Lokmat Sakhi >Fitness > ब्लड शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील, फक्त एक काम करा; साखर वाढण्याची चिंता सोडा..

ब्लड शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील, फक्त एक काम करा; साखर वाढण्याची चिंता सोडा..

Diabetes Control Tips : अलिकडेच समोर आलेल्या अभ्यासानुसार ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी व्यायामाचे प्रकार आणि व्यायाम करण्याची वेळसुद्धा खूप महत्वाची असते.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 11:17 AM2022-11-22T11:17:11+5:302022-11-22T15:37:06+5:30

Diabetes Control Tips : अलिकडेच समोर आलेल्या अभ्यासानुसार ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी व्यायामाचे प्रकार आणि व्यायाम करण्याची वेळसुद्धा खूप महत्वाची असते.

Study claims exercising at this time of the day can helps to keep blood sugar control in diabetics | ब्लड शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील, फक्त एक काम करा; साखर वाढण्याची चिंता सोडा..

ब्लड शुगर कायम कंट्रोलमध्ये राहील, फक्त एक काम करा; साखर वाढण्याची चिंता सोडा..

 शरीरातील  साखरेचं प्रमाण वाढल्यास, जीवनशैली अनियमित असल्यास डायबिटिस उद्भवतो. सध्याच्या स्थितीत हा आजार  खूपच कॉमन. (Diabetes Control Tips) भारतातील सर्वाधिक लोकसंख्या या आजारानं पीडित आहे. निष्काळजीपणामुळे हा त्रास जीवघेण्या आजारात बदलू शकतो. इंशुलिनचे औषध शुगर लेव्हल नियंत्रित ठेवण्यासाठी असले तरी  रोजचं जेवण आणि व्यायामाकडे लक्ष द्यायला हवं. (Study claims exercising at this time of the day can helps to keep blood sugar control in diabetics)

अलिकडेच समोर आलेल्या अभ्यासानुसार ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी व्यायामाचे प्रकार आणि व्यायाम करण्याची वेळसुद्धा खूप महत्वाची असते. ब्लड शुगर कमी करण्यासाठी कोणत्यावेळी व्यायाम करायचा. हे माहीत असणं गरजेचं.  जर्नल डायबेटोलोजियामध्ये १ नोव्हेंबर २०२२ ला प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार दुपारी आणि संध्याकाळी शारिरीक क्रिया केल्यानं इंशुलिन प्रतिरोध कमी गोतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.  दिवसातून कोणत्याहीवेळी व्यायाम करणं फायद्याचं असतं पण सकाळी व्यायाम केल्यास शरीरावर चांगले परिणाम दिसून येतात.

ब्रिक्स बॉक्सिंग

डायबिटीस ऑर्गनायजेशननमुसार वेगानं चालल्यानं तुमचा स्टॅमिना वाढतो. याव्यतिरिक्त व्यायाम केल्यानं एक्स्ट्रा कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. याशिवाय इंशुलिनचं अतिसेवन तब्येतीसाठी हानीकारक ठरू शकतं. 

डान्स

डान्स फक्त तुमच्या शरीरासाठीच नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. मधुमेह असलेल्या लोकांसाठी, ही शारीरिक क्रिया वजन कमी करण्यासाठी, लवचिकता सुधारण्यासाठी, रक्तातील साखर कमी करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी एक उत्तम मार्ग आहे. 

स्विमिंग

डायबिटिस असलेल्यांनी रोज स्विंमिग केल्यास शरीर एक्टिव्ह राहतं.  हृदयरोगाची जोखिम कमी होण्यास मदत होते. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहून तब्येत चांगली राहण्यास मदत होते. व्यायाम हा तुमच्या रक्तातील साखर कमी करण्याच्या अनेक मार्गांपैकी एक आहे. पण झोप, हार्मोन्स, औषधे आणि आहार यासारख्या घटकांमुळे रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच त्यांचे व्यवस्थापन देखील खूप महत्वाचे आहे.

Web Title: Study claims exercising at this time of the day can helps to keep blood sugar control in diabetics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.