Join us  

आजपासून रोज करा फक्त ३ गोष्टी, महिनाभरात थुलथुलीत पोट आणि कंबरेची साइज होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2024 2:23 PM

Successful weight loss: 3 tips to lose weight : पोटाची चरबी कमी करण्यासाठी कोणत्या ३ गोष्टी उपयुक्त ठरू शकतील..?

बिघडलेली जीवनशैलीमुळे आजकाल नकळत गंभीर आजारांचा धोका वाढतो आहे (Weight Loss Tips). खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष, अपुरी झोप यामुळे वजन तर वाढतेच, शिवाय मधुमेह, रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतात (Fitness). त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. आजकाल वजन कमी करणं हे लोकांना एक टास्क वाटत आहे.

तोंडावरचा ताबा सुटणे आणि व्यायामाच्या अभावामुळे वजन वाढत जाते (Lose Weight). वजन वाढल्यावर पोटाचा आणि कंबरेचा आकार वाढत जातो. जर वजन कमी करण्यास अडचण निर्माण होत असेल तर, दिनचर्येत काही गोष्टी फॉलो करून पाहा. महिनाभरात वजन कमी करणं शक्य होईल, आणि फरकही दिसेल(Successful weight loss: 3 tips to lose weight).

वजन कमी करण्यासाठी टिप्स

व्यायाम

वजन कमी करण्यासाठी वर्कआउट करणं गरजेचं आहे. आपण वर्कआउटमध्ये वॉकिंग, जॉगिंग, धावणे, सायकलिंग किंवा पोहणे यासारख्या गोष्टींचा समावेश करू शकता. किंवा जिम आणि योगाचे क्लासेस लावून वजन कमी करू शकता. यामुळे शरीराला योग्य आकार मिळेल. यासह व्यायामामुळे शरीर सक्रीय राहील. शारीरिक आणि मानसिक आरोग्याला फायदा होईल.

वेट लॉससाठी रोज फक्त 'एवढ्या' स्टेप्स पूर्ण करा, थुलथुलीत पोट - मांड्या होतील कमी; महिनाभरात दिसेल फरक

हळूहळू अन्न चघळून खा

अन्न नेहमी हळूहळू खावे. पटापटा अन्न न चावता गिळू नये. जेव्हा आपण भरभर खातो, तेव्हा आपल्या मेंदूला सिग्नल मिळत नाही. जेव्हा आपण हळू जेवतो, तेव्हा बॉडी आपल्याला सिग्नल देते, की पोट भरलेले आहे. यामुळे आपल्याकडून कमी कॅलरीज खाल्ल्या जातात. त्यामुळे पोर्शन कण्ट्रोलमध्ये राखून खा. याशिवाय स्वत:ला हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे आहे.

विराट कोहली म्हणतो फिटनेस महत्वाचा म्हणून तो 'या' पद्धतीने खातो भाज्या; फिट व्हायचं तर तुम्हीही करा..

अॅपल सायडर व्हिनेगर

अॅपल सायडर व्हिनेगरमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. यामध्ये अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात, जे शरीराला धोकादायक बॅक्टेरियापासून दूर ठेवतात. शिवाय अपचनाचा त्रास होत नाही. हार्वर्ड हेल्थच्या मते, ज्या लोकांनी ३ आठवडे १ ते २ चमचे व्हिनेगरचे सेवन केले, त्यांचे वजन २ ते ४ पौंड कमी झाले. शिवाय रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राखण्यास मदत होते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स