, पोषणतज्ज्ञ शिखा अग्रवाल शर्मा यांनी सांगितलेली एक रेसिपी खाऊन पाहा (Health Care). यामुळे नक्कीच वजन वाढण्यास मदत होईल(Struggling to gain weight? Eat these 5 foods at morning).

यासंदर्भात, पोषणतज्ज्ञ शिखा सांगते, 'जर आपल्याला हेल्दी पद्धतीने वजन वाढवायचं असेल तर, आपण आहारात काही गोष्टींचा बदल करून पाहू शकता. ज्यात प्रोटीन, फायबर, आणि कॅल्शियमसह सर्व आवश्यक पोषक घटक असायला हवेत. असले हेल्दी पदार्थ नियमित खाल्ल्याने नक्कीच वेट गेनसाठी मदत होईल.'

वेट गेनसाठी नक्की काय खावे?

५० ग्रॅम काळे चणे

५० ग्रॅम मुग डाळ

३ अंजीर

४ खजूर

लोखंडी भांड्यात अन्न शिजवल्याने हिमोग्लोबिन वाढते? नक्की खरं काय? अभ्यास सांगतो..

३ अक्रोड

कृती

सर्वप्रथम, प्रत्येकी बाऊलमध्ये साहित्य घेऊन त्यात पाणी घालून धुवून घ्या. आता त्यात कपभर पाणी घालून साहित्य रात्रभर भिजत ठेवा. रात्रभर हे साहित्य पाण्यात भिजल्याने त्यातील पोषकतत्वे वाढते, शिवाय शरीर यातील पोषक घटक सहज शोषून घेण्यात मदत करते.

वजन वाढवण्यासाठी काळे चणे

काळे चणे शरीरात रक्त आणि उर्जा वाढवण्याचं काम करतात. १६४ ग्रॅम काळ्या चण्यांमध्ये ३६० कॅलरीज असतात. जे वेट गेनसाठी मदत करतात. शिवाय त्यात १५ ग्रॅम प्रथिने देखील असते. यासह १३ ग्रॅम फायबर असते. फायबरमुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते.

हिरवे मूग

वेट गेनसाठी हिरवे मूग फायदेशीर ठरते. २०० ग्रॅम शिजलेल्या हिरव्या मुगात सुमारे २२० कॅलरीज असतात. एक कप शिजलेल्या हिरव्या मुगामध्ये अंदाजे १४ ग्रॅम प्रोटीन्स असतात. शिवाय यात लोह, फोलेट, मॅग्नेशियम आणि जस्त यांसारख्या सूक्ष्म पोषक घटक आढळतात.

गुळासोबत खा एक लसणाची पाकळी, बॅड कोलेस्टेरॉल होईल कमी - रक्तही होईल पातळ

अंजीर

वजन वाढवण्यासाठी अंजीर फायदेशीर ठरते. एका वाळलेल्या अंजीरमध्ये सुमारे ४७ कॅलरीज असतात, जे वजन वाढवण्यासाठी मदत करतात. शिवाय त्यात २ ग्रॅम फायबर असते. फायबर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. शिवाय अंजीर ओमेगा -३ आणि ओमेगा -६ फॅटी ऍसिडचा एक चांगला स्रोत देखील आहे.

खजूर

साखरेऐवजी अनेक जण खजूर खातात. खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. जे वजन वाढवण्यासाठी मदत करतात. एका खजूरमध्ये २३ कॅलरीज असतात. यासह १.६ ग्रॅम फायबर असते. फायबर पचनक्रिया सुधारते. यासह यात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी ६ आणि लोह यांसारख्या पोषक घटकही आढळते.

अक्रोड

अक्रोड खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. २८ ग्रॅम अक्रोडमध्ये १८५ कॅलरीज असतात. शिवाय यात गुड फॅट्स देखील असते. विशेषतः यात ओमेगा -३ फॅटी ऍसिड सारख्या पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स असते. हे गुड फॅट्स वजन वाढण्यास मदत करतात. शिवाय यात प्रोटीन देखील असते. ज्यामुळे मसल्स ग्रोथ होते. 

Web Title: Struggling to gain weight? Eat these 5 foods at morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.